डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथे पदवी शिक्षण घेत असलेला, शालेय जीवनापासूनच नेतृत्वगुणांची पेरणी मनात जपणारा आणि सामाजिक जाणिवेची मशाल हाती घेऊन वाटचाल करणारा आमचा विद्यार्थीमित्र अब्दुल मुंतजिम..
हसतमुख स्वभाव, मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व, अभ्यासाची ओढ, मित्रांशी जिव्हाळ्याचं नातं आणि सामाजिक कार्याची प्रचंड आवड ही त्याच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये. विशेषतः मुस्लिम समाजातील शैक्षणिक, सामाजिक आणि परिवर्तनाच्या प्रश्नांवर संवेदनशीलतेने विचार करून त्यासाठी काम करण्याचं धैर्य त्याच्यात दिसून येतं.
नेतृत्व म्हणजे केवळ पद नव्हे..नेतृत्व म्हणजे प्रश्नांची जाणीव, समाजाच्या वेदनांची संवेदना, परिवर्तनाची तळमळ आणि योग्य दिशेने कृती करण्याचं धैर्य. या अर्थाने अब्दुल मुंतजिमसारखी तरुण नेतृत्वाची उमेद समाजासाठी आशेचा किरण ठरते.
आजच्या तरुणांनी केवळ स्वतःच्या यशाचा विचार न करता, आपल्या ज्ञानाला सामाजिक भानाची जोड आणि आपल्या कर्तृत्वाला परिवर्तनाची दिशा दिली, तर समाजाच्या भविष्याचा चेहरामोहरा नक्कीच बदलू शकतो. शिक्षणातून विचार, विचारातून विवेक आणि विवेकातून सामाजिक परिवर्तन घडवण्याची ताकद तरुणांच्या हातात आहे.
प्रिय अब्दुल मुंतजिम, तुझ्यासारख्या अभ्यासू, संवेदनशील आणि सामाजिक जाणिवेने समृद्ध होत असलेल्या युवा नेतृत्वाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. 🌹
येणाऱ्या काळात तुझं नेतृत्व आणि कर्तृत्व समाजाला योग्य दिशा देईल, वंचितांच्या प्रश्नांना आवाज देईल आणि नव्या पिढीला प्रेरणेची वाट दाखवेल, असा मनापासून विश्वास आहे.
🎂 वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा आणि सदिच्छा! 💐
तुझ्या विचारांना अधिक व्यापकता लाभो,
तुझ्या स्वप्नांना कर्तृत्वाची पंखं मिळोत,
तुझ्या प्रयत्नांना यशाची साथ लाभो
आणि तुझ्या वाटचालीतून समाजहिताचा नवा अध्याय लिहिला जावो!
पुढील उज्ज्वल, यशस्वी आणि समाजाभिमुख वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा, प्रिय विद्यार्थीमित्रा! 🌹💐
- तुझाचं मार्गदर्शक.. ✍️
🎓 #विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख
The Radical Humanist..
साहित्यप्रेमी | विवेकवादी | समाजमाध्यमकार
🔰डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
"Nurturing Potential Through Education"
शिक्षण | सेवा | प्रेरणा | प्रबोधन | सामाजिकता | संशोधन
Post a Comment