जिवंत आहात म्हणून जगताय का..?
की जगण्यासाठी काही अर्थ शोधताय?
आपण श्वास घेतो, चालतो, बोलतो, काम करतो म्हणून आपण जगतो आहोत, असं म्हणायचं का?
की खरंच जगणं आणि जिवंत असणं यात काही फरक असतो?
हा प्रश्न अस्वस्थ करणारा आहे, मित्रांनो..
पण तो विचारायला लागणं हीच माणसाच्या प्रगल्भतेची सुरुवात असते.
आयुष्याच्या पहिल्या तीन चार दशकांत आपण अक्षरशः धावत असतो. शिक्षणाची शर्यत, मित्रमंडळींची ओळख, नोकरी मिळवण्याची धडपड किंवा व्यवसाय उभा करण्याचा संघर्ष, लग्न, मुलं, घर, ईएमआय, जबाबदाऱ्या, अपेक्षा…या सगळ्याला आपण सेटल होणं असं नाव देतो.
या टप्प्यावर प्रश्न विचारायला वेळ नसतो..कारण आयुष्य वेगाने पुढे ढकलत असतं.मेंदू सतत ऑक्युपाइड असतो..कुठे जायचं, कसं जमवायचं, पुढचा महिना कसा पार करायचा याच गणितात.
आणि खरं सांगायचं तर ते आवश्यकही असतं...या संघर्षातूनच आपण स्वतःच्या पायावर उभं राहतो...आई-वडिलांच्या सावलीतून बाहेर पडून स्वतःचा आत्मविश्वास उभा करतो..
पैसा, नाती आणि जबाबदारीची जाणीव हा आयुष्याचा पाया घातला जातो.
मात्र, एक दिवस असा येतो…डोंगर चढून झाल्यावर..
वय साधारण 35-40 च्या आसपास, अचानक काहीतरी बदलतं.
बाहेरून सगळं सेटल असतं,पण आत कुठेतरी पोकळी जाणवू लागते.
कारण आता पुढचं आयुष्य रिपिटिशन वाटू लागतं...पैसे कमवायचेच असतात,..मुलं वाढतच असतात,घर, गाडी, प्रवास, सण-समारंभ सगळं चालूच राहतं पण त्यात नव्हे पणा उरत नाही.
डोंगर सापडत नाही...आव्हान दिसत नाही.15-20 वर्षांची लढाई संपल्यावर पुढचा रणांगणच मिळत नाही.
याच टप्प्यावर प्रश्न उभे राहतात..
मी कोण आहे?
माझी खरी ओळख काय?
आजवर जे केलं, तेच सगळं आयुष्य होतं का..?
शरीर बदलू लागतं, मन अधिक संवेदनशील होतं.
आजवर ज्या गोष्टींसाठी झटलो, त्या आता आनंद देत नाहीत असं वाटू लागतं.
कारण हळूहळू एक सत्य उघड होतं..पैसा, घर, गाडी, सोनं, प्रवास, प्रेम, लग्न ही आयुष्याची ध्येय नाहीत,तर ती फक्त आयुष्य जगण्यासाठी लागणारी साधनं आहेत.
जसं प्रवासाला निघताना बॅग, पाणी, खाऊ, मोबाइल, एटीएम कार्ड गरजेचं असतं,.पण ती डेस्टिनेशन नसते.
तसंच सोमवार ते शुक्रवार काम आणि वीकएंडला थोडा आराम इतकंच आयुष्य असू शकत नाही.
ते झालं केवळ सर्व्हायव्हल..!😱
जर आपण फक्त जिवंत आहोत म्हणून जगत राहिलो, तर व्यक्तिमत्त्व हळूहळू उथळ होत जातं. दृष्टी आज-उद्यापुरती मर्यादित होते...आणि आयुष्याच्या मध्यावर उभं राहून..
“मी हरवलोय का..?” असा प्रश्न पडू लागतो.
पण या प्रश्नांपासून पळू नका...कारण प्रश्न पडणं म्हणजे अपयश नव्हे ते तर प्रगल्भतेचं लक्षण आहे, मित्रांनो..
स्वतःला थोडं झूम आऊट करून पाहा...आपल्या आयुष्याचा मोठा पट समोर ठेवा...तेव्हा वेगळी उत्तरं दिसू लागतील.
नवीन वर्षाच्या सुरुवातीला,एक प्रश्न स्वतःला विचारा..मी जगतोय म्हणून जगतोय का?..की माझ्या जगण्याला काही अर्थ आहे?
मग प्रश्न येतो..ध्येय कसं शोधायचं?
याच टप्प्यावर एक साधा, पण खोल विचार मदतीला येतो..
उपयुक्तता...
जीवनाचा अर्थ उपभोगात नाही,तर उपयोगात आहे.
मी कोणासाठी तरी, कशासाठी तरी, कुठेतरी उपयोगी आहे ही जाणीव पोकळीला अर्थ देऊ लागते.
उपयुक्तता म्हणजे स्वतःला झिजवून सेवा करणं नव्हे. तर ती म्हणजे आपल्या अनुभवांचा, ज्ञानाचा, वेळेचा आणि संवेदनशीलतेचा इतरांच्या आयुष्याशी अर्थपूर्ण संबंध जोडणं.
तितकंच महत्त्वाचं, स्वतःसाठीही तेच करणं...स्वतःची क्षमता वाढवणं,विवेक विकसित करणं,आत्मपरीक्षणाला वेळ देणं.
जेव्हा स्वतःची उन्नती आणि इतरांसाठीची उपयुक्तता या दोन प्रवाहांचा संगम होतो,तेव्हा जगणं केवळ सुरू राहत नाही तर
ते अर्थपूर्ण आणि समृद्ध होतं.
आणि मग प्रश्न राहत नाही,
“मी जिवंत आहे का?”
तेव्हा उत्तर आपोआप मिळतं..होय, मी खरंच जगतो आहे.🥰
धन्यवाद मित्रांनो.. 🙏
आपलाच एक वैचारिक स्नेहीं मित्र..
🎓 #विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख
The Radical Humanist..
साहित्यप्रेमी | विवेकवादी | समाजमाध्यमकार
🔰 The Spirit of Zindagi Foundation..
"मानवी सामर्थ्याला जागवणारं प्रेरणेचं क्षितिज..!"
Inspire | Educate | Empower | Excel
🔰डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन..
"Nurturing Potential Through Education"
शिक्षण | सेवा | प्रेरणा | प्रबोधन | सामाजिकता | संशोधन
#जिवंतआहेतम्हणूनजगताय #जगण्याचा_अर्थ #MeaningOfLife #LifeBeyondSurvival #आत्मपरीक्षण #SelfReflection #LifePurpose #ध्येयशोध #InnerJourney #MidLifeQuestions #LifeAfter35 #प्रगल्भतेची_सुरुवात #ConsciousLiving #MindfulLife #जीवनतत्त्वज्ञान #PhilosophyOfLife #विवेकवादी #RationalThinking #HumanValues #मानवी_मूल्ये #उपयुक्तता #LifeIsForUse #PurposeDrivenLife #ServiceWithSense #PersonalGrowth #SelfDevelopment #MeaningfulLife #LifeLessons #ThoughtProvoking #वैचारिकलेखन #SocialAwareness #HumanistThought #TheRadicalHumanist #InspireEducateEmpower #ZindagiWithMeaning
Post a Comment