सगळा सल्ल्यांचा भडिमार…!
मग माणसाने जगायचं कसं?
एक म्हणतो—दोन वेळा जेवा.
दुसरा म्हणतो—दर दोन तासांनी खा.
तिसरा म्हणतो—भूक लागली कीच खा.
एक म्हणतो—फळांमध्ये साखर असते, टाळा.
दुसरा म्हणतो—फळं म्हणजे नैसर्गिक साखर, रोज खा.
तिसरा म्हणतो—अमुक फळ खा, तमुक फळ खाऊ नका.
एक बोलतो—मांसाहार सोडा..
दुसरा—मांसाहारच करा, त्यात साखर नसते.
तिसरा—मांस म्हणजे फक्त मासे; चिकन-मटण नको.
एक सांगतो—जेवणाआधी पाणी.
दुसरा—जेवणानंतर पाणी.
तिसरा—जेवताना पाणी.
एक म्हणतो—भरपूर पाणी प्या.
दुसरा—जास्त पाणी किडनीला अपाय.
तिसरा—तहान लागली की पाणी प्या.
दोन मिनिटांचा एक शॉर्ट, पाच मिनिटांचा एक रील, एका तासाचा एक पॉडकास्ट…
सल्ले इतके की माणसाने विचार करावा..
"अरे, माणसाने यूट्यूब बघावं की नुसतं जगावं?"
ज्ञानाचा खजिना कुठेच कमी नाही…
पण त्या खजिन्याने आपल्याला श्रीमंत न करता गोंधळलेलं बनवलं आहे.
सल्ल्यांचा गोंधळ = आचरणात शून्य बदल
खरी अडचण कुठे होते?
सगळं ऐकतो, पण काहीच करायला सुरुवात होत नाही.
कारण..
✔ प्रत्येकाची मते वेगळी
✔ प्रत्येकाचा अभ्यास वेगळा
✔ प्रत्येकाचा अनुभव वेगळा
✔ प्रत्येकाचं शरीर, परिस्थिती, काम, झोप, सवयी — सगळं वेगळं..!
मग एकाचा सल्ला दुसऱ्याला लागूच होईल, याची काय खात्री..?
जास्त माहिती मिळून गोंधळ वाढतो…
गोंधळ वाढला की मन निर्णयच घेत नाही…
निर्णय नाही, तर कृतीच होत नाही..
खरं तर प्रश्न सल्ल्यांचा नाही… प्रश्न आपल्यांचा आहे
सल्ला हा सल्ला असतो..
तो नियम नसतो, तो आदेश नसतो.
आपण काय करायला हवं..?
आपल्या आयुष्याला, शरीराला, दिवसाला जे जुळतं ते निवडणं.
कारण…
🌿 जीवनशैली ही वैयक्तिक असते.
🌿 सवयी ही स्वतःला जमतील तेव्हाच टिकतात.
🌿 काय योग्य आहे, यापेक्षा काय टिकतं, ते महत्त्वाचं.
मग जगायचं कसं? मार्ग एकच साधा, सोपा आणि तुमचा स्वतःचा..
१) स्वतःची दिनचर्या निश्चित करा..
आपण कोण?
आपला दिवस कसा जातो?
काम केव्हा असतं?
उर्जा कधी जास्त असते?
या सगळ्यावर आधारित साधी दिनचर्या ठरवा.
२) झेपत असेल तेवढेच बदल करा..
आपण एका दिवसात १० गोष्टी बदलू शकत नाही.
परंतु एक छोटी गोष्ट नक्की करू शकतो..
✔ दररोज २० मिनिट चालणे.
✔ जेवणात थोडी भाजी वाढवणे.
✔ झोपण्याआधी १५ मिनिट स्क्रीन बंद ठेवणे.
यातून मोठे बदल घडतात...
३) इतरांचं ऐका, पण स्वतःचं शरीर समजून घ्या..
आपलं शरीर आपल्याला रोज सांगत असतं "हे पचतंय",
"हे भारी पडतंय",
"हे केल्यावर छान वाटतंय".
त्या आवाजाचं ऐका..
डॉक्टरांपेक्षा, यूट्युबरपेक्षा, तज्ञांपेक्षा
आपलं शरीर सर्वात प्रामाणिक शिकवण देतं.
