अर्जुन (नाना) पंडित
(आंबेडकरी चळवळीची बुलंद तोफ)
अर्जुन नाना पंडित
वर्गमित्र म्हणून सुरू झालेला प्रवास काळाच्या ओघात सामाजिक चळवळीतील सजग, सक्रिय आणि वैचारिक सहप्रवासी मित्रापर्यंत येऊन पोहोचला तो म्हणजे अर्जुन नाना पंडित.
माझ्या शैक्षणिक आणि सामाजिक संघर्षाच्या प्रत्येक टप्प्यावर, कोणतीही अपेक्षा न ठेवता पाठीशी उभा राहणारा, धीर देणारा आणि योग्य दिशा दाखवणारा जिवलग स्नेही मित्र म्हणजे अर्जुन नाना.. मैत्री ही केवळ सहवासाची नसते, तर विचारांची आणि मूल्यांची असते हे नानांच्या सहवासातून सातत्याने अधोरेखित होत गेले.
सामाजिक कार्यातील नानांची प्रामाणिक धडपड, स्थानिक प्रश्नांवर उभ्या केलेल्या जन आंदोलनांची ठाम भूमिका, परिसरातील न्याय व हक्कांसाठी दिलेला प्रदीर्घ आणि न थकणारा लढा..हे सारे केवळ कार्यकर्तृत्व नसून, चळवळीतील प्रत्येक सामान्य कार्यकर्त्यासाठी एक जिवंत प्रेरणास्त्रोत ठरले आहे.
" पद, प्रसिद्धी किंवा श्रेय यापेक्षा विचार, बांधिलकी आणि संघर्षनिष्ठा महत्त्वाची असते.." हे अर्जुन नानांच्या कार्यातून स्पष्टपणे जाणवते.
आज आपला वाढदिवस...हा दिवस केवळ वैयक्तिक आनंदाचा नसून, आंबेडकरी चळवळीतील एका निष्ठावंत सैनिकाच्या कार्याचा गौरव करणारा क्षण आहे. अशी माणसं चळवळीला दिशा देतात, समाजाला विवेक देतात आणि पुढील पिढीला संघर्षाची प्रेरणा देतात.
अर्जुन नाना पंडित यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
आपली वैचारिक मशाल अधिक तेजस्वी होवो, संघर्षाची ऊर्जा अखंड राहो आणि सामाजिक न्यायाच्या लढ्यात आपलं पाऊल सदैव ठाम राहो हीच सदिच्छा मित्रां..! ✊🔥
जयभिम | जयभारत | जय संविधान | क्रांतीकारी सलाम 🙏
आपलाच वैचारिक स्नेही-मित्र 🙏🏻
#विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख..
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
https://tinyurl.com/mr86yzwk
Post a Comment