शाळेतील शिक्षक म्हणजे फक्त धडा सांगणारा नसतो; तर तो काळाच्या गर्तेत हरवलेल्या पिढीला दिशा दाखवणारा दीपस्तंभ असतो. त्याच्या शब्दांत केवळ व्या
करणाची बांधणी नसते, तर विचारांची क्रांती दडलेली असते. त्याचा आवाज हा फक्त वर्गातील उपस्थितीचा गजर नसतो, तर समाजाला जागवणारा वज्रनाद असतो आणि त्याची भूमिका ही केवळ पेशाची मर्यादा नसून..सत्य, विवेक आणि मानवतेची शपथ असते...
शिक्षकाचे शब्द हे केवळ धड्यांचे ओघवते वाक्य नसतात , तर ते पिढ्यान्पिढ्या मनावर उमटणारे संस्कार असतात. तो गणित शिकवताना केवळ आकड्यांची बेरीज करत नाही, तर आयुष्याच्या समीकरणात सत्याची उणीव राहू देत नाही. तो इतिहास शिकवताना तारीख व घटना सांगतो, पण अन्यायाविरुद्ध उभं राहण्याचं धैर्यही रुजवतो. तो साहित्य शिकवताना कविता समजावतो, पण त्याचबरोबर जीवनातील सौंदर्याची ओळखहीं करून देतो.
शिक्षक म्हणजे फक्त शाळेच्या चौकटीत उभा असलेला व्यक्ती नव्हे, तर तो विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा मार्गदर्शक तारा असतो. तो ज्ञानाचा दीप पेटवतो आणि अंधारलेल्या मार्गावर प्रकाश टाकतो. तो शहाणपण शिकवतो, पण त्याहूनही मोठं म्हणजे माणूसपण जिवंत ठेवतो. त्याची शिकवण ही केवळ पाठ्यपुस्तकापुरती मर्यादित नसते, ती म्हणजे जीवनाला दिशा देणारी प्रेरणा असते.
शिक्षक हा फक्त धडे शिकवणारा नसतो, तर तो भविष्य घडवणारा शिल्पकार असतो.. विचार घडवणारा, संस्कार रुजवणारा आणि समाजातल्या नव्या पहाटेचा शिल्पकार असतो.
आजच्या धकाधकीच्या आणि स्पर्धेच्या युगात बाह्य चकाकी, खोटं यश आणि दिखाऊ प्रतिष्ठेची छाया मुलांच्या मनावर पडते...अशा वेळी खरी जबाबदारी शिक्षकाचीच असते..
सत्याचा आरसा दाखवण्याची, विवेकाचे पंख देण्याची, खोट्या मोहजालातून बाहेर काढण्याची, अन्यायाच्या गर्जनेला तोंड देण्याची, प्रश्न विचारण्याची ताकद देण्याची, विचारांच्या जंजीरा तोडण्याची, आत्मभान जागवण्याची, मनुष्यत्वाच्या ज्योतीला चेतवण्याची आणि असत्याच्या अंधारावर सत्याचा दिवा पेटवण्याची..हीच खरी शिक्षणाची आणि प्रबोधनाची वाट आहे.
कारण... ✍️
सत्याचा दीप पेटवणारा शिक्षक म्हणजे फक्त शिकवणारा नव्हे, तर समाजाचा जागता पहारेकरी असतो. तो मंदिरातील घंटा नाही, तर जागृतीचं रणशिंग आहे,जे सुस्तावलेल्या विवेकाला जागं करतं. तो साधा झरा नाही, तर अखंड प्रवाही गंगा आहे,जी पिढ्यानंपिढ्या विचारांना शुद्ध करते, मनांना प्रबुद्ध करते आणि तो फक्त वज्रध्वनी नाही, तर क्रांतीचा गडगडाट आहे, जो अन्यायाच्या काळ्याकुट्ट ढगांना फाडून टाकतो, सत्याच्या किरणांना मार्ग दाखवतो.
शिक्षक म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान देणारा नव्हे; तो समाजाच्या रंध्रात सत्याचा झरा सोडणारा, अन्यायाला भिडणारा, विवेकाचा दीप उजळणारा आणि मानवतेला नवी दिशा देणारा क्रांतिकारक ठरत असतो मित्रांनो..
