“ ज्याचं रडणं जग लपवून ठेवायला शिकवतं, त्याची वेदना समजून घेण्याची वेळ आता आली आहे..”
🔰 19 नोव्हेंबर International Men’s Day..
♂️ अंतरराष्ट्रीय पुरुष दिनाच्या निमित्ताने.. ✍️
मानवजातीच्या विस्तीर्ण विश्वात पुरुषत्व म्हणजे केवळ स्नायूंचा कणखरपणा किंवा जबाबदाऱ्या पेलण्याची क्षमता एवढंच नसतं… पुरुषत्व म्हणजे न बोललेल्या वेदनांचं मौन, अंतर्मुख संघर्षांची ज्वाला, आणि अपेक्षांच्या ओझ्याखालीही सरळ उभं राहण्याचा अदम्य प्रयत्न..
आणि म्हणूनच 19 नोव्हेंबर International Men’s Day हा दिवस केवळ एका दिनाचे औचित्य नसून एक विचारांचे द्वार आहे..जिथे आपण पुरुषांच्या न सांगितलेल्या कहाण्यांना, त्यांच्या न दिसणाऱ्या लढ्यांना, आणि त्यांच्या शांत सामर्थ्याला ओळख देतो...
“जगासाठी कणखर दिसणारा पुरुष, अंतर्मनात मात्र शांतपणे लढत असलेला योद्धा असतो.”
समाजाने पुरुषांना अनेक वर्षांपासून एक चौकट दिली..
“रडू नकोस.” “कमकुवत दिसू नकोस.” “तगुन राहा.”
पण पुरुषही भावनांचे धनी आहेत, भीतीचे कैदी आहेत, आणि उद्यासाठी स्वप्ने विणणारे सामान्य माणूसचं की..?
International Men’s Day या चौकटीला फोडून सांगतो..
पुरुषत्व म्हणजे कठोरता नव्हे, तर करुणेचा उजेड.. पुरुषत्व म्हणजे अहंकार नव्हे, तर समजूतदारपणाची भाषा...पुरुषत्व म्हणजे जिंकणे नव्हे, तर जगाला उजळवणारी साथ.
“ जगाच्या वादळांना सामोरं जातानाही जो स्वतःचा प्रकाश विझू देत नाही..तोच खरा पुरुष.”
पुरुषांच्या जगण्यात अनेक अदृश्य जखमा असतात..अपयशाची सल, नोकरीतील ताण, कुटुंबाच्या अपेक्षांचे ओझे,.आणि स्वतःच्या स्वप्नांना शेवटच्या क्रमांकावर ठेवण्याची सवय.
तरीही ते चालत राहतात…कधी शांत लाटेसारखे, कधी वादळासारखे, तर कधी अगदी राखेतून उगवणाऱ्या फिनिक्ससारखे.
“पुरुष म्हणजे लोखंड नव्हे; जगण्याच्या तापात तापून घडलेलं सामर्थ्य आहे.”
हा दिवस हे स्मरण करून देतो...की ताकद म्हणजे केवळ भार सहन करणं नव्हे, तर त्या भाराखाली तुटूनही पुन्हा उभं राहण्याची हिंमत.
“पुरुषत्वाची किंमत त्याच्या कमाईत नसते तर ती त्याच्या स्वभावात, विवेकात आणि करुणेत असते.”
या दिवसाचा केंद्रबिंदू म्हणजे positive male role models ते पुरुष जे समाजाला बदलतात कणखरतेने नव्हे,तर संवेदनशीलतेच्या, आदराच्या आणि विवेकाच्या प्रकाशाने.
बाप जो मुलासाठी आकाशातला तारा बनतो…भाऊ जो खंबीर आधार असतो…मित्र जो वेदनेच्या अंधारात दीप हातात धरून उभा राहतो…पती जो सोबत नसून, सहप्रवासाचा श्वास बनतो…
असा प्रत्येक पुरुष उजेडाचा दूत आहे.
“ जगाच्या परीक्षा जरी असंख्य असल्या,.तरी पुरुषत्वाचा खरा मूल्यांकन एकाच ठिकाणी होतं..धैर्याच्या शांत ठोक्यावर.”
पुरुषांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न अजूनही अबोल आहे...
आत्महत्येची आकडेवारी पुरुषांमध्ये जास्त का..?🫣
ते दडपून जगतात, की दिसू नयेत म्हणून वेदना गप्प ठेवतात?
समाजाने पुरुषांकडे अपेक्षांची ढगभर उचल दिली, पण त्यांच्यासाठी भावनिक पावसाची परवानगी दिलीच नाही.
“ पुरुषाचा प्रवास बाहेरच्या जगाचा नसतो, तर स्वतःच्या आतल्या अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा असतो.”
International Men’s Day हा एक प्रश्न विचारतो..!🤔
“कधी देणार आहोत आपण पुरुषांना त्यांच्या भावनांसाठी, दुर्बलतेसाठी, आणि त्यांच्या अस्तित्वासाठीही सुरक्षित जागा?”
