कारण एकांत म्हणजे केवळ एकाकीपणा नव्हे,
तर आत्म्याचा साक्षात्कार असतो...
परंतु, कितीही मित्रांच्या गर्दीत उभा राहिलो, तरी मन अधिक एकाकी होतं,आणि सुरक्षिततेऐवजी असुरक्षिततेच्या सावल्या मला कवेत घेतात...
लोक काहीही बोलोत, त्याला जास्त महत्त्व नाही;
पण जे स्वतःला ‘मित्र’ म्हणवतात,
त्यांच्या मौनाने, त्यांच्या न बोलण्याने,
मनाच्या खोल कप्प्यात एक जखम उमटते.
“ मला शंभर शत्रू दिलेत तरी मी डगमगणार नाही,
कारण शत्रूंच्या वारांत स्पष्टता असते.
पण एकही बनावट मित्र देऊ नको..
कारण त्या एकाच्या उपेक्षेचं ओझं
शंभर शत्रूंच्या वारांपेक्षा जास्त धारदार,
जास्त जिव्हारी लागणारं असतं.”
साहित्यविश्वही जगासारखचं आहे.
इथेही नाती जुळवली जातात, कारण
एकट्यानं जगणं, एकट्यानं लढणं,
एकट्यानं टिकून राहणं हे सोपं नसतं.
म्हणून लोक हातात हात घालतात,
पण खरी साथ ही क्वचितच टिकते.
म्हणूनच... ✍️
जर माझ्याकडे स्वतःचं मित्रतंत्र नसेल,
तर मी तक्रार करत बसत नाही;
मी शांत राहतो, स्थिर राहतो.
आणि जे माझ्या हातात आहे,
जे माझ्या अंतरात्म्यात आहे..
तेच करत राहतो…
लेखन, विचार, निर्मिती, शब्दांना शस्त्र बनवणं..
कारण हेच खरं माझं सामर्थ्य, आणि हेच सामर्थ्य अखेर मला वैचारिक आणि विवेकी बनवतं.
शत्रूंच्या तलवारींपेक्षा जास्त घाव..
" मित्रांच्या मौनात " दडलेले असतात.
पण जो स्वतःच्या एकांताशी मित्रत्व करतो,
तो कधीच हरत नाही.. तो स्वतःचं विश्व घडवतो...
शेवटी एवढंच खरं आहे की,
माणसाने स्वतःच्या एकांताशी मैत्री केली की..
तो कधीच हरत नाही... कारण इतर सर्व नाती तुटली तरी,
एकांतातून मिळालेलं सामर्थ्य आणि निर्मितीची उर्जा त्याला...
पुन्हा उभं करण्यासाठी कायम साथ देत राहते..
-एक साहित्यप्रेमी आणि समाजमाध्यमकार..
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख
The Spirit of Zindagi Foundation
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
https://www.vidhyarthimitra.com
Post a Comment