“मार्क्स हे मोजमापाचे साधन आहेत; गुणवत्ता ही माणसाचा अंतर्भूत प्रकाश आहे.”
लेख क्र. 14..✍️
🔥 मेरिट म्हणजे फक्त मार्क नाही…! ती म्हणजे क्षमतांची ज्वाला आणि संधींचं आकाश..!
आज समाजात एक भ्रामक समज पसरलेला आहे..मेरिट म्हणजे फक्त मार्क्स...! दहावी -बारावी परीक्षेत बोर्डाच्या निकालांत चमकणाऱ्या आकड्यांना काही लोक गुणवत्ता समजतात. पण हे समीकरण मूळातच चुकीचं आहे.
गुणवत्ता म्हणजे कागदावरील टक्केवारी नव्हे; गुणवत्ता म्हणजे व्यक्तीच्या मधील क्षमता, तिला मिळालेल्या संधी, आणि योग्य मार्गदर्शनातून निर्माण होणारी प्रगल्भता...
म्हणूनच खरी मेरिट = क्षमता + संधी + प्रशिक्षण...
पण हा सोपा आणि सरळ अर्थ अनेकांना कधीच कळत नाही.
जेव्हा “नापास” हा शब्द एखाद्या विद्यार्थ्याच्या कपाळावर शिक्क्यासारखा मारला जातो, तेव्हा याच ‘मूर्ख’ समजुतींमुळे हजारो प्रतिभावान तरुण अंधारात ढकलले जातात.
पण इतिहास सांगतो...नापास लोकांनीच जगाला पास केलं आहे..!
🎓 नापास… पण यशस्वी..!
जग बदलणारे प्रतिभावंत... ✍️
1. मोहनदास करमचंद गांधी – मॅट्रिकला चार वेळा नापास.
पण अपयशावर मात करून जगाला सत्याग्रहाची अहिंसात्मक शस्त्रसंपदा दिली आणि स्वातंत्र्यलढ्याला नवी नैतिक दिशा देणारे नेता बनले.
2. केशुभाई पटेल – गुजरातचे माजी मुख्यमंत्री – इ. 4थी पास.
शिक्षण कमी असलं तरी लोकाभिमुख नेतृत्व, कर्मठ वृत्ती आणि संघटनशक्तीने संपूर्ण राज्याची राजकीय दिशा बदलणारे जननायक ठरले.
3. शरद पवार – जुनी मॅट्रिक फक्त 35%.
गुणपत्रिकेत कमी टक्के असूनही राजकीय दूरदृष्टी, नेतृत्वकौशल्य आणि रणनीतीने भारतीय राजकारणातील सर्वाधिक प्रभावी व्यक्तिमत्त्वांपैकी एक बनले.
4. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम – एकदा नापास.
पण त्या नापासातून उभं राहून ‘मिसाइल मॅन’ पासून ‘पीपल्स प्रेसिडेंट’ होईपर्यंतचा प्रवास प्रेरणेचा विश्वकोश ठरला.
5. जे.आर.डी. टाटा – चार वेळा नापास.
तरीही भारतीय उद्योगजगताला आधुनिकतेची नवी ओळख देत टाटा समूहाला जागतिक प्रतिष्ठा देणारे द्रष्टा उद्योजक ठरले.
6. बिल गेट्स – महाविद्यालय अर्धवट सोडलं.
पण तीन दशकांपेक्षा अधिक काळ जगाच्या तंत्रज्ञान, उद्योग आणि परोपकार क्षेत्राला दिशा देणारे सर्वात प्रभावी निर्माता बनले.
7. धीरूभाई अंबानी – नापास.
तरीही शून्यातून साम्राज्य उभारून भारतीय उद्योगविश्वाचा नियम पुस्तकच बदलणारा उद्योजक ठरला.
8. बिर्ला – नापास.
कमी शिक्षण असूनही तल्लख व्यावसायिक बुद्धिमत्ता आणि समाजकार्यातील योगदानामुळे भारतीय उद्योगक्रांतीचा आधारस्तंभ ठरले.
9. आइन्स्टाईन – शाळेत कमजोर विद्यार्थी म्हणून हेटाळला गेला.
तरीही सापेक्षता सिद्धांताने विश्वाच्या समजुतीचा पाया बदलणारा मानवजातीचा अनंत प्रतिभावंत ठरला.
10. न्यूटन – अभ्यासात दुर्बळ.
