डॉ. बाबा आढाव हे समाजसेवक आणि शिक्षणतज्ज्ञ होते, ज्यांनी आपल्या जीवनात दिनदुबळ्या, गरीब, शोषित आणि वंचित वर्गासाठी निरंतर कार्य केले.त्यांचा उद्देश होता समानता, शिक्षण आणि मानवतेच्या मूल्यांद्वारे समाजात बदल घडवणे.
आज एक अशी व्यक्ती आपल्या जीवनातून आम्हाला सोडून गेली, जिने समाजाच्या कष्टकरी, शोषित आणि वंचित घटकांसाठी आपले जीवन समर्पित केले. दिनदुबळ्या, गोरगरीब, अति पीडित लोकांचे सोबतीने आणि अंतर्मनाच्या सहानुभूतीने जेवढे कार्य करणारे कमीच व्यक्तिमत्त्वे भेटतात, त्यापैकी एक होते डॉ. बाबा आढाव.
त्यांच्या उपस्थितीमुळे गरीब, कष्टकरी आणि आमच्या समाजातील विसरलेल्या वर्गांना जीवनात आशेचा, न्यायाचा आणि मार्गदर्शनाचा प्रकाश मिळाला.
डॉ. बाबा आढाव हे फक्त वैद्यक किंवा शिक्षक नव्हते, तर त्यांनी मानवतेचे शुद्ध रूप साकारले. त्यांनी आपल्या कृतीतून शिकवले की खरं योगदान हे पदवी, प्रतिष्ठा किंवा आर्थिक संपत्तीमध्ये नसते, तर मानवतेच्या सेवेत, दुखी लोकांच्या दु:खात सहभागी होण्यात आणि त्यांना उभारी देण्यात आहे.
त्यांच्या कार्याने आम्हाला समजले की, समाजातील खऱ्या बदलासाठी आणि उन्नतीसाठी लागते ती केवळ मनाची उदारता, कृतीची शुद्धता आणि अढळ निष्ठा..
आज डॉ. बाबा आढाव आपल्या शारीरिक रूपात आपल्या सोबत नसले तरी त्यांची शिकवणी, त्यांचा आदर्श आणि त्यांची प्रेरणा सदैव आपल्यात जिवंत राहील. त्यांच्या जीवनाचा प्रत्येक अनुभव, प्रत्येक कृत्य आपल्याला शिकवतो की जग बदलायचे असेल, तर आपण स्वतःपासून सुरु करू.
आदरणीय डॉ. बाबा आढाव ह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि अखेरचा क्रांतिकारी लाल सलाम..!😢
Post a Comment