लाटांना भिडायचं असेल तर ताकद ठेवावी,
कमजोरांनी समुद्राला स्पर्श करायचा नसतो..
छातीत हवा भरली कीं आभाळ मोजता नाहीत,
उंचीने लहान, अहंकाराने मोठे आणि गर्वाने फुगलेलेच
असं वेडेपणा करतात.
जिभेवर तलवार ठेवून फिरणाऱ्यांनी आधी
स्वतःची चरित्रपत्रिका आणि इतिहास वाचावं..
कारण ज्यांच्या आत्म्यावर डाग आहेत...
त्यांना इतरांना न्याय देण्याचा अधिकार नसतो.
लोकांची पापं उकरून काढून...
स्वतःला पुण्यवान समजणाऱ्यांनो,
लक्षात ठेवा..,
राख उकरणाऱ्यांचेच हात सर्वात जास्त जळतात.
जीभ चालवून कीर्ती मिळत नाही,
कधी कधी लढलेलंच पुरावा असतं की आपण शांत नाही,.
स्वभाव शांत आहे, म्हणून दुर्बळ समजू नका,
मर्यादा ओलांडली तर उत्तर शब्दात नाही..
तर सामोरं येऊन मिळेल… आणि तेव्हा आवाज नसेल,
फक्त धडधड, धडकी आणि धक्का असेल.
म्हणून इशारा स्पष्ट ठेव...
आदर द्याल तर मान मिळेल,
पण सीमा ओलांडली तर शब्दांनी नव्हे,
वादळाने उत्तर देऊ…
कारण आम्ही वाऱ्यासारखे नाही..
कारण आमचा स्वाभिमान आमचीच तलवार आहे,
आणि एकदा ती उठली..तर शत्रू नाहीसा होतो,
आणि आमचं नाव… कायम लक्षात राहतं.
संपादित काव्य.. ✍️
-विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख
डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
#Motivation #AttitudeQuotes #MarathiMotivation #MarathiStatus #MotivationalPoetry #FearlessMindset #PowerfulLines #MarathiQuotes #StrongMindset #LifeAttitude #SelfRespect #RespectQuotes #Swabhiman #MarathiWriting #MarathiPoet #MarathiKavita #TrendingQuotes #Shabda #MarathiInstagram #QuoteOfTheDay #WordsOfStrength #HardTruth #RealTalk #BoldQuotes #MarathiPosts #SuccessAttitude # प्रेरणा #स्वाभिमान #MarathiThoughts #Mindset #MarathiWriter #FearlessQuotes #motivationhub #AttitudeStatus #InstagramQuotes #MarathiCaption #PowerfulQuote #Vichar #RafiqueShaikh #Parbhani #studentmotivation #purposedrivenlife
Post a Comment