“ गरिबी ही माणसाची ओळख नसते, तर ती विषम व्यवस्थेने निर्माण केलेली परिस्थिती असते. पण त्या परिस्थितीच्या छाताडावर संघर्षाचे पाऊल ठेवून स्वतःचे आकाश निर्माण करणारा माणूसच इतिहास घडवतो. ”
अशाच संघर्षाच्या धगधगत्या भट्टीतून तावून-सुलाखून निघालेलं एक असामान्य व्यक्तिमत्त्व म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे..
शाळेच्या दारात ज्यांना फार काळ स्थान मिळालं नाही, त्यांनी आपल्या प्रतिभेच्या सामर्थ्यावर साहित्यविश्वात स्वतःचं स्वतंत्र विद्यापीठ उभं केलं. हातात पदव्यांची प्रमाणपत्रं नव्हती; पण जीवनाच्या विद्यापीठाने दिलेलं अनुभवाचं अफाट ज्ञान होतं. पोटात भूक, पायांत संघर्षाचे चटके आणि डोळ्यांत स्वाभिमानाचं वादळ घेऊन ते मुंबईकडे निघाले. हा प्रवास केवळ एका गावातून महानगराकडे जाणारा नव्हता, तर तो उपेक्षेकडून अस्मितेकडे, शोषणाकडून संघर्षाकडे आणि मौनाकडून विद्रोहाकडे जाणारा प्रवास होता..
दिवसा श्रमाशी मैत्री, रात्री शब्दांशी संवाद आणि जनतेमध्ये प्रबोधनाची मशाल हा त्यांच्या जीवनाचा धगधगता दिनक्रम होता. परिस्थितीने त्यांच्या हातात मजुरीची अवजारे दिली,पण त्यांच्या साहित्यिक प्रतिभेने त्याच हातात लेखणीचं शस्त्र दिलं.
त्यांनी शब्दांना तलवारीची धार दिली, पोवाड्यांना परिवर्तनाची गर्जना दिली आणि साहित्याला शोषित-वंचितांच्या वेदनांचा आवाज दिला. त्यांची लेखणी केवळ मनोरंजनासाठी झिजली नाही,तर ती अन्यायाच्या काळोखावर प्रहार करण्यासाठी झिजली. त्यांच्या साहित्याने माणसाला दयेचा पात्र नव्हे, तर हक्कांचा अधिकारी म्हणून उभं केलं.
त्यांनी जनतेला भीक मागायला नव्हे, तर आपल्या हक्कांसाठी लढायला शिकवलं; नियतीपुढे हात जोडायला नव्हे, तर अन्यायाविरुद्ध मुठी आवळून परिस्थिती बदलायला शिकवलं.
अण्णाभाऊंच्या साहित्याचा नायक राजवाड्यात जन्मलेला नव्हता. तो रस्त्यावरचा श्रमिक होता, शेतातील कष्टकरी होता, कारखान्यात घाम गाळणारा कामगार होता, अन्यायाने पिचलेला वंचित होता. त्यांनी साहित्याच्या केंद्रस्थानी त्या सामान्य माणसाला आणलं, ज्याला तत्कालीन व्यवस्थेने अनेकदा काठावर ढकललं होतं.
✊ आजच्या तरुणाईसाठी अण्णाभाऊंचा संदेश...
आज आपल्या हातात जगाशी जोडणारा मोबाईल आहे..पण मनात विवेकाशी जोडणारा विचार आहे का..?
आपल्याकडे माहितीचा महासागर आहे, पण सत्य-असत्य ओळखण्याची चिकित्सक दृष्टी आहे का..?
आपल्याकडे शिक्षण आणि पदव्या आहेत.. पण त्या शिक्षणातून सामाजिक संवेदनशीलता, संविधानिक मूल्यांची जाणीव आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचं नैतिक धैर्य निर्माण होत आहे का?
#हे प्रश्न प्रत्येक तरुणाने स्वतःला विचारले पाहिजेत..
आजची युवा पिढी आधुनिक तंत्रज्ञानाच्या वेगवान जगात जगते. संधींची दारेही पूर्वीपेक्षा अधिक खुली आहेत.. पण त्याचवेळी स्पर्धा, दिखावा, आभासी प्रतिष्ठा आणि तात्काळ यशाच्या मोहात आपली मूळ स्वप्नं हरवू नयेत. कारण मोबाईल ‘स्मार्ट’ असून उपयोग नाही, जोपर्यंत माणसाचा विचार विवेकी, स्वतंत्र आणि संवेदनशील होत नाही.
कॉम्रेड अण्णा भाऊंचं जीवन आपल्याला सांगतं..
" परिस्थिती तुमची सुरुवात ठरवू शकते..पण तुमचा शेवट ठरवण्याचा अधिकार तिला देऊ नका.."
जन्म कुठे झाला, खिशात किती पैसा आहे, वाटेत किती संकटं आली..यापेक्षा त्या संकटांसमोर तुम्ही किती निर्धाराने उभे राहिलात, हे अधिक महत्त्वाचं असतं. अपयशाला शरण जाणारे इतिहासाच्या गर्दीत हरवतात..पण संकटांना आव्हान देणारे इतिहासाच्या पानांवर स्वतःची अक्षरं कोरतात.
म्हणून तुमच्या हातात मोबाईल जरूर असू द्या.. पण डोक्यात विवेक आणि विचारांची धारही असू द्या...हातात पदवी असू द्या.. पण हृदयात माणुसकीही असू द्या...ओठांवर स्वप्नं असू द्या, पण पाय वास्तवाच्या जमिनीवर असू द्या...आणि अन्याय दिसला, तर मौनाची सुरक्षित चादर ओढून बसण्याऐवजी सत्याच्या बाजूने उभं राहण्याचं धैर्यही असू द्या.
