🎓 21 व्या शतकाचा प्रवास : बदलांचा आरसा आणि भविष्याचा प्रकाशमान मार्ग… ✨
21 व्या शतकातील 2025 हे वर्ष आता अवघ्या काही दिवसात आपल्या हातातून निघून जाणार आहे...वेळेच्या या अथांग प्रवाहात आपण काय गमावलं..? हे मोजणं सोपं आहे;पण आपण काय कमावलं? हे शोधण्यासाठी अंतर्मुखता, प्रामाणिकता आणि विवेकाची ज्योत लागते.
21 व्या शतकाचे मागील 25 वर्ष म्हणजे अख्या चवथा भाग सरलं.. आता पुढं काय..?
21 व्या शतकातील मागील 25 वर्षे म्हणजे केवळ कालगणनेतील एक कालखंड नाही, तर मानवी विचार, #समाजरचना, तंत्रज्ञान आणि मूल्यव्यवस्थेच्या आमूलाग्र परिवर्तनाचा संपूर्ण चौथाई प्रवास आहे.
या काळात विज्ञानाने गगनाला गवसणी घातली, माहितीने माणसाच्या हातात सत्ता दिली, पण त्याच वेळी संवेदना, #विवेक आणि #माणुसकी यांची कसोटीही अधिक तीव्र झाली.
कारण प्रगतीच्या झगमगाटात माणूस अधिक जोडला गेला खरा, पण अंतर्मनाने तितकाच एकाकीही झाला; त्यामुळे ही पंचवीस वर्षे आपल्याला केवळ “किती पुढे आलो” याचा हिशोब देत नाहीत, तर “कुठे चुकलो, काय गमावलं आणि पुढे जाताना काय जपायला हवं..” हा मूलभूत वैचारिक प्रश्नही ठामपणे विचारायला भाग पाडतात.
जर आपण गेल्या 25 वर्षांकडे आशावादी दृष्टीने पाहिलं, तर हे काळचक्र आपल्याला नवी ऊर्जा देऊ शकतं…नवी उमेद दाखवू शकतं…आणि भविष्य अधिक समृद्ध करण्यासाठी विज्ञान, तंत्रज्ञान आणि मानवी मूल्यांची एक नवी #विवेक क्रांती सुरू करण्याची प्रेरणा देऊ शकतं..
#covid 19 - मानवतेला थांबवून पुन्हा चालायला शिकवणारा क्षण..
सन 2020…#कोविड-19 च्या प्रचंड वेगाने जग हादरले आणि माणूस खऱ्या अर्थाने जमिनीवर आला.
प्रगतीच्या नावाखाली धावत असलेल्या मानवजातीला या महामारीने एक ब्रेक दिला...आपल्या पायाखालची जमीन किती नाजूक आहे याची तीव्र जाणीव करून दिली.
तीन गोष्टी आपण शिकलो,मानवी संबंधांची किंमत, आरोग्याचं महत्त्व आणि जीवनाच्या अस्थिरतेचं वास्तव..
ही महामारी जणू आरशासारखी समोर आली आणि आपण आपल्या शर्यतीतील खऱ्या ‘वेगाने’ नव्हे, तर ‘दिशेने’ प्रश्न विचारायला सुरुवात केली.
#बदलांची मोठी लाट : तंत्रज्ञान, समाज आणि विचारविश्व..
कोविडनंतर जग जसं होतं तसं राहिलं नाही.आर्थिक, राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक सर्वच स्तरांवर अभूतपूर्व बदल झाले.
नवं तंत्रज्ञान AI, Automation, डिजिटल जग, E-education, Industry 4.0, new gadgets या सर्वांनी आपला रोजचा जीवनप्रवाहच बदलून टाकला.
पण…एक प्रश्न अजूनही तितकाच टोकदार उभा आहे,
भारतीय मानसिकता या जागतिक बदलांना खरंच अनुरूप झाली आहे का?
विज्ञान, विवेक आणि विचारक्रांती स्वीकारण्याची आपली तयारी झाली आहे का?
मानसिकता बदलली तरच समाज आणि राष्ट्र बदलतं...तंत्रज्ञान वापरणं सोपं आहे,पण त्याला योग्य विचारांची दिशा देणं...हे खऱ्या अर्थाने प्रगतीचं लक्षण आहे, असं मला वाटतं मित्रांनो..
