🎓 Periyar E. V. Ramasamy : स्वाभिमानाची ज्योत प्रज्वलित करणारा विवेकाचा महा तारा..— अन्यायाविरुद्ध उभा राहणारा आवाज नव्हे, तर संपूर्ण युगाला जागवणारी क्रांती..!
मानवी सभ्यतेच्या प्रवासात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, ज्या केवळ इतिहासात स्थान मिळवत नाहीत; तर इतिहासाला नव्याने अर्थ देतात. विचारांच्या अंधारात दिशाहीन समाजाला विवेकाचा दीप देऊन जागवतात… आणि शतकानुशतकं काळोख्या असमानतेच्या साखळ्यांना छेद देतात.
अशा विलक्षण तेजस्वी आणि क्रांतिकारक व्यक्तिमत्त्वाचे नाव म्हणजे Periyar E. V. Ramasamy, स्वाभिमानाचे जनक, द्रविड चेतनेचे जागृत शिल्पकार आणि विवेकवादाचा अनंत दीपस्तंभ.
🔰Periyar E. V. Ramasamy हे कोण होते..?🤔
Periyar E. V. Ramasamy (1889–1973) हे तमिळनाडूतील एक प्रखर समाजसुधारक, तर्कवादी विचारवंत आणि द्रविड चळवळीचे जनक होते. त्यांनी सामाजिक समानता, जातिभेद निर्मूलन आणि स्त्री-स्वातंत्र्य यासाठी आयुष्यभर लढा दिला. त्यांच्या विचारांनी दक्षिण भारतीय समाज-राजकारणाला नवे दिशा दिल्या.
🔰स्वाभिमानाच्या क्रांतीचे बीज..
1879 साली ईरोडच्या शांत भूमीत जन्मलेला हा बालक सामान्य नव्हता. त्याच्या डोळ्यांत सत्याचा शोध होता आणि मनात अन्यायाविरुद्ध बंडाची तगमग..
कांशीतील भेदभावाचा कडू अनुभव हा त्यांच्या विचारक्रांतीचा पहिला शण होता..
त्यांनी जाणले,
" ज्या समाजात मनुष्य मनुष्याला कमी लेखतो, त्या समाजाचा विकास कधीच होऊ शकत नाही. "
ह्या जाणीवे क्षणचं पुढे स्वाभिमान चळवळीच्या ज्वालामुखीत परिवर्तित झाला.
🔰 Self-Respect Movement - मानवतेला नवा अर्थ देणारी क्रांती..
1925 मध्ये पेरियारांनी सुरु केलेली स्वाभिमान चळवळ हे फक्त आंदोलन नव्हती,ती माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार,तर्काने विचार करण्याचा स्वातंत्र्य,स्त्री-पुरुष समानतेचा आग्रह,जात, धर्म आणि कर्मकांडांवर केलेला निर्भय प्रहार या सर्वांचा उद्गार होती.
त्यांनी जगाला शिकवले, “ माणूस श्रेष्ठ आहे की नीच हे जन्म नाही, तर विचार ठरवतात.”
त्यांची प्रत्येक सभा जणू बुद्धाच्या करुणेची, कबीरांच्या निर्भयतेची आणि फुले-आंबेडकरांच्या न्यायसूत्रांची एकत्र प्रतिध्वनी होती.
🔰 अंधश्रद्धा, जातिवाद आणि असमानतेविरुद्ध निर्भय लढाई..
पेरियारांनी प्रस्थापित व्यवस्थेच्या गर्वगर्जनांवर प्रहार केला.
ते म्हणत “समाजाला मागे खेचणारी प्रत्येक विचारसरणी म्हणजे अंधार,आणि त्या अंधारावर पहिला प्रहार म्हणजे विवेक.”
त्यांनी जातिभेदाचा मुखवटा फाडला, धार्मिक अंधश्रद्धेच्या दरबारींचे खोटे उघडे केले, आणि स्त्रीला समाजाचा ‘अंगभूत’. नव्हे, तर ‘समान’ भाग म्हणून प्रतिष्ठा मिळावी यासाठी अविरत संघर्ष केला.
🔰 स्त्री स्वातंत्र्याचे अग्रदूत..
