“तरुणांच्या स्वप्नांना दिशा, शेतकऱ्यांच्या वेदनांना आवाज आणि सामान्य माणसाच्या संघर्षाला आधार..यातूनच लोकशाहीला खरी ताकद मिळते.”
Rahul Gandhi.. ✍️
जनतेच्या मनात काँग्रेसविषयी पुन्हा विश्वासाची पालवी फुटू लागली आहे, असे चित्र दिसत आहे आणि या बदलत्या वातावरणात राहुल गांधींच्या भूमिकेचा वाटा महत्त्वाचा असल्याचे त्यांच्या समर्थकांचे मत आहे.
पण विश्वास मिळवणे जितके महत्त्वाचे, तितकेच तो विश्वास जपणे आणि कृतीतून सिद्ध करणे अधिक महत्त्वाचे आहे. जनतेच्या अपेक्षांना तडा जाऊ नये, यासाठी आत्मपरीक्षण, संघटनात्मक शिस्त, स्पष्ट विचार आणि जनतेच्या प्रश्नांशी सातत्यपूर्ण नाळ जोडणे हीच काळाची गरज आहे.
आज गरज आहे ती केवळ नावाची नव्हे, तर नव्या विचारांची, नव्या ऊर्जेची आणि नव्या कार्यसंस्कृतीची...
कात टाकलेली काँग्रेस अपेक्षित आहे, जी भूतकाळाच्या गौरवात न रमता वर्तमानातील आव्हानांना भिडेल, जी तरुणांच्या स्वप्नांना दिशा देईल, शेतकरी-कामगारांच्या प्रश्नांना आवाज देईल आणि संविधानिक मूल्यांना केंद्रस्थानी ठेवेल..जी राजकारणाला केवळ सत्तेचे साधन न मानता लोकसेवेचे माध्यम बनवेल.
देशाला केवळ सत्तांतराची नव्हे, तर विचारांतराचीही गरज आहे..
अंधारावर भाष्य करण्यापेक्षा प्रकाशाची वाट निर्माण करणारी, निराशेला आशेत आणि अस्वस्थतेला चैतन्यात रूपांतरित करणारी काँग्रेस उभी राहिली, तर तिच्या नव्या प्रवासाकडे देश निश्चितच गांभीर्याने पाहील.
विश्वास हा घोषणांनी मिळत नाही..तो संघर्षातून कमवावा लागतो,कृतीतून सिद्ध करावा लागतो आणि जनतेच्या मनात जपावा लागतो.
हीच नव्या काँग्रेससमोरील खरी कसोटी..!
- एक समाज माध्यमकार.. ✍️
🎓 #विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख
The Radical Humanist..
साहित्यप्रेमी | विवेकवादी | समाजमाध्यमकार
डॉ. कलाम फाउंडेशन, परभणी.
Post a Comment