नव्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो..!🌹
नववर्षाच्या पावन उंबरठ्यावर उभे असताना, सर्वप्रथम आपणा सर्वांना नववर्षाच्या मनःपूर्वक, हार्दिक आणि मंगलमय शुभेच्छा, मित्रांनो..!
हे येणारे नवे वर्ष आपल्या आयुष्यात सुख, समाधान, समृद्धी, उत्तम आरोग्य, शांती, आनंद आणि भरभराट घेऊन यावो. प्रत्येक दिवस अल्हाददायक असो, प्रत्येक क्षण उत्साहाने उजळलेला असो आणि प्रत्येक पाऊल आशेच्या प्रकाशात पुढे सरकणारे असो हीच मनःपूर्वक सदिच्छा मित्रांनो..
या सुंदर प्रवासात, आम्ही सदैव आपल्या सावलीसारखे आपल्यासोबत आहोत, हे विश्वासाने सांगू इच्छितो..
नववर्ष म्हणजे केवळ कॅलेंडरवरील तारीख बदलणे नव्हे; ते म्हणजे मनातील जुने ओझे उतरवून आत्म्याला नवी दिशा देणे होय. आजवर आपल्या आयुष्यात घडलेले कटू अनुभव, दुःखद प्रसंग, अपयशाच्या आठवणी जर त्या आज आपल्या प्रगतीसाठी उपयुक्त नसतील, तर त्या मनाच्या कपाटातून हळुवारपणे काढून टाकाव्यात..
जसे मोबाईलचे स्टोरेज भरले की आपण निरुपयोगी फाईल्स डिलीट करतो, तसेच मनातील अनावश्यक वेदना, राग आणि निराशा हटवून आशा, विश्वास आणि सकारात्मकतेसाठी जागा निर्माण करावी.
त्या रिकाम्या जागेत आपण भरूया..नवी स्वप्ने, नवा जोम, नवे ध्येय, सद्गुणी मित्रमैत्रिणी आणि सृजनशील विवेकी विचार..
भूतकाळातील जे चांगले आहे ते जपूया, त्यातून शिकूया; पण जे आपल्याला मागे खेचते, त्याला पुढच्या वाटेवर ओढू देऊ नका.
येणाऱ्या वर्षात आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे ही काळाची गरज आहे. निरोगी शरीरातच सशक्त विचार आणि तेजस्वी आत्मा वसतो. त्याचबरोबर, आपल्या वागणुकीमुळे कोणालाही दुःख, त्रास किंवा नुकसान होणार नाही, याची सजग काळजी घेणे हेच खरे मानवतेचे लक्षण आहे.
" इतरांच्या सुखात आपला आनंद शोधता आला, तर आयुष्य आपोआप समृद्ध होते."
चला तर मग मित्रांनो, आपल्या मनातील नकारात्मकता, राग, लोभ, मत्सर, हेवा-दावा यांना निरोप देऊया. त्यांच्या जागी सकारात्मक ऊर्जा, दृढ इच्छाशक्ती, सतत प्रेरणा, कृतीशीलतेचा आणि विवेकाचा दीप प्रज्वलित करूया.
विचारांपुरते न थांबता, कृतीत उतरूया..कारण यश हे स्वप्न पाहणाऱ्यांपेक्षा प्रयत्न करणाऱ्यांचेच असते.
या नववर्षाला आपण आपल्या आयुष्यातील सर्वात यशस्वी, अर्थपूर्ण आणि समाधानकारक वर्ष बनवण्याचा संकल्प करूया. चिकाटी, प्रामाणिकपणा आणि आत्मविश्वासाच्या बळावर हे वर्ष चैतन्यमय, आनंदमय आणि स्मरणीय करूया.🥰
नववर्षातच नव्हे, तर प्रत्येक वळणावर, माझी आपणा सर्वांना माझ्या परीने साथ लाभत राहील, हा विश्वास आणि सद्भावनेचा शब्द देतो.🙏
✨ नववर्षाच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा..!🌹
नवे वर्ष नवी दिशा, नवे स्वप्न आणि नवा उजाळा घेऊन यावे, हीच सदिच्छा, मित्रांनो..🌹
धन्यवाद मित्रांनो.. 🙏
आपलाच एक वैचारिक स्नेहीं मित्र.. ✍️
-शब्दांकन..✍️
🎓 #विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख
The Radical Humanist..
साहित्यप्रेमी | विवेकवादी | समाजमाध्यमकार
🔰 The Spirit of Zindagi Foundation..
"मानवी सामर्थ्याला जागवणारं प्रेरणेचं क्षितिज..!"
Inspire | Educate | Empower | Excel
🔰डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन..
"Nurturing Potential Through Education"
शिक्षण | सेवा | प्रेरणा | प्रबोधन | सामाजिकता | संशोधन
Post a Comment