🎉 वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..! 🎂🎊
रेय्यान पटेल (माजी विद्यार्थी – डॉ. कलाम फाउंडेशन, परभणी)
मुंबईतील एका नामांकित आयटी कंपनीत आपल्या कर्तृत्वाची यशस्वी वाटचाल करणारा, संविधानिक मूल्यांवर नितांत श्रद्धा असलेला, विवेकवादी, निर्भीड आणि अभ्यासू तरुण म्हणजे आमच्या शैक्षणिक परिवाराचा अभिमान – रेय्यान पटेल.
शालेय जीवनापासूनच नेतृत्वगुण, सामाजिक जाणीव, प्रश्न विचारण्याची सवय आणि सत्याच्या बाजूने निर्भयपणे उभे राहण्याची वृत्ती यामुळे त्याने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. आजही तो केवळ आपल्या व्यावसायिक क्षेत्रातच नव्हे, तर समाजातील ज्वलंत प्रश्नांवर तर्कशुद्ध, संविधाननिष्ठ आणि जबाबदार भूमिका मांडत अनेक तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे.
अलीकडील जेन-झि विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विविध माध्यमांमध्ये त्याने मांडलेली अभ्यासपूर्ण, संतुलित आणि परखड भूमिका अनेकांच्या मनाला भावली. व्यक्तीपेक्षा विचार मोठे असतात, आणि पदापेक्षा तत्त्वांची उंची अधिक असते, हे त्याने आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवले आहे.
खरे शिक्षण हे केवळ पदवी देत नाही तर ते विचारांची धार, प्रश्न विचारण्याचे धैर्य आणि समाजाप्रती उत्तरदायित्वाची जाणीव निर्माण करते.
रेय्यानसारखे विद्यार्थी हीच आमच्या डॉ.कलाम फाउंडेशनची खरी ओळख आणि समाजाची खरी आशा असतात..
प्रिय विद्यार्थी मित्रा, तुझ्या वाढदिवसानिमित्त तुला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, अखंड यश आणि विचारांचा हा प्रकाश अधिकाधिक तेजस्वी होवो, हीच मनःपूर्वक शुभेच्छा. तुझ्या ज्ञानाचा, कर्तृत्वाचा आणि सामाजिक बांधिलकीचा प्रवास सतत उंचावत राहो आणि तू अनेक तरुणांसाठी प्रेरणेचा दीपस्तंभ बनत राहो.
वाढदिवसाच्या पुन्हा एकदा मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 💐🎉
तुझाचं मार्गदर्शक.. ✍️
🎓 #विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख
The Radical Humanist..
साहित्यप्रेमी | विवेकवादी | समाजमाध्यमकार
https://tinyurl.com/6mvvabrn
🔰डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
"Nurturing Potential Through Education"
शिक्षण | सेवा | प्रेरणा | प्रबोधन | सामाजिकता | संशोधन
Post a Comment