🎓 Between the Line & Behind the Line..✍️
पुस्तकाचं वाचन सगळेच करतात, पण प्रत्येकाचं आकलन सारखं होतं असं नाही...
काही जण फक्त शब्द वाचतात... पण अर्थाच्या गाभ्यापर्यंत पोहोचत नाहीत.
तर काही जण वाचनाच्या ओळींपलीकडं पाहतात…
ते फक्त शब्द नाही, तर शब्दांमागचं जीवन आणि ओळींच्या आत दडलेलं विचारविश्व ओळखतात.
हाच तो Between the line आणि Behind the line वाचनाचा अनुभव..
जिथे अक्षर फक्त अक्षर राहत नाही, तर तो विचाराचा दीपस्तंभ बनतो.
ही एक कला आहे.. विचारांच्या गाभाऱ्यात उतरण्याची,
आणि ती साधना आहे... मनाच्या डोळ्यांनी पाहण्याची.
जेव्हा वाचक शब्दांमागील भाव समजतो, तेव्हा तो फक्त वाचक राहत नाही,
तो विचारकर्ता बनतो, प्रबोधनाचा प्रवासी बनतो.
कारण...
अर्थ ओळींत नसतो, तो तर मनाच्या जागृतीत असतो.
आणि ती जागृतीच आपल्याला विचारशील, सजग आणि
साक्षर करते खऱ्या अर्थानं..!
-एक पुस्तकप्रेमी.. ✍️
#विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख..
Post a Comment