🎓 सदिच्छा ग्रेट भेट : कॉम्रेड नसीर शेख आणि कॉम्रेड शेख आयुब..
(राज्य पदाधिकारी – Democratic Youth Federation of India)
शैक्षणिक आणि सामाजिक कार्याच्या विस्तीर्ण आकाशात गेल्या दोन दशकां पेक्षा जास्त काळा पासून कार्यरत असताना, अनेक व्यक्ती, अनेक विचारधारा आणि अनेक संघर्ष माझ्या वाट्याला आले. पण त्यातही प्रामाणिकपणे सामाजिक परिवर्तनाच्या प्रवासात जीव ओतून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची भेट ही नेहमीच मनाला नवी ऊर्जा देते.
विचारांची देवाणघेवाण हीच खरी माणसांची स्नेहमिलनाची भाषा असते, आणि ते भाग्य मला सतत लाभत आलं आहे, मित्रांनो…
काल अनपेक्षितपणे आमच्या डॉ. कलाम विद्यार्थी फाउंडेशन या शैक्षणिक परिवाराला दोन असामान्य वैचारिक सहप्रवाशांची मनःपूर्वक सदिच्छा भेट घडली..
कॉम्रेड नसीर शेख आणि कॉम्रेड शेख आयुब...
ह्या भेटीत एकात्मता होती, दिशा होती आणि संघर्षातून उगवणाऱ्या प्रकाशाची अनुभूती होती.
ह्या वैचारिक स्नेह सदिच्छा भेटीत झालेल्या अभ्यासपूर्ण संवादात मला त्यांच्या संघर्षमय प्रवासाचा जवळून परिचय झाला.
विचारांच्या खाणीमध्ये उतरताना प्रत्येकवेळी नवं काही सापडतं, तसं या दोन्ही कॉम्रेड्सकडून खूप काही शिकायला मिळालं..हे माझं सौभाग्यचं..!
कॉम्रेड नसीर शेख : संघर्षाचे अढळ प्रतीक..
कॉ. नसीर शेख यांनी स्वतःचं आयुष्य शब्दशः सामाजिक चळवळीला वाहिलं आहे. कौटुंबिक संघर्ष, सामाजिक विरोध, प्रशासनाची उदासीनता या सर्वांशी झुंज देत ते विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी सतत उभे राहिले.
शासनदरबारी विद्यार्थ्यांचे प्रश्न नेमकेपणाने मांडणे,वंचित, उपेक्षित, दुर्लक्षित समाजाच्या वेदनेला आवाज देणे,अन्यायकारक व्यवस्थेच्या विरोधात निर्भय भूमिका घेणे,समाजमाध्यमांच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधणे…
एक जागृत नागरिक, एक अभ्यासू कार्यकर्ता आणि युवांच्या भविष्याला धार देणारा खरा कॉम्रेड कसा असतो, याचं जिवंत उदाहरण म्हणजे कॉम्रेड नसीर शेख..!
कॉम्रेड शेख आयुब - शिक्षणक्षेत्रातील तेजस्वी नेतृत्व..
कॉ. शेख आयुब यांचा शैक्षणिक व सामाजिक प्रवासही तेवढाच प्रेरणादायी आहे.शिक्षणक्षेत्राला उच्च दर्जाचा मान देत, स्वतःला सिद्ध करण्याची त्यांची धडपड..ही केवळ वैयक्तिक मेहनत नव्हे, तर समाजाच्या भविष्यातील पिढीला घडवण्याची दूरदृष्टी आहे.
त्यांच्या नेतृत्वात आत्मविश्वास आहे, विचार आहे आणि सामाजिक परिवर्तनाची ओढ आहे.
सलाम या दोन्ही कॉम्रेडसना…🙏
त्यांचा प्रामाणिक संघर्ष, त्यांची जिद्द, आणि समाजासाठीचे समर्पण हे आजच्या नव्या नेतृत्वाला एक नवी दिशा देऊ शकेल..असा दृढ विश्वास मी मनाशी बाळगतो, मित्रांनो.
आम्हांस आपला सार्थ अभिमान, मित्रांनो.. 🙏
या वैचारिक सहवासात घालवलेला वेळ हा माझ्यासाठी अमूल्य ठरला. त्यांच्याकडून मी जे शिकलो, ते माझ्या पुढच्या कामाला नवी उंची देणार यात शंकाचं नाही, मित्रांनो..
संघर्षाची वाट कधीच सोपी नसते…पण ज्यांची मने विचारांनी प्रकाशमान असतात, त्यांचा मार्ग समाजासाठी दीपस्तंभ ठरतो.
- आपलाच एक वैचारिक स्नेहीं..✍️
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख...
-एक साहित्यप्रेमी, विवेकवादी आणि समाजमाध्यमकार..
🔰 The Spirit of Zindagi Foundation
"मानवी सामर्थ्याला जागवणारं प्रेरणेचं क्षितिज..!"
Inspire | Educate | Empower | Excel
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
"Nurturing Potential Through Education"
शिक्षण | सेवा | प्रेरणा | प्रबोधन | सामाजिकता | संशोधन
Post a Comment