त्या काळात स्त्रियांच्या शिक्षणावर बंधने होती, विधवांना अंधारात ढकलले जात होते, आणि समाजाने स्त्रीला दुय्यम स्थान दिले होते.
पेरियारांनी निर्भीडपणे सांगितले,
“ स्त्रीशिवाय समाजाचा जन्मच नाही; मग तिच्यावर अन्यायाची सत्ता कशी..? ”
ते आंतरजातीय विवाह, विधवा पुनर्विवाह, स्त्री-स्वातंत्र्य, संपत्तीवरील अधिकार आणि समान शिक्षणासाठी ज्वलंत लढा देत राहिले.
🔰 द्रविड चेतनेचा प्रखर शिल्पकार..
1944 मध्ये स्थापन केलेल्या द्रविड कळघमने दक्षिण भारतातील राजकीय-सामाजिक संरचनेत मूलभूत बदल घडवले.
पेरियारांनी सांगितले,
“ओळख म्हणजे जात नव्हे; माणूसपण आहे.”
त्यांच्या विचारांनी तमिळनाडूतील सामाजिक न्यायाची पायाभरणी केली.
आज ‘आरक्षण’, ‘समानता’, ‘सामाजिक न्याय’ या संकल्पना ज्या उंचीवर पोहोचल्या आहेत, त्यात पेरियार यांच्या योगदानाची ठसठशीत छाप आहे.
🔰विचारांचा प्रचंड वारसा..
त्यांचे लेखन, भाषणे आणि चळवळी म्हणजे सत्य, विवेक, मानवता आणि स्वाभिमान यांचा अविनाशी संगम होता..त्यांचा आवाज आजही सामाजिक सुधारकांच्या कार्यात उमटतो.त्यांचे विचार आजही तर्कवादी चळवळींच्या घोषणांमध्ये घुमतात, आणि त्यांची चेतना आजही प्रत्येक न्यायप्रिय कार्यकर्त्याच्या स्वप्नात जळत असते.
“ धैर्य, तर्क आणि न्यायाचा त्रिवेणीसंगम—पेरियारांची विचारपरंपरा.”
🔰विचार कधीच मरत नाहीत…
24 डिसेंबर 1973 रोजी त्यांचे शरीर मावळले,पण पेरियार मरण पावले नाहीत.
कारण..
" विचारांना मृत्यू नसतो, क्रांतीला अंत नसतो,स्वाभिमानाची ज्योत विझत नाही."
आजही त्यांच्या विचारांतून लाखोजनांना समतेचा, आत्मसन्मानाचा आणि तार्किकतेचा प्रकाश मिळतो.
पेरियार यांचे जीवन म्हणजे एक अविरत क्रांती, एक सत्यासाठीची उर्मी, एक अन्यायाविरुद्धचा निर्भय आक्रोश,आणि एक जगाला दिलेला अनंत संदेश.
“जीवनाचा सर्वोच्च धर्म एकच अन्याय कुठेही दिसला, तर त्याचा प्रतिकार करणे.”
आज समाजाचा प्रत्येक घटक जागरूक होत आहे, विचार बदलत आहेत…आणि या बदलांमध्ये पेरियार यांच्या चेतनेचा प्रकाश अजूनही झळाळत आहे.
“ विचारांना पंख देणारा, मानवतेला दिशा देणारा आणि समाजाला आरसा दाखवणारा महापुरुष—पेरियार.”
आजचा काळ विज्ञानयुगाचा असला, तरी मनुष्याच्या विचारविश्वात अजूनही अनेक जुन्या साखळ्या घट्ट अडकलेल्या आहेत..अंधश्रद्धेच्या, लैंगिक असमानतेच्या, जातभेदाच्या आणि सामाजिक तिरस्काराच्या.
अशा वेळी पेरियार यांचे विचार केवळ भूतकाळातील क्रांती नसून आजच्या प्रत्येक प्रगतिशील प्रवासाचे दिशादर्शक तत्वज्ञान आहेत.
त्यांनी दिलेला संदेश होता,विवेकाने विचार करा, प्रश्न विचारा आणि जे चुकीचे आहे ते बदलण्याचे धैर्य ठेवा.
