हे शब्द स्वामी विवेकानंदांचे असून, ते आजच्या युवकांसाठी दिलेले केवळ प्रेरणावाक्य नसून रणशिंग आहे. ही हाक आहे..भीतीला मागे टाकण्याची, गप्प बसण्याऐवजी निर्भीडपणे उभे राहण्याची, आणि परिस्थितीला दोष देण्याऐवजी परिस्थिती बदलण्याची जबाबदारी स्वीकारण्याची.
आजचा युवक संक्रमणाच्या काळात उभा आहे. एकीकडे अमर्याद संधी, ज्ञान आणि तंत्रज्ञान आहे; तर दुसरीकडे असुरक्षितता, गोंधळ आणि दिशाहीनता. अशा वेळी स्वामी विवेकानंदांचे हे शब्द युवकांना आरसा दाखवतात—तुमच्यात सामर्थ्य आहे, फक्त ते ओळखा आणि कृतीत आणा. इतिहास नेहमीच त्या तरुणांच्या बाजूने उभा राहिला आहे, ज्यांनी सोयीपेक्षा सत्य निवडले, शांततेपेक्षा संघर्ष स्वीकारला आणि स्वतःच्या उन्नतीसोबत समाजाच्या परिवर्तनाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. म्हणूनच युवकांनो, आजचा दिवस केवळ स्मरणाचा नाही, तर संकल्पाचा आहे..उठा, झेप घ्या, कारण दिशा तुमच्या धाडसालाच शरण जाणार आहे.
युवकांनो, आजचा काळ तुमच्याकडे पाहत आहे. इतिहास प्रश्न विचारतो आहे..तुम्ही प्रेक्षक होणार की परिवर्तनाचे शिल्पकार?
फक्त ट्रेंड्स फॉलो करणारी पिढी होणार, की मूल्ये घडवणारी पिढी?
आज तुमच्याकडे शिक्षण आहे, तंत्रज्ञान आहे, विचार व्यासपीठं आणि प्रगत माध्यमं आहेत..पण प्रश्न असा आहे की धैर्य आहे का?
अन्याय पाहून अस्वस्थ होण्याचं धाडस आहे का..?
खोट्या प्रतिष्ठेपेक्षा सत्याची बाजू घेण्याची हिंमत आहे का?
स्वतःपुरतं जगणं नाकारून समाजासाठी काही देण्याचा निर्धार आहे का?
राष्ट्रीय युवा दिन हा फक्त शुभेच्छांचा दिवस नाही तर हा संकल्पांचा दिवस आहे...हा स्वतःला विचारण्याचा दिवस आहे..
मी काय करतोय?
मी कुणासाठी जगतोय?
माझ्या उपस्थितीने समाजात काय फरक पडतोय?
युवकांनो, शिक्षण घ्या..पण केवळ पदवीसाठी नव्हे, तर विवेक जागृतीसाठी..
स्पर्धा करा—पण माणुसकी गमावून नव्हे, मूल्य जपून.
यश मिळवा—पण अहंकार नव्हे, जबाबदारी वाढवा.
रचनात्मक सामाजिक कार्य म्हणजे मोठ्या व्यासपीठाची वाट पाहणं नाही...एक विद्यार्थी, एक शिक्षक, एक कार्यकर्ता, एक संवेदनशील नागरिक म्हणून..आजच सुरुवात करता येते,
एक प्रश्न विचारून,
एक चुकीविरुद्ध आवाज उठवून,
एक विद्यार्थ्याचा हात धरून,
एक अन्यायग्रस्ताच्या बाजूने उभं राहून.
लक्षात ठेवा,
दिशा त्यालाच मिळते, जो चालायला धजावतो...भविष्य त्यालाच मिळते, जो आजशी प्रामाणिक असतो..आणि इतिहास त्याचं नाव लिहितो,जो सोयीपेक्षा सत्य निवडतो.
म्हणूनच युवकांनो, आजच ठरवा गप्प बसणार नाही,
तटस्थ राहणार नाही, फक्त स्वतःपुरतं जगणार नाही.
उठा..!
विचार करा.!
आणि कृती करा..!
राष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्ताने,
रचनात्मक सामाजिक कार्य आणि परिवर्तनासाठी संकल्पबद्ध असणाऱ्या प्रत्येक तरुणाईला क्रांतिकारी शुभेच्छा 🌹
झेप घ्या… कारण दिशा तुमच्या धाडसाचीच वाट पाहत आहे..!
धन्यवाद मित्रांनो.. 🙏
आपलाच एक वैचारिक स्नेहीं मित्र..
संकलित विचार आणि संपादन..✍️
🎓 #विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख
The Radical Humanist..
साहित्यप्रेमी | विवेकवादी | समाजमाध्यमकार
🔰 The Spirit of Zindagi Foundation..
"मानवी सामर्थ्याला जागवणारं प्रेरणेचं क्षितिज..!"
Inspire | Educate | Empower | Excel
🔰डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन..
"Nurturing Potential Through Education"
शिक्षण | सेवा | प्रेरणा | प्रबोधन | सामाजिकता | संशोधन
#युवकांनोउठा #झेपघ्या #दिशातुम्हालाशरण #स्वामीविवेकानंद #YouthPower #InspiredYouth #NationalYouthDay #युवाशक्ती #प्रेरणादायीविचार #निर्भीडयुवा #संकल्प #कृतीशीलयुवा #SocialChange #YouthForChange #ValueBasedLife #विवेकजागृती #शिक्षणआणिप्रेरणा #CourageToQuestion #StandAgainstInjustice #ResponsibleYouth #TransformSociety #RationalThinking #HumanValues #EducateEmpowerExcel #RadicalHumanist #TheSpiritOfZindagi #StudentMovement #YouthLeadership #NationBuilding #PositiveChange #विचारआणिकृती #सत्याचीबाजू #सामाजिकपरिवर्तन #InspiredIndia #futuremakersconclave
Post a Comment