🔰कॉ. नजीर शेख (पुरोगामी विचारांचा स्नेही मित्र – नांदेड)
Najir Shaikh..
आज आपला वाढदिवस..केवळ एका व्यक्तीच्या आयुष्यातील एक तारीख नव्हे, तर संघर्ष, चिंतन आणि सामाजिक बांधिलकीने घडलेल्या प्रवासाचा उत्सव आहे.
आपला कौटुंबिक, शैक्षणिक आणि सामाजिक संघर्ष हा केवळ वैयक्तिक अनुभवापुरता मर्यादित न राहता, इतरांच्या वैचारिक संघर्षांना दिशा देणारा आणि बळ देणारा ठरला आहे, मित्रा.
संघर्षाला जर विचारांची साथ मिळाली, तर तो परिवर्तनाचं साधन ठरतो...हेच आपल्या जीवन प्रवासातून सातत्याने अधोरेखित होतं.
आपली ओळख वैचारिक द्वंद्वातून झाली; परंतु त्या द्वंद्वातूनच आपलं सच्चेपण, प्रामाणिक कार्यकर्तृत्व आणि पुरोगामी विचारांची समृद्ध खाण असलेलं अभ्यासू व्यक्तिमत्त्व अधिक ठळकपणे समोर आलं.
प्रश्न विचारणं, आत्मपरीक्षण करणं आणि विवेकाच्या कसोटीवर समाजाकडे पाहणं हीच आपल्या विचारांची खरी ओळख आहे.
आपलं वैचारिक चिंतन मुस्लिम समाजाला आत्मपरीक्षणाकडे, अंतरमुखतेकडे आणि विवेकशीलतेकडे नेणारं आहे. परंपरेच्या आड लपलेल्या रूढींवर प्रश्न विचारत समाजाला प्रगतीच्या दिशेने नेण्याचं धैर्य आपल्या विचारांत दिसून येतं.
या प्रवासात आपला वैचारिक स्नेह आणि सहकार्य मला नेहमीच मार्गदर्शक ठरलं आहे, मित्रा.
आज, या वाढदिवसाच्या निमित्ताने, आपल्या विचारांची मशाल अधिक उजळो, संघर्षाची धार अधिक तीव्र होवो आणि सामाजिक परिवर्तनाच्या वाटेवर आपलं पाऊल अधिक ठाम राहो..याच मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा मित्रा..! 🌹
इन्कलाब जिंदाबाद आणि क्रांतिकारी लाल सलाम कॉम्रेड..✊
आपलाच वैचारिक स्नेही-मित्र 🙏🏻
#विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख..
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
https://tinyurl.com/mr86yzwk
Post a Comment