#भविष्याचा वेध - बदल स्वीकारण्याची तयारी नसल्यास आपण मागे पडू…
येत्या दशकात भारत ‘#ज्ञानाधिष्ठित समाजा’कडे जोराने पुढे जाईल,पण त्या प्रवासात स्थान मिळवायला आपण स्वतःला बदलायला लागेल.
तंत्रज्ञानभिमुखता, डिजिटल कौशल्ये, डेटा-आधारित निर्णयक्षमता, विज्ञाननिष्ठ विचार, सामाजिक संवेदनशीलता ही सर्व आता पर्याय नाहीत; ही अत्यावश्यक गरज आहेत.
आजचा काळ शर्यतीपेक्षा वेगाने बदलत आहे आणि ज्या व्यक्तीने बदल स्वीकारला नाही, ती व्यक्ती Outdated होईल…
समाजात जागा नसलेल्या स्पर्धेच्या गर्दीत गुदमरून बसेल.
#खरा प्रश्न : आनंद कशात आहे..?😱🫣
या सगळ्या धावपळीत, या बदलांच्या महापुरात…
#एक मोठा प्रश्न उभा राहतो.. खरा आनंद कशात आहे?
संपत्तीची शर्यत? की आहे त्यात समाधान? की नव्या बदलांशी हात मिळवून पुढे जाणं? की जुनेपण मनाला गुंडाळून एका मानसिक डबक्यात जगणं?
जीवनातील प्रत्येक व्यक्तीने हा प्रश्न स्वतःला विचारायला हवा, कारण उत्तर बाहेर नाही;उत्तर आपल्याच मनाच्या शांत खोलात दडलेलं आहे.
#बदल हा भार नाही, तर उज्ज्वल भविष्याची किल्ली आहे, मित्रांनो..
#2025 चं वर्ष संपतंय…पण आपले स्वप्न संपत नाहीत,आशा थांबत नाहीत,आणि भविष्याचं क्षितिज कधीच अंधारत नाही.
#निसर्गाचा नियम एकच ' #जे बदलतं तेच टिकतं; #जे थांबतं तेच कोसळतं.'
नवी कौशल्ये, नवी विचारसरणी, नवं तंत्रज्ञानही फक्त साधने आहेत; त्यांना दिशा देणारी शक्ती म्हणजे स्व-विकासाची इच्छा आणि जागरूकतेची ज्योत.
म्हणूनच,आता स्वतःला विचारूया..
“मी बदलांना घाबरतोय, की मी बदलांचा मार्ग उजळतोय?”
हे उत्तरच ठरवेल तुमचं उद्याचं स्थान.
#वेळ निसटतोय…पण भविष्य तुमच्या हातात अजूनही आहे.
धन्यवाद, मित्रांनो..🙏
(टीप : वरील लेख हा विविध मुक्त स्रोतांतील माहिती संकलित करून सादर केलेला संशोधित स्वरूप आहे.)
-विचार संकलन आणि संपादन..✍️
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख...
-एक साहित्यप्रेमी, विवेकवादी आणि समाजमाध्यमकार..
🔰 The Spirit of Zindagi Foundation
"मानवी सामर्थ्याला जागवणारं प्रेरणेचं क्षितिज..!"
Inspire | Educate | Empower | Excel
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
"Nurturing Potential Through Education"
शिक्षण | सेवा | प्रेरणा | प्रबोधन | सामाजिकता | संशोधन
#21stCentury #FutureThinking #Vivek #HumanValues #ChangeIsInevitable #2025Vision #ThoughtLeadership #SocialAwareness #VicharKranti #MindsetShift #IndianYouth #KnowledgeSociety #DigitalIndia #AIandHumanity #TechnologyWithValues #EducationReform #CriticalThinking #SelfDevelopment #LifePhilosophy #CovidLessons #PostCovidWorld #InnovationWithPurpose #WisdomOverMachines #HumanFirst #ValueBasedProgress #MarathiThought #MarathiArticle #VicharManthan #YouthAwakening #InspireEducateEmpower
Post a Comment