लिंग समानता ही एका बाजूची कहाणी नाही..स्त्रीवादाचा खरा अर्थ पुरुषांना कमी मानणे नाही तर दोघांनाही समान माणूस मानणे आहे.
पुरुषांच्या समस्यांवर बोलणं हे स्त्रियांच्या संघर्षांना विरोध नव्हे,
तर पूर्ण समाजाला उजेडाकडे नेणारा मार्ग आहे.
“जगाच्या भाराखाली झुकूनही.ज्याचा आत्मा सरळ उभा राहतो तोच खरा पुरुष.”
International Men’s Day ही केवळ तारीख नाही तर आतल्या पुरुषाला पुन्हा ओळख देण्याची जागा आहे.
हा दिवस सांगतो..♂️
रडण्याला परवानगी आहे..कमकुवत होण्याला लाज नाही.
स्वतःची काळजी घेणं हेही कर्तव्य आहे.
आणि प्रेम, करुणा, भावना या सर्व गोष्टी पुरुषत्वाचीच ओळख आहेत.
आजच्या दिवशी प्रत्येक पुरुषाला एकच संदेश..
तू मौनाचा नाही, तर बदलाचा प्रवास आहेस...
तू समाजाच्या अपेक्षांचा नव्हे, तर स्वतःच्या प्रकाशाचा दीप आहेस.तू फक्त पुरुष नाही…
तू एक संपूर्ण विश्व आहेस... मित्रा..
“तो हसत दिसला तरी जिंकलेला नसतो;.तो शांत दिसला तरी हरलेला नसतो..तो फक्त लढत असतो… स्वतःसाठी आणि जगासाठी.”
♂️ आज अंतरराष्ट्रीय पुरुष दिनाच्या निमित्ताने…
सलाम अशा पुरुषांना, ज्यांनी आपल्या विवेकाने समाजात जबाबदारी, समज आणि संवेदनशीलतेचं नवं भान निर्माण केलं.
हे ते पुरुष आहेत, जे फक्त कुटुंबासाठी नव्हे तर संपूर्ण समाजासाठी निःशब्दपणे जिवावर उदार होतात..
कधी आधार बनून, कधी प्रेरणा बनून, आणि कधी संघर्षाच्या काळात शांत भिंत बनून. पुरुष म्हणजे केवळ कर्तव्याचा भार वाहणारा नव्हे, तर प्रेम, त्याग, आणि अंतर्मनातील कोमल भावनांचं जिवंत रूप आहे.
त्यांच्या संघर्षांना आवाज देणं, त्यांच्या भावनांना मान्यता देणं, आणि त्यांच्या मानवीपणाला सन्मान देणं..हेच आजच्या दिवसाचं खऱ्या अर्थाने प्रबोधन आहे.
पुरुषत्वाचा अर्थ कठोरतेत नसून, माणुसकीच्या गाभ्यात असलेल्या करुणा, कर्तव्यनिष्ठा आणि आत्मबलात आहे… आणि या प्रकाशामुळेच समाजाच्या अनेक वाटा उजळून निघतात.
धन्यवाद मित्रांनो..! 🙏
लेख आवडला असेल, तर आपल्या प्रियजनांसोबत नक्कीच शेअर करा.
सकारात्मक विचार शेअर करणे हीच मानसिक आणि सामाजिक शक्ती वाढवण्याची सर्वात मोठी ताकद आहे. जेव्हा आपण प्रेरणादायक विचार इतरांसोबत वाटतो, तेव्हा ती ऊर्जा द्विगुणित होते आणि आपले जीवन अधिक सकारात्मक आणि समृद्ध बनते. त्यामुळे, चांगल्या गोष्टी शेअर करत राहा आणि एकमेकांना पुढे जाण्यास प्रेरित करा मित्रांनो..!
-विचार संकलन आणि संपादन.. ✍️
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख
-एक साहित्यप्रेमी, विवेकवादी आणि समाजमाध्यमकार..
🔰 The Spirit of Zindagi Foundation
"मानवी सामर्थ्याला जागवणारं प्रेरणेचं क्षितिज..!"
Inspire | Educate | Empower | Excel
#InternationalMensDay #MensDay #MensMentalHealth #अंतरराष्ट्रीयपुरुषदिन #पुरुषदिन #MenAreHumanToo #पुरुषहीमाणूसआहे #PositiveMasculinity #HealthyMasculinity #पुरुषत्वाचीखरीओळख #BreakTheSilence #भावनांचेपुरुष #MenDeserveCare #पुरुषांचेवेदनांना_आवाज #MensRights #पुरुषांचेसंघर्ष #MentalHealthMatters #पुरुषांचेमानसिकआरोग्य #UnsungHeroes #निःशब्दयोद्धे #StrengthWithSensitivity #जगण्याचालढा #EmpathyForMen #माणुसकी #EqualityForAll #समतेचाविचार #MenNeedSupportToo #HopeForMen #RiseOfHumanity #EveryManMatters #ZindagiFoundation #TheSpiritOfZindagi #InspireEducateEmpowerExcel #RafikShaikhWrites #MotivationalWriter #SocialAwarenessWrites
Post a Comment