वेळ घेते परीक्षा, कितीही कठीण असो प्रसंग,
स्वाभिमान जपणाऱ्याच्या मनात नसतो पराभवाचा रंग।
वादळे आली तरी पाऊल त्याचे थांबत नाही,
ताठ मानेने जगणाऱ्याची ज्योत कधी विझत नाही।
माणसे बदलती, चेहरे बदलती, बदलतो काळाचा मान,
तत्त्वांशी नाते राखणारा जपतो स्वतःचा स्वाभिमान।
जग कितीही म्हणो, “थोडं झुका, थोडी तडजोड करा,”
स्वतःच्या नजरेत पडण्यापेक्षा एकटं उभं राहा!
कृपेच्या सावलीत जगण्यापेक्षा उन्हात उभं राहणं बरं,
परावलंबी सुखापेक्षा स्वाभिमानाचं दुःखही खरं।
दोन घास कमी मिळाले तरी कपाळ राहू दे ताठ,
स्वतःच्या कष्टांची भाकरीचं असते जीवनाची खरी वाट।
पैसा जाईल, सत्ता जाईल, संपतील वैभवाचे मान,
पण गमावला स्वाभिमान तर रिकामे होते जीवनभान।
धन पुन्हा मिळेल, माणसे पुन्हा येतील दारी,
पण स्वाभिमान हरवला तर उरत नाही किंमत सारी।
जग झुकविण्याचा प्रयत्न करील, देतील मोह हजार,
तत्त्वांशी सौदा करणाऱ्याचा विजयही ठरतो बेकार।
एकटेपणाची भीती नको, सत्याची धरावी वाट,
स्वाभिमानाची मशाल घेऊन चालत राहा ताठ!
परिस्थितीसमोर झुकावे कधी, ही जगण्याचीच रीत,
पण स्वाभिमान विकून मिळवलेली
प्रत्येक जिंकणं असते जीत नव्हे..हार निश्चित।
म्हणून संकटे आली तरी मनात ठेवावी जाण,
जग काहीही म्हणो..
सर्वांत आधी जपावा स्वतःचा स्वाभिमान!
कारण आयुष्य क्षणभंगुर, पण तत्त्वांची राहते शान;
धन-दौलत हरवली तरी चालेल..
पण शेवटच्या श्वासापर्यंत जिवंत राहू दे
आपला स्वाभिमान..!
— विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख.. ✍️
एक साहित्यप्रेमी, विवेकवादी आणि समाजमाध्यमकार..
🔰 The Spirit of Zindagi Foundation
"मानवी सामर्थ्याला जागवणारं प्रेरणेचं क्षितिज..!"
Inspire | Educate | Empower | Excel
Post a Comment