पण निरीक्षणशक्ती, एकांतप्रियता आणि जिज्ञासेच्या बळावर भौतिकशास्त्र, प्रकाशशास्त्र आणि गणिताला नवा जन्म देणारे महापुरुष ठरले.
11. थॉमस एडिसन – शिक्षकांनी मूर्ख म्हटलं.
पण शोधांची अखंड भूक, प्रयोगशीलता आणि चिकाटीने अंधारातून प्रकाशाची क्रांती निर्माण करणारा इतिहासातील सर्वात मोठा शोधकर्ता झाला.
12. वॉल्ट डिस्नी – शिक्षकांनी कल्पनाशक्ती कमी असल्याचं म्हटलं; नोकरीवरून काढलं...पण पुढे जागतिक मनोरंजनविश्वाचा महान निर्माता ठरला.
13. हेन्री फोर्ड – शालेय शिक्षण सरासरी.
तरीही औद्योगिक क्रांतीला गती देत मोटारउद्योगाचा जनक ठरला.
14. स्टीव्ह जॉब्स – कॉलेज सोडलं.
अपयशातूनच Apple साम्राज्य निर्माण करून तंत्रज्ञानाचा चेहराच बदलला.
15. मार्क झुकरबर्ग – हार्वर्ड सोडलं.
जगाचं सामाजिक नकाशाच बदलणारा काळाचा निर्माता बनला.
16. चार्ली चॅप्लिन – शाळेतून पळवून लावला.
पण जगाला हास्याची सार्वभौम भाषा देणारा कलाचा सम्राट ठरला.
17. अब्राहम लिंकन – आयुष्यात अनेकवेळा नापास-अपयशी प्रसंग...
तरीही मानवमुक्तीचा इतिहास बदलणारा प्रभावशाली राष्ट्राध्यक्ष झाला.
18. राइट ब्रदर्स (ऑरविल & विल्बर) – शैक्षणिक पार्श्वभूमी साधी.
पण मानवजातीला उड्डाणाचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवणारे युगपुरुष.
19. जॅक मा (Alibaba) – तीन वेळा नापास; ३० नोकऱ्यांतून रिजेक्ट...पण जागतिक पातळीवर मोठं ई-कॉमर्स साम्राज्य उभं केलं.
20. सोजर्नर ट्रूथ – औपचारिक शिक्षण नव्हतं.
तरीही मानवाधिकार आणि स्त्रीसक्षमीकरणाच्या लढ्याची अमर योद्धा ठरली.
21. रवींद्रनाथ टागोर – शाळेचं वातावरण न रुचल्याने शिक्षण अर्धवट...पण जगातून मान्यता मिळवणारे नोबेलविजेते कवी बनले.
22. लिओ टॉलस्टॉय – शाळेत सरासरी विद्यार्थी.
तरीही साहित्यविश्वातील सर्वोच्च शिखरावर अधिराज्य करणारे महान साहित्यकार.
23. मायकल फॅराडे – गणितात कमजोर.
पण विज्ञानात विद्युतक्रांती घडवून आधुनिक तंत्रज्ञानाचा पाया रचणारा.
24. अमिताभ बच्चन – अनेक ठिकाणी रिजेक्ट; आवाजावर टीका...पण भारतीय सिनेमा बदलणारे, करोडो लोकांच्या भावना स्पर्शणारे महानायक ठरले.
25. किशोर कुमार – संगीताचं कोणतंही औपचारिक शिक्षण नाही...तरीही सर्वकालीन महान आणि प्रेमळ स्वरसम्राट बनले.
प्रश्न असा...या लोकांमध्ये गुणवत्ता नव्हती..?
जर गुणवत्ता नसती, तर त्यांनी जग उजळलं असतं का?
याचा अर्थ कागदी शिक्षण आणि मानवी गुणवत्ता यांचा काडीमात्र संबंध नाही.
🌱 इतिहासातील महापुरुषांचे शिक्षण कमी, पण विचार मोठे..!
ज्योतिराव फुले – केवळ इ. 7वी.
संत गाडगे बाबा – शाळेचे एकही दिवस शिक्षण नाही.
कर्मवीर भाऊराव पाटील – इ. 6 वीत तीन वेळा नापास.
अण्णाभाऊ साठे – एकच दिवस शाळा.
आज लाखो पीएच.डी. धारक असूनही यांच्याशी तुलना कोण करू शकतो?
उत्तर स्पष्ट—कोणीही नाही.
⚖️ संधीशिवाय मेरिट अस्तित्वातच येत नाही..!