आजच्या काळात शिक्षणाचं रूप बाजारात बदलत चाललं आहे. ग्लॅमर आहे, दिखाऊपणा आहे, गुणवंत्तेपेक्षा गुणांचा फुगवटा आहे, गुणांचे खोटे मोजमाप आहे…
पण खरेपणा? सत्य? नैतिकता? याचा पुरवठा कोण करणार?
अर्थातचं शिक्षकचं..!
" ज्ञानाच्या गजबजाटात पण खरेपणा, सत्य, नैतिकता यांचा पुरवठा करणारं एकमेव भांडार म्हणजे शिक्षकचं..! कारण तोच विचारांना धार लावतो, विवेक जागवतो आणि पिढ्यांना सजग नागरिक बनवतो."
विद्यार्थ्याला शिकवताना जर सत्य दडपलं, तर ते शिक्षण अपूर्ण आणि अपवित्र ठरतं..
सत्य लपवणारा शिक्षक म्हणजे अंधाराला साथ देणारा गद्दार, जो विद्यार्थ्याच्या भविष्यावर काळं पांघरूण टाकतो; पण सत्य शिकवणारा शिक्षक म्हणजे समाजाचा खरा पहारेकरी, जो खोट्याच्या भिंतीवर सत्याचा ठाम पहारा देतो आणि सत्यासाठी विद्यार्थ्याला ताठ उभं करणारा शिक्षक म्हणजे अन्यायाच्या सिंहासनाला हादरवणारा क्रांतिकारक गडगडाट, ज्याच्या एका घोषणेनं साम्राज्यही थरथर कापतात..
हाच तो शिक्षक, जो विचारांच्या रणांगणात सैनिकही आहे आणि प्रकाशाचा मशालधारीही..!
आजची पिढी मोबाईलच्या स्क्रीनमध्ये रमली आहे, पण दृष्टिकोन हरवते आहे. डिग्री आहे, पण दिशा नाही. हुशारी आहे, पण धैर्य नाही. ही उणीव भरून काढणारा एकमेव आधार म्हणजे,सत्य शिकवणारा शिक्षक.
गुरु म्हणजे देव नाही, पण देवासारखाचं.. देव स्वर्ग दाखवतो, आणि शिक्षक सत्य दाखवतो. देवाला प्रश्न विचारले जात नाहीत, पण शिक्षकाला विचारले जातात आणि जो शिक्षक उत्तर देताना सत्य वाकवत नाही, तोच खरा गुरुवर्य ठरतो.
म्हणूनच आज शिक्षक दिनी आपण ठरवलं पाहिजे..
👉 शिक्षक फक्त पाठ्यपुस्तकांचा वाहक राहणार नाही, तर तो विचारांचा ज्योतिष बनेल..
👉 तो सत्याचा दीप प्रज्वलित करेल, ज्याच्या प्रकाशात अज्ञानाचा अंधार कायमचा नाहीसा होईल.
👉 तो विद्यार्थ्यांना गुलाम नव्हे तर विचारवंत घडवेल,ज्यांच्या मनात बंडाची ठिणगी, विवेकाची तलवार आणि मानवतेचा दीप सदैव प्रज्वलित असेल.
👉 तो काळाच्या प्रवाहात दिशादर्शक होईल, अन्यायाला प्रश्न विचारील आणि समाजाला नवा मार्ग दाखवेल.
"सत्याच्या ज्योतीवर उभारलेलं शिक्षणचं समाजाला मुक्ती देतं;
आणि सत्यासाठी ताठ उभं राहणारा शिक्षकचं खऱ्या अर्थाने गुरुवर्य ठरतो."
क्रमश:
-एक शिक्षणप्रेमी, विवेकवादी आणि समाजमाध्यमकार..
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख
The Spirit of Zindagi Foundation
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
#शिक्षकदिन #TeacherDay #शिक्षक #GuruPurnima #Education #Knowledge #Truth #सत्य #Motivation #Inspiration #StudentLife #विद्यार्थी #Wisdom #Learning #ज्ञान #TeacherMotivation #TeacherLife #TeachersOfIndia #शिक्षण #InspiringTeachers #StudentInspiration #गुरुवर्य #TeacherRole #शिक्षकप्रेरणा #TeachersDay2025 #TeacherQuotes #MahatmaPhule #सत्यशोधक #Guru #RespectTeachers #विद्यार्थीप्रेरणा #ज्ञानदीप #शिक्षकविचार #MotivationalQuotes #TeacherRespect
Post a Comment