अक्षय खन्नाची ही कमाल आपल्याला आयुष्याचं एक वेगळंच, पण फार खोल तत्त्व शिकवून जाते…
आज चित्रपटात तो villain आहे;पण त्याचा अभिनय असा प्रभावी आहे की नायकपणही क्षणभर फिकं पडतं..
हेच तर खरं अभिनयाचं यश..
भूमिका मोठी नसते, ठसा मोठा असतो.
प्रसिद्धीचं चक्र फार विचित्र असतं…
कधी उजेडात, कधी सावलीत;
कधी टाळ्यांच्या गजरात, तर कधी पूर्ण शांततेत.
पण यंदा spotlight पूर्णपणे अक्षय खन्नावर आहे..
कोणताही गोंगाट न करता, कोणतीही जाहिरात न करता.
आज तो Top Search मध्ये आहे.सोशल मीडियावर ट्रेंड होतोय.
लोक त्याचं कौतुक करतायत, मीम्स बनतायत, रील्स फिरतायत…
आणि तरीही त्याचा एकही व्हिडिओ नाही,एकही इंटरव्ह्यू नाही,
एकही “I’m back” असं ओरडणारं सेलिब्रेशन नाही.
हीच खरी सिद्धी आहे..!
प्रसिद्धीचा आवाज जगभर घुमतोय;पण त्याचा संयम शांत आहे
आणि म्हणूनच तो अधिक मोठा, अधिक ठसठशीत वाटतो.
आजच्या काळात दोन कौतुकाच्या प्रतिक्रियाही मिळाल्या,
की लोक live लावतात, reels टाकतात,स्वतःच्याच यशाचा गजर स्वतःच करतात.अभिनय कमी आणि प्रचार अधिक…
आणि इथे हा माणूस..
ज्याच्या हातात संधीचा माईक आहे, तरीही तो गोंधळ न करता मौनाचा सन्मान करतो.कारण त्याला माहीत आहे,
"काम बोलतं, तेव्हा शब्दांची गरज राहत नाही."
आज ‘धूरंधर’ म्हणून अक्षय खन्ना सर्वत्र गाजतोय.
समाजमाध्यमं उघडली, की तोच तो…!😱
आधी छावा, मग दृश्यम, आणि आता धूरंधर..!
अगदी Gen Z सुद्धा त्याच्यावर रील्स आणि मीम्स बनवतेय..
एक मीम तर प्रचंड व्हायरल झालंय, ज्यात अक्षय खन्ना म्हणतो,
“मी हिरो होतो तेव्हा माझे सिनेमे पाहायला कोणी गेला नाही…
आणि आज ‘लिजेंड… लिजेंड…’ म्हणत लोक थकत नाहीत!”
या विनोदामागेही एक कटू सत्य दडलंय..
खरं सांगायचं, तर आज मनोरंजनाच्या जगातला खरा धूरंधर कोण आहे, यावर शिक्कामोर्तब झालंय.. तो म्हणजे अक्षय खन्ना..!
विनोद खन्ना या दिग्गज अभिनेत्याचा मुलगा…पण वडिलांचं देखणं रूप त्याच्या वाट्याला आलं नाही..ऐन तारुण्यात टक्कल पडायला सुरुवात झाली.रोमँटिक, चॉकलेट बॉयच्या साच्यात तो बसला नाही.
1997 मध्ये 'हिमालय पुत्र' या सिनेमातून त्याने पदार्पण केलं.
बॉर्डर, आ अब लौट चले, ताल, दिल चाहता है, हमराज, हंगामा
अनेक सिनेमांत त्याने लक्षवेधी भूमिका साकारल्या..
पण तरीही तो कधी ‘स्टार’ किंवा ‘सुपरस्टार’ ठरला नाही.
कारण ग्लॅमरचं जग झपाट्यानं विसरतं…आणि अक्षय खन्नाच्याही बाबतीत तसंच झालं.
“ ग्लॅमर विसरतो, पण कसब कायम राहतं आणि तेच अक्षय खन्नाच्या वाट्याला आलं.”
एकदा करण जोहरने म्हटलं होतं,
“अक्षय खन्ना हा अत्यंत ताकदीचा अभिनेता आहे,
पण तो थोडा विचित्र आहे.सोमवार ते शुक्रवार तो मुंबईत काम करतो,शनिवार-रविवारी अलिबागला निघून जातो.
शनिवार-रविवारी त्याला अकॅडमी अवॉर्ड मिळणार असेल,
तरीही तो मुंबईत येणार नाही. फिल्मी पार्ट्यांना तर तो दिसणारच नाही! ”
तेव्हा ही गोष्ट ‘विचित्र’ वाटली होती…!
पण आज तीच गोष्ट विलक्षण वाटते.
कारण काळ बदलतो...
आज अक्षय खन्नाचं काम, त्याचा अभिनय, त्याचं craft,
त्याचं ‘cool’ आणि ‘aloof’ असणं याच गोष्टी त्याची ओळख बनल्या आहेत.
“ स्टार न होता लिजेंड होणं म्हणजे काय, हे अक्षय खन्नानं वेळेला उत्तर देत शिकवलं.”
2025 च्या अखेरीस धूरंधर चित्रपटात नायक असलेल्या रणवीर सिंगपेक्षा अक्षय खन्नाच भाव खाऊन गेला,असं प्रेक्षक उघडपणे सांगतायत...त्याचा डान्स सिक्वेन्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
आणि मग एकच वाक्य मनात उमटतं Comeback असावा, तर असा.
न गाजावाजा,
न आत्मप्रचार,
न दिखावा…
फक्त काम आणि विवेकी संयम..!
सोबत वेळ येईपर्यंत शांतपणे स्वतःवर विश्वास ठेवण्याची हिंमत.
अक्षय खन्ना आपल्याला हेच शिकवतो,
“ खरी उंची मिळवण्यासाठी आवाज मोठा असावा लागत नाही;
खोल असणं पुरेसं असतं.”
- एक साहित्यप्रेमी आणि समाज माध्यमकार.. ✍️
विचार संकलन आणि संपादन..
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख...
🔰 The Spirit of Zindagi Foundation
"मानवी सामर्थ्याला जागवणारं प्रेरणेचं क्षितिज..!"
Inspire | Educate | Empower | Excel
#AkshayeKhanna #धूरंधर #Dhurdhar #LegendNotStar #ComebackStory #SilentSuccess #ActingExcellence #PowerOfSilence #TrueTalent #VillainWithImpact #PerformanceOverPromotion #RoleNotSizeImpact #QualityOverHype #BollywoodActor #IndianCinema #CraftOfActing #UnspokenGreatness #CalmConfidence #ConsistencyWins #TimelessTalent #CinemaLovers #FilmAnalysis #BollywoodDiaries #GenZTrends #ReelCulture #MemeCulture #TrendingNow #TopSearch #NoPRJustPerformance #ClassOverMass #ActorLife #BehindTheScenes #VinodKhannaLegacy #KaranJoharQuote #ArtOverFame #DepthOverNoise #InnerStrength #PatiencePays #InspiringStories #MotivationalThoughts #LifeLessons #MarathiWriting #MarathiArticle #मराठीलेखन #मराठीविचार #प्रेरणादायीलेख #वैचारिकलेखन #साहित्यप्रेमी #SocialMediaWriter #ContentWithPurpose #SpiritOfZindagi #InspireEducateEmpower #TheSpiritOfZindagiFoundation #VidyarthiMitra #ProfRafiqueShaikh ✍️
Post a Comment