भारतात दर 8 मिनिटाला एक आत्महत्या..!
धक्कादायकचं..!

आजच्या वर्तमानपत्रातील ह्या तीन- चार बातम्यांनी मन अगदी सुन्न आणि उदास झालयं..!

सर्वं सामान्यपणे पहिल्या दोन आत्महत्या शेतकऱ्यांच्या, पुढच्या तीन विद्यार्थ्यांच्या, तर उर्वरित व्यापारी, शिक्षक, युवा आणि व्यवसायिकांच्या...!

ही फक्त आकडेवारी नाही, तर जिवंत समाजाची हळहळ, तुटलेली आशा आणि उद्ध्वस्त झालेल्या घरांची कहाणी आहे..
आज आई-वडील, शिक्षक, समाज, प्रशासन, नेते, राजकारणी, अभ्यासक, मनोचिकित्सक, पत्रकार, विचारवंत आणि आपण प्रत्येकाने स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे...
"ह्या आत्महत्यांना जबाबदार कोण?"
आपण आर्थिक सत्तास्वार्थ, राजकीय दिखाव्याच्या झगमगाटात, आणि भौतिक प्रगतीच्या आंधळ्या शर्यतीत गुरफटून आपली संवेदनशीलता हरवून बसलो आहे का?
तांत्रिक प्रगती असूनही मानसिक स्वास्थ दिवसेंदिवस अस्वस्थ का होतं आहे?
खरं तर, ह्याचं मुळं खोलवर आहे..
म्हणूनच गरज आहे..

फक्त मोबाईल, टीव्ही आणि सोशल मीडियाच्या गोंगाटात हरवू नये, तर एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून मन जाणून घेण्याची.

अपयश पचवण्याचं, भावनांचं व्यवस्थापन करण्याचं, आणि मानसिक संतुलन टिकवण्याचं शिक्षण देण्याची.

"कोण माझं?" या प्रश्नात एखादं जीवन न थांबता, मी आहे तुझ्यासाठी हा दिलासा मिळेल अशी सामाजिक बांधिलकी निर्माण करण्याची.

मानसिक आरोग्यासाठी सहज उपलब्ध सल्ला केंद्रं, हेल्पलाईन, समुपदेशन यंत्रणा आणि जनजागृती उपक्रम बळकट करण्याची.


आत्महत्या हा उपाय नाही, ती फक्त एका क्षणाची अंधारी चूक आहे.
माणूस तुटतो, पण तुटलेली माणसं समाज तुटवत नाहीत..उलट समाजाने त्यांना जोडावं लागतं..
म्हणूनच आपण प्रत्येकाने ठरवलं पाहिजे..
“मी माझ्या भोवतालच्या माणसाला जगण्यासाठी आधार देईन, ऐकेन, समजून घेईन.”
कारण आत्महत्या थांबवणं ही फक्त शासनाची जबाबदारी नाही.. ती आपल्या संवेदनशीलतेची, प्रगल्भतेची आणि माणूस म्हणून असलेल्या कर्तव्याची खरी परीक्षा आहे मित्रांनो..
अस्वस्थ वर्तमानातुन....

- एक संवेदनशील अभिव्यक्ती.. 

सल्लागार आणि करिअर मार्गदर्शक
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख
The Spirit of Zindagi Foundation

#आत्महत्या #मानसिकआरोग्य #MentalHealthMatters #जीवनमहत्वाचे #StopSuicide #HopeNotHarm #संवाद #ListenToUnderstand #SupportNotStigma #जीवनशिक्षण #EmotionalWellbeing #BeKind #मानसिकस्वास्थ्य #LifeIsPrecious #TogetherForLife #जीवनाला_होकार #NoMoreSilence #YouAreNotAlone #मानवता #SpreadHope #युवाशक्ति #शिक्षणमहत्वाचे #TalkAboutIt #CommunityCare #AwarenessToAction #सकारात्मकबातमी #HelpNotHush #SupportAndListen #MentalHealthIndia #thespiritofzindagi
Post a Comment