कांटच्या विचारांपूर्वी मानवाने विवेकाला देवत्व बहाल केले होते, “विवेक सर्व जाणतो, सर्व ठरवतो.” तर अनुभववादाने अनुभवालाच अंतिम सत्य मानून विवेकाला दुय्यम ठरवले होते. या दोन टोकांच्या संघर्षात मानवी चेतना भरकटत असताना, कांटने धीरगंभीर स्वरात सांगितले की विवेक नाकारायचा नाही, पण त्याची पूजा देखील करायची नाही; त्याऐवजी विवेकाने स्वतःला समजून घ्यावे, स्वतःच्या मर्यादा ओळखाव्यात, आणि त्या मर्यादांच्या आत जबाबदारीने कार्य करावे. हाच समालोचनात्मक विवेकवाद (Critical Rationalism) विवेकाची सत्ता नव्हे, तर विवेकाची शिस्त.
#Immanuel Kant कोण होता..?
Immanuel Kant हा अठराव्या शतकातील जर्मनीचा महान तत्त्वज्ञ होता, ज्याचा जन्म 22 एप्रिल 1724 रोजी कोनिग्सबर्ग (आताचे कॅलिनिनग्राड) येथे झाला आणि मृत्यू 12 फेब्रुवारी 1804 रोजी झाला. सुमारे 1724–1804 या कालावधीत कांटने युरोपियन बौद्धिक विश्वावर अमीट ठसा उमटवला. तो प्रबोधनकाळातील (Enlightenment) प्रमुख विचारवंत मानला जातो.
कांटने आपले संपूर्ण आयुष्य प्रामुख्याने कोनिग्सबर्ग शहरातच व्यतीत केले..शिक्षण, अध्यापन आणि चिंतन यांत गुंतलेले जीवन जगत त्याने मानवी विवेक, ज्ञान, नैतिकता आणि स्वातंत्र्य यांवर मूलभूत प्रश्न उपस्थित केले.
इमॅन्युएल कांटला आधुनिक पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचा कणा मानले जाते, कारण त्याने विवेकवाद आणि अनुभववाद या दोन परस्परविरोधी प्रवाहांमध्ये समन्वय साधला. Critique of Pure Reason (1781) या ग्रंथाद्वारे त्याने मानवी ज्ञानाच्या मर्यादा आणि शक्ती स्पष्ट केल्या, तर Critique of Practical Reason (1788) मध्ये नैतिक विवेकाची भूमिका मांडली.
“ Sapere Aude स्वतः विचार करण्याचे धैर्य बाळगा. ” हा कांटचा संदेश केवळ तत्त्वज्ञानापुरता मर्यादित राहिला नाही, तर तो आधुनिक विज्ञान, लोकशाही, मानवाधिकार आणि विवेकनिष्ठ शिक्षणाचा बौद्धिक पाया ठरला.
कांटचे तत्त्वज्ञान म्हणजे मानवी जाणिवेच्या मुळाशी जाऊन विचार करण्याची निर्भीड परंपरा. “आपण जग कसे आहे हे जाणत नाही; आपण जग कसे जाणतो हेच आपल्याला ठाऊक आहे,” असे सांगताना तो मानवी अहंकाराला सौम्य पण ठाम धक्का देतो.
कारण आपल्या जाणिवा या काळ आणि अवकाशाच्या चौकटीत बांधलेल्या आहेत; वस्तू आपल्याला जशा दिसतात (Phenomena) आणि वस्तू जशा प्रत्यक्ष आहेत (Noumena) यांत अंतर आहे, आणि हे अंतर ओळखणे हीच खरी प्रबोधनाची सुरुवात आहे.
इथे कांट विज्ञानाला मर्यादा घालतो असे वाटू शकते; पण प्रत्यक्षात तो विज्ञानाला भक्कम पाया देतो कारण मर्यादा ओळखलेली ज्ञानप्रणाली अधिक प्रामाणिक, अधिक मानवी आणि अधिक जबाबदार असते. अंध श्रद्धा जितकी घातक, तितकाच अंध विवेकही; आणि या दोहोंपासून मुक्त होण्यासाठी आवश्यक आहे विवेकाची समालोचना.