कारण शिक्षण केवळ नोकरी मिळवण्याचं साधन नाही, शिक्षण म्हणजे विवेक जागवणारी मशाल, गुलामी नाकारणारी चेतना आणि माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार समजावून देणारी शक्ती आहे.
अण्णाभाऊ साठे यांचा विद्रोह द्वेषाचा नव्हता तर तो स्वाभिमानाचा होता.
तो कोणत्याही व्यक्तीविरुद्ध नव्हता, तो अन्यायाविरुद्ध होता...तो समाज तोडण्यासाठी नव्हता, तर तो समता, बंधुता आणि मानवी प्रतिष्ठेच्या आधारावर समाज जोडण्यासाठी होता.
त्यांच्या शब्दांत श्रमिकांच्या घामाचा गंध होता, वंचितांच्या अश्रूंची वेदना होती आणि उद्याच्या समतामूलक समाजाची पहाटही होती.
🔥 युवा मित्रांनो...
तुमच्या शिरांत सळसळणारं रक्त केवळ स्वतःचं आयुष्य घडवण्यासाठी नसावं; त्यात समाज अधिक न्याय्य, विवेकी आणि माणुसकीपूर्ण करण्याची अस्वस्थताही असावी.
स्वप्न पाहा—पण ती सत्यात उतरवण्यासाठी घाम गाळा.
शिका—पण शिक्षणाचा अहंकार बाळगू नका.
प्रश्न विचारा—पण तथ्य आणि विवेकाची साथ सोडू नका.
संघर्ष करा—पण माणुसकी हरवू नका.
आणि अन्यायासमोर—कधीही आपला स्वाभिमान गहाण ठेवू नका.
कारण इतिहास आरामखुर्चीत बसून केवळ परिस्थितीवर तक्रार करणाऱ्यांचा नसतो. इतिहास त्यांचा असतो, जे प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या विचारांची मशाल विझू देत नाहीत..जे अंधाराला शिव्या देण्यापेक्षा स्वतः एक दिवा पेटवतात..आणि जे काळाच्या डोळ्यांत डोळे घालून ठामपणे म्हणतात..
“आम्ही झुकणार नाही...आम्ही थांबणार नाही...आम्ही विचार करू, संघर्ष करू आणि परिवर्तन घडवू..!”
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे म्हणजे केवळ एक साहित्यिक किंवा शाहीर नव्हे, तर ते संघर्षातून जन्मलेली चेतना, श्रमिकांच्या वेदनेला मिळालेली वाचा आणि मानवी स्वाभिमानासाठी पेटलेली परिवर्तनाची मशाल आहेत.
अण्णा,तुमची लेखणी थांबली असेल..✍️
पण तिने पेटवलेली विचारांची मशाल आजही जिवंत आहे...
तुमचा आवाज थांबला असेल..पण स्वाभिमानाची तुमची गर्जना आजही संघर्ष करणाऱ्या प्रत्येक माणसाच्या काळजात धगधगत आहे..!
🌹 महान साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या संघर्षशील विचारांना आणि क्रांतिकारी स्मृतींना विनम्र अभिवादन.. 🙏
-लोकशाहीर अण्णाभाऊचा एक वैचारिक चाहता आणि अभ्यासक.. ✍️
एक साहित्यप्रेमी, विवेकवादी आणि समाजमाध्यमकार..
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख
The Spirit of Zindagi Foundation
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
#लोकशाहीरअण्णाभाऊसाठे #अण्णाभाऊसाठे #लोकशाहीर #साहित्यरत्न #कॉम्रेडअण्णाभाऊसाठे #अण्णाभाऊंचेविचार #अण्णाभाऊंचासंघर्ष #अण्णाभाऊंचेसाहित्य #मराठीसाहित्य #मराठीसाहित्यविश्व #विद्रोहीसाहित्य #परिवर्तनवादीसाहित्य #जनवादीसाहित्य #श्रमिकांचाआवाज #वंचितांचाआवाज #संघर्षाचीकहाणी #संघर्षातूनयश #स्वाभिमान #मानवीस्वाभिमान #सामाजिकन्याय #समता #बंधुता #मानवीप्रतिष्ठा #संविधानिकमूल्ये #विवेकवादी #विवेकाचाआवाज #वैचारिकक्रांती #विचारांचीमशाल #परिवर्तनाचीमशाल #प्रबोधन #समाजप्रबोधन #प्रश्नविचारा #अन्यायाविरुद्धआवाज #हक्कांसाठीलढा #शोषणाविरुद्धलढा #संघर्ष #विद्रोह #क्रांतिकारीविचार #युवाशक्ती #तरुणाई #युवाप्रेरणा #आजचीतरुणाई #शिक्षणआणिविवेक #शिक्षणातूनपरिवर्तन #विचारांचीधार #माणुसकी #सत्याच्याबाजूने #आम्हीझुकणारनाही #आम्हीथांबणारनाही #परिवर्तनघडवू #इतिहासघडवू #मराठीविचार #वैचारिकलेखन #प्रेरणादायीविचार #प्रबोधनात्मकलेखन #मराठीलेख #साहित्यप्रेमी #समाजमाध्यमकार #विद्यार्थीमित्र #AnnabhauSathe #LokshahirAnnabhauSathe #Lokshahir #MarathiLiterature #RevolutionaryWriter #SocialJustice #Equality #HumanDignity #VoiceOfThePeople #VoiceOfWorkers #YouthPower #YouthInspiration #ThinkQuestionChange #FightForRights #PowerOfThought #SocialAwareness #SocialChange #RevolutionaryThoughts #Inspiration #NeverGiveUp #RiseAndFight #BeTheChange #जयअण्णाभाऊसाठे
Post a Comment