बंदूक हातात घेणारा नव्हे, तर अन्यायाविरुद्ध विचारांची मशाल पेटवणारा, प्रश्न विचारण्याची हिंमत ठेवणारा आणि व्यवस्थेला तर्काच्या कसोटीवर जाब विचारणारा माणूस म्हणजे ‘दिमागी नक्षल’!
‘दिमागी गुलाम’ होणे सोपे असते..कारण त्यासाठी स्वतः विचार करण्याची गरज नसते. कुणीतरी सांगितलेले सत्य मानायचे, कुणीतरी दाखवलेली दिशा स्वीकारायची आणि कुणीतरी उभ्या केलेल्या प्रश्नांवर टाळ्या वाजवायच्या.
पण ‘दिमागी नक्षल’ असणे कठीण असते, कारण त्यासाठी गर्दीच्या प्रवाहाविरुद्ध पोहावे लागते. रूढ समजुतींना प्रश्न विचारावे लागतात, अंधश्रद्धेला विवेकाची मशाल दाखवावी लागते आणि अन्यायाच्या भिंतीवर सत्याचा हातोडा मारावा लागतो.
सत्तेला प्रश्न विचारणे म्हणजे देशद्रोह नव्हे.. लोकशाही जिवंत ठेवण्याचे ते नागरिक कर्तव्य आहे..प्रश्न विचारणारा शत्रू नसतो..तो समाजाच्या विवेकाचा पहारेकरी असतो.
म्हणून विचारांना कुलूप लावू नका.
विवेकाला गहाण ठेवू नका.
प्रश्न विचारण्याची भीती बाळगू नका.
कारण ज्या समाजात प्रश्न मरतात, तिथे हळूहळू स्वातंत्र्यही मरू लागते.. आणि ज्या समाजात विचार जिवंत असतात, तिथे परिवर्तनाची पहाट कधीच दूर नसते..!
🔥 दिमागी गुलाम बनणे सोपे आहे; पण दिमागी स्वातंत्र्य जपणे हीच खरी क्रांती आहे..!
बाकी काहीही करा...पण विचार जिवंत ठेवा, प्रश्न विचारत राहा आणि तर्काची मशाल विझू देऊ नका, मित्रांनो..! ✊🧠
#दिमागी_नक्षल #विचारांचीक्रांती #प्रश्नविचारा #संघर्ष #न्याय #समता #एकता #इन्कलाब #cjp #cockroachjantaparty
#CPIM
Post a Comment