या समालोचनेतूनच कांट “Synthetic A Priori Knowledge” ही क्रांतिकारी संकल्पना मांडतो..अनुभवाशिवायही सार्वत्रिक आणि आवश्यक असे ज्ञान शक्य आहे, पण ते मानवी जाणिवेच्या रचनेतूनच उगम पावते. त्यामुळे ज्ञान हे केवळ बाहेरून येणारे नाही, तर अंतर्मुख विवेकाने घडवलेले असते.
हा विचार विद्यार्थ्यांना, संशोधकांना, आणि समाजाला एकाच वेळी प्रेरणा देतो: प्रश्न विचारा, पण प्रश्न विचारण्याची पद्धतही तपासा. सत्याचा शोध घ्या, पण सत्य मिळवण्याच्या साधनांनाही न्यायाच्या कठड्यावर उभे करा. कारण विचारांची गुणवत्ता ही केवळ निष्कर्षांवर नव्हे, तर त्या निष्कर्षांपर्यंत जाणाऱ्या मार्गावर अवलंबून असते.
नैतिकतेच्या क्षेत्रात कांट विवेकाला केवळ जाणण्याचे साधन न ठेवता, कर्तव्याची मशाल बनवतो. “तुम्ही जो नियम स्वतःसाठी योग्य मानता, तोच नियम सर्वांसाठी योग्य असावा,” हा त्याचा Categorical Imperative माणसाला स्वार्थाच्या संकुचित चौकटीतून बाहेर काढतो. इथे नैतिकता भीतीवर, बक्षिसांवर किंवा धर्मसत्तेवर उभी राहत नाही; ती विवेकाधिष्ठित कर्तव्यावर उभी राहते. त्यामुळे व्यक्ती केवळ आज्ञाधारक प्रजा न राहता, जबाबदार नागरिक बनते. हा विचार लोकशाही, मानवाधिकार, आणि विवेकनिष्ठ शिक्षणाचा पाया घालतो जिथे माणूस विचार करण्याचे धाडस करतो आणि त्या विचारांची जबाबदारीही स्वीकारतो.
आजच्या काळात अंधश्रद्धा, कट्टरता, अपप्रचार आणि बौद्धिक आळशीपणा यांचा गोंगाट वाढलेला असताना..कांटचा समालोचनात्मक विवेकवाद अधिकच सुसंगत ठरतो. तो आपल्याला सांगतो की सत्याची तहान ठेवा, पण त्या तहानीला शिस्त द्या; प्रश्न विचारा, पण उत्तरांनाही प्रश्न विचारा; आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, विवेकाला अंतिम न्यायाधीश मानण्याआधी त्यालाच न्यायासनावर उभे करा.
कारण " विवेक जेव्हा स्वतःवर प्रश्न विचारतो, तेव्हाच तो मुक्त होतो आणि मुक्त विवेकातूनच खरे प्रबोधन जन्माला येते.."
या सर्व चिंतनाच्या अखेरीस Immanuel Kant आपल्याला एक मूलभूत पण कठोर प्रश्न विचारायला भाग पाडतो..आपण विचार करतो आहोत का, की फक्त विचारांची नक्कल करतो आहोत? कारण कांटसाठी प्रबोधन म्हणजे माहितीचा साठा नव्हे, तर स्वतःच्या बुद्धीचा जबाबदारीने उपयोग करण्याचे धैर्य.
आज जिथे मतं सहज मिळतात, पण विचार करण्याची मेहनत टाळली जाते; जिथे घोषणा मोठ्या असतात, पण चिंतन खोल नसते..तिथे कांटचा संदेश अंतर्मुख करणारा ठरतो.
" विवेक म्हणजे सत्तेचे हत्यार नव्हे, तर आत्मपरीक्षणाचे साधन आहे, हे तो सातत्याने बजावतो."
