मा.पन्नालाल सुराणा (भाऊ) यांच्या निधनाने केवळ एक व्यक्ती नव्हे… तर विचारांचे तेज, तत्त्वांची निडर मशाल आणि परिवर्तनाची नैतिक शक्ती हरवली आहे.
त्यांचे आयुष्य हे सत्ता, कीर्ती किंवा पदांसाठी नव्हतं, तर सत्य, सरळपणा आणि समाजाशी असलेल्या प्रामाणिक नात्यासाठी समर्पित होतं..
त्यांनी दाखवून दिलं की, " विचारांवर ठाम उभं राहणं, तडजोड न करणं आणि लोकशाहीच्या मूल्यांसाठी आयुष्य झोकून देणं हा एक संघर्ष आहे…" आणि तो प्रत्येकाला जमतोच असं नाही.
त्यांचे समाजवादी विचार आणि परिवर्तनवादी भूमिका ही केवळ राजकीय भूमिका नव्हे, तर अस्मितेचा आवाज, शोषितांच्या हक्कांची भाषा आणि अन्यायाविरुद्ध निर्भय उभं राहण्याची ज्वलंत प्रेरणा होती.
आज ते आपल्यात नाहीत… पण त्यांचे विचार, त्यांचे धैर्य, त्यांची नैतिकता आणि त्यांच्या आंदोलनाची उर्मी ही समाज बदलण्यासाठी झटणाऱ्या प्रत्येक विचारवंत, कार्यकर्त्याच्या मनात कायम जिवंत राहील.
समाजवादी आणि परिवर्तनवादी योद्धा भाई पन्नालाल सुराणा यांना विनम्र श्रद्धांजली.. 🙏
-शोकाकुल.. 😢
त्यांचा वैचारिक सहवास लाभलेला एक साथी..
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख...
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
Post a Comment