४) जे जमेल ते करा..परफेक्ट होण्याचा हट्ट धरू नका..
परफेक्ट जीवनशैली हे एक मिथक आहे.
कुणीही परफेक्ट नसतं.
थोडं थोडं चांगलं रोज केलं, की तेच मोठं.
५) सगळं ऐकून गोंधळू नका..
ज्ञान मिळवा, पण त्याचे गुलाम बनू नका.
जग इतकं बदललंय की नियम रोज बदलतात.
आज जे true आहे, ते उद्या false होतं..
म्हणून..
“सर्वात बरोबर” शोधण्यापेक्षा “मला जमतं ते” निवडा.
आणि सगळ्यात महत्त्वाचं जगणं विसरू नका
आजचा दिवस उद्या येणार नाही.
भविष्याचं ताण घेण्यात आज हरवू नका..
✔ आवडतं खा.
✔ आवडतं करा.
✔ मनापासून हसा.
✔ रोज थोडं आनंदाने जगा...
जीवन हे करायच्या गोष्टींची यादी नाही
ते अनुभवायची गोष्ट आहे..
सल्ले अमर्याद आहेत, पण आपलं आयुष्य मर्यादित आहे.
म्हणून..
जगा तसं
जसं तुम्हाला योग्य वाटतं.
जगा तसं
जसं तुम्हाला झेपतं.
आणि महत्त्वाचं..
जगा तसं
जसं तुम्हाला आनंद देतं...
धन्यवाद मित्रांनो..!
लेख आवडला असेल, तर आपल्या प्रियजनांसोबत नक्कीच शेअर करा.
सकारात्मक विचार शेअर करणे हीच मानसिक आणि सामाजिक शक्ती वाढवण्याची सर्वात मोठी ताकद आहे. जेव्हा आपण प्रेरणादायक विचार इतरांसोबत वाटतो, तेव्हा ती ऊर्जा द्विगुणित होते आणि आपले जीवन अधिक सकारात्मक आणि समृद्ध बनते. त्यामुळे, चांगल्या गोष्टी शेअर करत राहा आणि एकमेकांना पुढे जाण्यास प्रेरित करा मित्रांनो..!
टीप : ही माहिती इंटरनेटवरील मुक्त स्रोतांवर आधारित असून, तिचं सृजनशील विचार-संकलन, लेखन व संपादन स्वतंत्रपणे करण्यात आलं आहे.
विचार संकलन आणि संपादन..✍️
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख
-एक साहित्यप्रेमी, विवेकवादी आणि समाजमाध्यमकार..
🔰 The Spirit of Zindagi Foundation
"मानवी सामर्थ्याला जागवणारं प्रेरणेचं क्षितिज..!"
Inspire | Educate | Empower | Excel
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
"Nurturing Potential Through Education"
शिक्षण | सेवा | प्रेरणा | प्रबोधन | सामाजिकता | संशोधन
#जगण्याचंरहस्य #सल्ला_नियम_नाही #तुमचा_मार्ग #जीवनशैली #व्यक्तिगत_विकास #स्वतःचेशरीरऐका #आनंदीजीवन #InformationOverload #DigitalDetox #ReelVsReality #SocialMediaAdvice #Motivation #Inspiration #मराठीलेख #मराठीविचार #मराठीस्टेटस #सकारात्मकता #विद्यार्थीमित्र #आरोग्य #आहार #दिनचर्या #मानसिक_शांती
#जीवनशैली #SelfCare #Mindfulness #HealthyHabits #MotivationMarathi #InspirationMarathi #MarathiQuotes #MarathiWriting #ThoughtsMarathi #PositiveVibes #LifeLessons #ModernLife #DigitalLife #InformationOverload #WellnessLifestyle #HealthyMindHealthyBody #AuthenticLiving #MinimalismLife #SelfGrowth #HolisticLiving #BalanceIsEverything #BeYourself #LearnAndGrow #WisdomOverInformation #UseKnowledge #ShareIfYouAgree #MustReadPost #SaveForLater #ShareThisMessage #LifeChangingThoughts #प्रा_रफीक_शेख #thespiritofzindagifoundation
Post a Comment