10 एप्रिल 2008 च्या सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निकालात स्पष्ट म्हटले आहे,
संधी + क्षमता = मेरिट
ज्यांना हजारो वर्षे शिक्षण, संपत्ती, सत्ता आणि सामाजिक संसाधनांपासून दूर ठेवले त्यांना ‘मेरिट दाखवा’ म्हणण्यापूर्वी संधी द्या, आधार द्या, वातावरण द्या.
ज्यांच्या घरात...
पहिला मुलगा कलेक्टर
दुसरा डॉक्टर
तिसरा इंजिनिअर
चौथा शेतकरी..
अशा असमतोल परिस्थितीत “हुशारी” किंवा “मेरिट” यावर वाटप होऊ शकत नाही.
जो सामाजिकदृष्ट्या दुर्बल आहे, त्यालाच जास्त संधी मिळाली पाहिजे...हीच न्यायाची खरी व्याख्या.
🔥 ‘धर्म’ आणि ‘ज्ञान’ विक्री करणाऱ्यांवर तुकोबारायांचा प्रहार
जगतगुरु संत तुकाराम महाराज आपल्या अभंगात म्हणतात..
“ मुखी सांगे ब्रह्मज्ञान, जण लोकांची कापितो मान.
कथा सांगतो देवाची, अंतरी असता बहु लोभाची.
तुका म्हणे तोचि वेडा, त्याचे हणोनी थोबाड फोडा. ”
जे लोक देवाच्या नावावर ज्ञान विकतात, भीती दाखवतात, आणि अंधश्रद्धेच्या दलदलीत लोकांना अडकवून पैसे उपटतात..
त्यांना तुकाराम महाराजांनी स्पष्टपणे धडा शिकवला आहे.
समाजाचं शोषण करणाऱ्या ढोंगी बाबांच्या तोंडावर प्रहार करण्याची हीच खरी वेळ आहे..
कारण प्रबोधन म्हणजे अंधाराला शिव्या देणं नव्हे,
तर सत्याचा दिवा पेटवणं आहे.
मेरिट म्हणजे मार्क नाही… तर मनाची प्रगल्भता आहे, मित्रांनो..
खरी ‘गुणवत्ता’ त्या व्यक्तीत असते..ज्याच्याकडे क्षमता आहे,संधी मिळताच उंच झेप घेतो,आणि कठोर परिश्रमाने स्वतःच आपला मार्ग तयार करतो.
मार्कांच्या चौकटीत व्यक्तीचं मोजमाप करणं म्हणजे आकाशाला हाताच्या ओंजळीने मोजण्यासारखं आहे..
अशक्य आणि मूर्खपणाचं...
म्हणूनच समाजाने निर्णय घेताना मार्क नव्हे, मन बघायला हवं.
मेरिट नव्हे, मानवता बघायला हवी...
आणि सर्वात महत्त्वाचं दुर्बल, वंचित आणि संधीपासून दूर असलेल्या माणसाला प्राधान्य द्यायलंच हवं...
धन्यवाद मित्रांनों.. 🙏
टीप : ही माहिती मुक्त स्रोतांवर आधारित असून तिचं सृजनशील संकलन व स्वतंत्र लेखन करण्यात आले आहे.
विचार संकलन आणि संपादन..✍️
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख
-एक साहित्यप्रेमी, विवेकवादी आणि समाजमाध्यमकार..
🔰 The Spirit of Zindagi Foundation
"मानवी सामर्थ्याला जागवणारं प्रेरणेचं क्षितिज..!"
Inspire | Educate | Empower | Excel
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
"Nurturing Potential Through Education"
शिक्षण | सेवा | प्रेरणा | प्रबोधन | सामाजिकता | संशोधन
#Merit #Marks #EducationSystem #Gundwatta #Capacity #Opportunity #Training #StudentLife #Motivation #Inspiration #SuccessStories #NapasPanYashasvi #RealMerit #SocialEquality #RightToEducation #ModernEducation #Vidyarthi #StudentMotivation #Mindset #PositiveThinking #IndianEducation #Talent #Hardwork #SuccessMindset #ThoughtfulWriting #SocialAwareness #ProgressiveThoughts #JalgaokarRafikShaikh #Prabodhan #vichardhara #EducationalReform #EmpowerYouth #InspireEducateEmpower #SpiritOfZindagiFoundation #APJAbdulKalamFoundation #equalityforall #MattersOfMind #HumanityFirst #SamajikNyay #BreakingMyths #Awareness #MotivationalWriter #MarathiWriter #SocialChange #InspirationalArticle #KnowledgeIsLight
Post a Comment