माझ्या जीवनप्रवासात अनमोल योगदान देणाऱ्या सर्व गुरुजनांना सप्रेम व सादर प्रणाम...! 🙏🌺
माणूस म्हणून घडताना, माणूस म्हणून जगताना आणि माणूस म्हणून समाजाप्रती आपली जबाबदारी ओळखताना..प्रत्येक शब्दामागे सत्य, प्रत्येक कृतीमागे स्वच्छ हेतू, प्रत्येक विचारांमागे विवेक आणि प्रत्येक निर्णयामागे मूल्यांची जाण असावी, हे ज्यांच्या संस्कारातून शिकायला मिळाले, त्या माझ्या सर्व गुरुजनांना गुरुपौर्णिमेच्या मनःपूर्वक, कोटी कोटी शुभेच्छा..!
गुरू म्हणजे केवळ ज्ञान देणारी व्यक्ती नव्हे; तर अज्ञानाचा अंधार दूर करून विचारांचे दीप प्रज्वलित करणारा प्रकाशस्तंभ होय. गुरू विद्यार्थ्याला केवळ यशस्वी बनवत नाही, तर संवेदनशील, विवेकी, चारित्र्यसंपन्न आणि जबाबदार नागरिक घडवतो. म्हणूनच, गुरूचे स्थान कोणत्याही पदापेक्षा, संपत्तीपेक्षा आणि प्रसिद्धीपेक्षा श्रेष्ठ आहे.
आज आपण कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (Artificial Intelligence) वेगवान युगात जगत आहोत. तंत्रज्ञान माहिती देऊ शकते, उत्तर शोधून देऊ शकते, परंतु संस्कार देऊ शकत नाही.. विवेक जागवू शकत नाही, चारित्र्य घडवू शकत नाही. हे कार्य फक्त आणि फक्त एका खऱ्या गुरूलाच शक्य आहे,असं मला वाटतं, मित्रांनो..
म्हणूनच एक शाश्वत सत्य काळाच्या कोणत्याही प्रवाहात बदलू शकत नाही, कृतिशील शिक्षक, कृतज्ञ विद्यार्थी आणि कृतार्थ पालक यांचा पवित्र त्रिवेणी संगमच सशक्त समाज, समृद्ध राष्ट्र आणि उज्ज्वल भविष्य घडवतो.
ज्ञानग्रहण, ज्ञानदान, संशोधन, प्रबोधन आणि माणूस घडविण्याच्या या पवित्र कार्यात आयुष्य अर्पण करणारी प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी गुरुस्थानी आहे. अशा सर्व ज्ञानी, प्रेरणादायी आणि मूल्यनिष्ठ व्यक्तिमत्त्वांप्रती मी सदैव कृतज्ञ आहे.
गुरूंचे ऋण कधीच फेडता येत नाही, ते केवळ त्यांच्या शिकवणीनुसार जगून आणि समाजात प्रकाश पेरून अंशतः उतरवता येते.
आपल्या सर्व गुरुजनांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! त्यांच्या ज्ञानदीपाचा प्रकाश असाच असंख्य आयुष्यांना दिशा देत राहो, हीच प्रार्थना.🙏
- आपला सदैव ऋणाकिंत.. 🙏
🎓 #विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख
The Radical Humanist..
साहित्यप्रेमी | विवेकवादी | समाजमाध्यमकार
https://tinyurl.com/6mvvabrn
🔰डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
"Nurturing Potential Through Education"
शिक्षण | सेवा | प्रेरणा | प्रबोधन | सामाजिकता | संशोधन
Post a Comment