आपण एका रस्त्यावर चालताना एक माणूस पाहतो तर तों माणूस गाडी ओढतो आहे. पण त्या गाडीत धान्याचे पोते, बाजारातील माल किंवा घरगुती सामान नाही. त्या गाडीत आहे फक्त त्याचं प्रचंड, जड, अवाढव्य डोकं..!
ते डोकं म्हणजे फक्त कवटीचा आकार नाही; ते आहे चिंतेचं ओझं, पश्चात्तापाची विटं, भीतीचे दगड, ईर्ष्येचे काटे, तुलनेचे खडे आणि काळजीची वाळू. तो माणूस चालतो आहे, पण प्रत्येक पावलागणिक ओझं वाढतंय. कारण गाडी रिकामी असूनही ती त्याच्या मनाच्या गुंतागुंतीने गच्च भरलेली आहे..
जीवन असंच नाही का?
आपण भूतकाळाच्या खंतांचा पिशवीत भर करतो, भविष्याच्या काळज्यांचे पोते बांधतो आणि नंतर त्या गाडीला आपणच स्वतः ओढत राहतो. पण ज्या क्षणी आपण या ओझ्यावर ताबा मिळवतो, अनाठायी विचारांचे गाठोडे बाजूला ठेवतो, त्या क्षणी आपण पाहतो की जीवन किती हलके, मोकळे आणि गगनाएवढे विशाल होऊन जातं..!
वर्तमान म्हणजेच खरी संपत्ती. तोच क्षण आपल्या हाती असतो. वर्तमानावर लक्ष केंद्रित केलं, तर भूतकाळ आपल्याला कुरतडत नाही आणि भविष्य आपल्याला घाबरवत नाही..
मन रिकामं असलं की गाडी वेगाने धावते. मन स्वच्छ असलं की प्रवास आनंदाचा होतो. मन मुक्त असलं की जीवन म्हणजेच उत्सव ठरतो..!
म्हणूनच...डोकं ओझं होऊ देऊ नका. त्याला विचारांचा कैदखाना न बनवता, स्वप्नांचा बाग बनवा. वर्तमानावर जगायला शिका, कारण आजचं हसू उद्याच्या अश्रूंना पुसण्याची ताकद ठेवतं मित्रांनो...
“ संयमपणा हीच खरी ताकद आहे, वर्तमानातच खरा आनंद आहे, आणि मुक्त मनातच खरा विश्व आहे.”
-विचार संकलन आणि संपादन.. ✍️
-एक साहित्यप्रेमी आणि समाजमाध्यमकार..
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख
The Spirit of Zindagi Foundation
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
#विचार #प्रेरणा #मनाचंओझं #वर्तमान #जीवन #संयम #स्वत:चाविचार #चिंतन #प्रबोधन #मनस्वी #शांतता #आनंद #मुक्तमन #सकारात्मकता #जीवनप्रवास #स्वत:चाअनुभव #ज्ञानदीप #प्रेरणादायीलेखन #Motivation #Inspiration #PositiveVibes #Mindset #Peace #Happiness #LifeLessons #Thoughts #Wisdom
Post a Comment