मी जात-धर्माच्या खोट्या भिंतींमध्ये अडकलेलो नाही, मी विचारांच्या तेजोमय दीपातून चालतो. मार्क्सवादी विचारांनी मला तर्काचा दिवा दिला, विवेकाची तलवार दिली आणि जगण्याला एक प्रखर ध्येय, एक अखंड दिशा दिली.
फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारधनानं माझं वैचारिक आकाश उजळलं,त्यांच्या विचार-प्रवर्तक साहित्याने माझ्या मनाला बौद्धिक गहनता, बुद्धीला धार आणि आयुष्याला एक उद्दिष्टपूर्ण समृद्धी दिली.
पुरोगामी विचार माझा श्वास आहे..✍️
तो मला प्रत्येक संघर्षात सत्याला घट्ट धरून ठेवायला शिकवतो,
विवेकाला शस्त्र बनवायला सांगतो, निष्ठा आणि अभ्यासाची शपथ घ्यायला लावतो आणि मानवी जीवनमूल्यांना पवित्र व्रत मानायला शिकवतो.
आज सत्ता आणि स्वार्थाने गढूळ झालेल्या राजकीय आणि सामाजिक प्रदूषणात लोक मला ‘जातीनं मुस्लिम’ म्हणून हिनवतात, टीका- टिपणी करतात, टोमणे मारतात..
परंतु खरं दु:ख याहीपेक्षा भयंकर आहे, स्व:जातीकडून होणाऱ्या मानसिक त्रासात आहे..त्यांची कीव यावी एवढी त्यांची मानसिक आणि वैचारिक गुलामगिरीची..! जिथे माणूस स्वतःच्या अंधारात अडकून आपल्या भविष्यालाच अंधःकारमय करतोय..
पिढ्यान् पिढ्या शिक्षण, समाज, अर्थ आणि बुद्धीचा घोर नाश याच मानसिकतेने केला आहे आणि अजूनही करतो आहे.
म्हणूनच, या कालातीत प्रवाहात पुरोगामी विचारांचा स्वीकार हीच खरी वेळेची गरज आहे. उद्याचा काळ ज्ञान-तंत्रज्ञानाच्या महास्फोटातून ‘ज्ञानाधिष्ठित’ अर्थव्यवस्था आणि प्रगत वैचारिक समाज घडवेल जो तर्क आणि विवेकाला, बुद्धीप्रामाण्याला अधीष्ठान मानेल..
तेव्हा आपण जर विचारांनी पिछाडीवर राहिलो तर आपला समाज पुन्हा एकदा इतिहासाच्या उपेक्षित पानांवर ढकलला जाईल.
भारतीय संविधान हे आपल्या हक्कांचं रक्षण करणारा किल्ला आहे. या किल्ल्याला जपण्याची सजगता, त्याचा सखोल अभ्यास आणि संवेदनशीलतेने केलेली बांधिलकी हाच आपल्या सर्वोच्च विकासाचा खरा मार्ग आहे.
मित्रांनो, प्रश्न हे नाहीत की आपण एकमेकांना किती त्रास देतो. प्रश्न आहे, आपण एकमेकांना किती आधार देतो ? आणि त्यांचे विचार आपण समजून घेतो?
आपण एकत्र येऊन सामाजिक, वैचारिक आणि आर्थिक अंधःकार दूर करतो का?
कारण आपली पुढची पिढी हीच आपली खरी जबाबदारी आहे.
म्हणून चला,आपण वादाच्या साखळ्या तोडूया, आणि विचारांच्या प्रकाशात चालत नव्या भविष्याची वाट घडवूया!
जयभिम जय भारत, जय संविधान मित्रांनो.. 🙏
-एक साहित्यप्रेमी, विवेकवादी आणि समाजमाध्यमकार..
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख
The Spirit of Zindagi Foundation
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
#होयमीमार्क्सवादी #PhuleShahuAmbedkar #Ambedkarite #Vivekवाद #SocialJustice #Equality #PhilosophyOfLife #IndianConstitution #Bahujan #पुरोगामीविचार #ProgressiveIndia #Buddhivadi #Rationalism #JaiBhim #Marxist #PhuleShahuAmbedkarThoughts #NoCasteNoReligion #FreedomOfThought #मानवतेचाधर्म #संविधानरक्षक #VivekShakti #KnowledgeIsPower #StopCasteism #HumanRights #VicharAndolan #SocialRevolution #SpiritOfZindagi #YouthForChange #BahujanVoice #educationforallchildren #Satyashodhak #EqualityForAll #SocialTransformation #विचारांचा_प्रकाश #futureofindia #awakening #Prabodhan #BAHUJANMOVEMENT, #विद्यार्थीमित्र , #learning, #jaibhim , #leadership, #AI, #karlmarx
Post a Comment