आजचा तरुण समाज माहितीच्या महासागरात पोहत असला तरी सत्य आणि असत्य यातील फरक ओळखण्यासाठी पेरियार यांच्या तर्कवादाची अतिशय आवश्यकता आहे.
त्यांच्या मूल्यांशिवाय आधुनिक समाजाचे स्वातंत्र्य अर्धवटच राहिले असते.
“ समाजाच्या अंधारात विवेकाचा पहिला प्रकाश बनणारा द्रविड चेतनेचा क्रांतिकारक – Periyar.”
आजही जेव्हा कोणत्याही प्रकारचा अन्याय दिसतो, स्त्री-पुरुष असमानतेची विषमता उफाळून येते, जातनिहाय भेदभावाचे अवशेष पाठीशी लागतात..तेव्हा पेरियार यांची स्वाभिमानाची चळवळ नव्या जोमाने आपल्या मनात चेतवते.
त्यांच्या विचारांचा अस्सल अर्थ असा की मनुष्याच्या सन्मानापेक्षा मोठे कोणतेही तत्त्व नाही आणि मानवतेपेक्षा मोठी कोणतीही ओळख नाही.
म्हणूनच पेरियार यांचे जीवन, त्यांचा वारसा आणि त्यांची क्रांती आजच्या जगासाठी अधिक सुसंगत, अधिक प्रखर आणि अधिक मार्गदर्शक ठरते.
पेरियार आपल्याला सांगून जातात..
“समाज बदलण्यासाठी मोठी तलवार नको; प्रामाणिक विचार, निर्भय आवाज आणि न्यायाची न विझणारी ज्योत पुरेशी असते.”
आणि हीच ज्योत आजच्या पिढीने पेटती ठेवली, तर समाजाला खरी मुक्ती..विचारांची, मानवतेची आणि स्वाभिमानाची..नक्कीच प्राप्त होईल, मित्रांनो..
धन्यवाद, मित्रांनो..🙏
(टीप : वरील लेख हा विविध मुक्त स्रोतांतील माहिती संकलित करून सादर केलेला संशोधित स्वरूप आहे.)
-विचार संकलन आणि संपादन..✍️
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख...
-एक साहित्यप्रेमी, विवेकवादी आणि समाजमाध्यमकार..
🔰 The Spirit of Zindagi Foundation
"मानवी सामर्थ्याला जागवणारं प्रेरणेचं क्षितिज..!"
Inspire | Educate | Empower | Excel
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
"Nurturing Potential Through Education"
शिक्षण | सेवा | प्रेरणा | प्रबोधन | सामाजिकता | संशोधन..
#Periyar #EVRamasamy #SelfRespectMovement #DravidianMovement #SocialJustice #Rationalism #Equality #HumanRights #AntiCaste #PeriyarThoughts #Periyarism #WomenEmpowerment #SocialReform #Inspiration #Motivation #VicharKranti #SamajSudhar #Ambedkarite #PhuleAmbedkarThought #TamilNaduReform #DravidianIdeology #PeriyarQuotes #RevolutionaryLeaders #Humanism #Awareness #EducationForAll #FreedomOfThought #BreakCaste #AgainstBlindFaith #ModernThought #YouthInspiration #SocialAwakening #Vivekवाद #SamataAndolan #JusticeForAll #ProgressiveIndia #ThinkersOfIndia #ReformersOfIndia #PeriyarLegacy #VoiceAgainstInjustice #Periyar #EVRamasamy #PeriyarRevolution #SelfRespectMovement #DravidianMovement #Rationalism #SocialJustice #AntiCaste #EqualityForAll #WomenRights #Humanism #PeriyarLegacy #BreakTheChains #ThinkFree #InspireChange #SocialReform #AwarenessMovement #ProgressiveThoughts #IndianReformers #DravidianIdeology #VoiceOfReason #AgainstBlindFaith #Periyarism #RevolutionaryThoughts #VivekAndolan #YouthAwakening #HumanRightsMovement #SamajSudhar #ModernReformers #AmbedkariteThought #PhuleThought #JusticeMovement #SamataAndolan #SocialEquality #EmpowerHumanity #EducationForChange #ThoughtLeader #PeriyarQuotes #InspirationDaily #motivationalthoughts
Post a Comment