“अस्तित्वाला प्रश्न विचारण्याची हिंमत जिथे जन्म घेते.. त्या ठिकाणी नित्शे उभा असतो.”
🎓 विचारांच्या अंधारात वीज बनून पडणारा तत्त्वज्ञ — फ्रेडरिक नित्शे.
अवांतर वाचनाची सवय शालेय जीवनात लागली, आणि कार्ल मार्क्सच्या साहित्याशी पहिला परिचय झाला तेव्हाच विचारविश्वाचे नवे दरवाजे उघडले. परंतु त्यानंतर माझ्या विवेकी चेतनेला सर्वाधिक झंकारून जागवणाऱ्यांमध्ये फ्रेडरिक नित्शेचे स्थान अतिशय वेगळे आहे. विद्यापीठिय शिक्षण काळात SFI विद्यार्थी संघटनेत पाश्चात्त्य तत्त्वज्ञानांवर अखंड चर्चा रंगायच्या..
मानव, समाज, राजकारण, तत्वज्ञान, इतिहास आणि अस्तित्व यांवर प्रश्न विचारण्याची हीच खरी शाळा होती.
“जे विचार मनाला घाबरवतात, तेच मनुष्याला नव्याने घडवतात — नित्शेचा वज्रस्वर.”
आजही, कार्ल मार्क्सला कितीही पुन्हा वाचा किंवा फ्रेडरीक नित्शेच्या विचारगर्भ शब्दांकडे कितीही वेळा वळा प्रत्येक वेळी नवा प्रकाश प्रकटतो, एक नवी जाणीव जागृत होते, आणि आत्मचिंतनाच्या खोल खोल कप्प्यात आपण पुन्हा उतरतो.
त्यांच्या विचारांचा आशय प्रत्येक भेटीत अधिक घन, अधिक धारदार, अधिक प्रबोधनकारी होत जातो..जणू विचारविश्वात पुन्हा पुन्हा एक नवी खिडकी उघडते..
मनुष्याच्या चेतनेवर असंख्य कल्पनांची सावली पडते.
अनेक विचार येतात-जातात, काही क्षणभर चमकतात आणि हरवतात. परंतु काही विचार असेही असतात..जे क्षणिक नसतात, ते युगानुयुगांचा पाया हादरवतात.
जे जीवनाच्या गर्भात दडलेल्या सत्याला प्रकाशात आणतात. जे मनुष्याला स्वतःच्या अस्तित्वाशी प्रामाणिक बनवतात.
असे विचार म्हणजे जणू संपूर्ण मानसिक आकाशाला हादरा देणारा मेघगर्जनाचा आवाज..
फ्रेडरिक नित्शे हा तसाच एक वज्रस्वर, एक विचारभूकंप, एक जागृतीचा अग्निकुंड आहे.
त्याच्या प्रत्येक ओळीत एक आव्हान दडलेले असते. त्याच्या प्रत्येक विचारात एक प्रश्न आपल्याला चिरतो. आणि त्या प्रश्नातूनच स्वतःच्या निर्मितीची, स्वतःला ओलांडण्याची, स्वतःला परिभाषित करण्याची जाणीव जागते.
मार्क्सने समाजाच्या संरचनेतील विषमता दाखवली, तर नित्शेने मनुष्याच्या आत्म्याच्या संरचनेतील निद्रिस्त सामर्थ्य दाखवले.
दोघांनाही समजून घेताना शेवटी आपल्यालाच स्वतःच्या विचारांची कसोटी लावावी लागते.. आणि कदाचित हाच तो विवेकी प्रवास आहे, जो विचारांना केवळ माहिती न ठेवता, जाणीवा बनवतो.
नित्शे हा केवळ एक तत्त्वज्ञ नाही; तो मनुष्याच्या चेतनेला हादरे देणारा विजेचा कडकडाट आहे. तो परंपरेला प्रश्न विचारतो. तो भीतीचा मुखवटा फाडतो. तो आत्म्यात झोपलेल्या अग्निला जागवतो. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे..तो मनुष्याला स्वतःच्या अस्तित्वाचा कारागीर बनवतो.
असा हा फ्रेडरिक नित्शे...आजच्या या वैचारिक द्वंद्वाच्या काळात प्रत्येकाने वाचायलाच हवा, असं मला वाटतं.
कारण नित्शे हे केवळ नाव नाही, तर मनुष्याच्या विचारस्वातंत्र्याची परीक्षा घेणारी एक ज्वाला आहे. आजच्या समाजजीवनात आपण माहितीच्या प्रचंड गर्दीत अडकलो आहोत, पण विचारांच्या खोल सत्याशी संवाद साधणारे क्षण हरवत चाललो आहोत.
नित्शे आपल्याला विचारायला लावतो, आपण जे मानतो ते खरोखर आपले विचार आहेत का? की समाजाने शिकवलेले साचे?
तो आपल्याला आत्मपरीक्षणाची हिंमत देतो, परंपरेवर प्रश्न विचारण्याची जागृती देतो, आणि मनुष्याला “स्वत:चा शिल्पकार” बनण्याचा संदेश देतो.
म्हणून आजच्या गोंधळलेल्या काळात, नित्शे हा वैचारिक दिशादर्शक आहे,जो आपल्याला स्वतःचा खरा आवाज शोधायला शिकवतो.
- त्याचा वैचारिक चाहता.. ✍️
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख..
-एक साहित्यप्रेमी, विवेकवादी आणि समाजमाध्यमकार..
🔰 The Spirit of Zindagi Foundation
"मानवी सामर्थ्याला जागवणारं प्रेरणेचं क्षितिज..!"
Inspire | Educate | Empower | Excel
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
"Nurturing Potential Through Education"
शिक्षण | सेवा | प्रेरणा | प्रबोधन | सामाजिकता | संशोधन
#FriedrichNietzsche #नित्शे #NietzscheQuotes #तत्त्वज्ञान #Philosophy #Existentialism #ExistentialThought #विवेकवाद #VicharPravah #VicharLekhan #IntellectualJourney #MarxAndNietzsche #KarlMarx #WesternPhilosophy #पाश्चात्त्यतत्त्वज्ञान #ThoughtRevolution #Vicharbhukamp #Atmachintan #SelfAwareness #Introspection #VicharchiShala #StudentPhilosophy #SFIExperience #PhilosophicalJourney #InspireThinkTransform #AwakenYourMind #MentalFreedom #ThoughtLiberation #VivekachePrakash #SocialAwareness #AcademicThoughts #LiteratureLover #विचारप्रबोधन, #jaibhim #SpiritOfZindagi #drapjabdulkalamfoundation #EducateInspireEmpower
Post a Comment