आजच्या डिजिटल युगात, अफवा सत्यासारख्या फिरतात, श्रद्धा प्रश्नांवर मात करतात आणि सोयीस्कर विचारांना “अंतिम सत्य” घोषित केले जाते.
अशा काळात कांट आपल्याला आठवण करून देतो की, विश्वास ठेवण्याआधी तपासणे आणि मान्य करण्याआधी समजून घेणे हीच विवेकाची खरी कसोटी आहे. त्याचा समालोचनात्मक विवेकवाद आपल्याला अति-श्रद्धेपासूनच नव्हे, तर अति-आत्मविश्वासापासूनही वाचवतो.
कारण.." जो विवेक स्वतःच्या मर्यादा ओळखतो, तोच विवेक खऱ्या अर्थाने मानवी, नैतिक आणि समाजोपयोगी ठरतो."
म्हणूनच कांटचे विचार हे इतिहासाच्या संग्रहालयात ठेवण्याचे अवशेष नाहीत; ते आजच्या शैक्षणिक वर्गखोल्यांत, सामाजिक चर्चांमध्ये, आणि वैयक्तिक निर्णयांत जिवंत ठेवण्यासारखे आहेत.
Sapere Aude स्वतः विचार करण्याचे धैर्य.. हे केवळ घोषवाक्य नाही, तर जबाबदारीची हाक आहे. विवेकाला शिस्त देणारा, नैतिकतेला आधार देणारा आणि माणसाला स्वातंत्र्याची जाणीव करून देणारा हा विचार आजही तितकाच प्रबोधनात्मक आहे. कारण ज्या समाजात प्रश्न विचारण्याची संस्कृती जिवंत असते, तिथेच अंधाराला मर्यादा असते..आणि त्या मर्यादेवर उभा असलेला दीपस्तंभ म्हणजे कांटचा विवेक.
धन्यवाद, मित्रांनो..🙏
(टीप : वरील लेख हा विविध मुक्त स्रोतांतील माहिती संकलित करून सादर केलेला संशोधित स्वरूप आहे.)
-विचार संकलन आणि संपादन..✍️
🎓 #विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख
The Radical Humanist..
साहित्यप्रेमी | विवेकवादी | समाजमाध्यमकार
🔰 The Spirit of Zindagi Foundation..
"मानवी सामर्थ्याला जागवणारं प्रेरणेचं क्षितिज..!"
Inspire | Educate | Empower | Excel
🔰डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन..
"Nurturing Potential Through Education"
शिक्षण | सेवा | प्रेरणा | प्रबोधन | सामाजिकता | संशोधन
#ImmanuelKant #कांट #KantPhilosophy #CriticalRationalism #समालोचनात्मकविवेकवाद #Philosophy #तत्त्वज्ञान #Enlightenment #प्रबोधन #SapereAude #ThinkForYourself #स्वतःविचारकरा #Reason #विवेक #RationalThinking #CriticalThinking #विचारस्वातंत्र्य #HumanReason #मानवीविवेक #Ethics #नैतिकता #CategoricalImperative #Knowledge #ज्ञान #Epistemology #Phenomena #Noumena #Truth #सत्य #QuestionEverything #प्रश्नविचारा #AntiBlindFaith #अंधश्रद्धाविरोध #ScientificTemper #वैज्ञानिकदृष्टिकोन #Democracy #लोकशाही #HumanRights #मानवाधिकार #EducationReform #विवेकनिष्ठशिक्षण #StudentMovement #विद्यार्थीचळवळ #IntellectualRevolution #बौद्धिकक्रांती #SocialAwareness #समाजप्रबोधन #MarathiWriting #मराठीलेखन #MarathiThought #मराठीविचार #Rationalism #विवेकवाद #Humanism #Humanist #TheRadicalHumanist #StudentMitra #विद्यार्थीमित्र
#InspireEducateEmpower #ThinkDifferent #awakenthemind
Post a Comment