🔰 क्रांतीज्योती सावित्रीमाई - शिक्षणातून समानतेचा दीप प्रज्वलित करणारी तेजस्वी वाट
ज्या काळात स्त्रीला शिक्षणापासून दूर ठेवण्याचे कट रचले जात होते, त्या काळात क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांनी ज्ञानाचा दिवा हातात घेत अंधाराला थेट आव्हान दिले. त्यांनी केवळ शाळा उघडल्या नाहीत, तर स्त्रियांच्या आत्मसन्मानाची, स्वाभिमानाची आणि समानतेची दारे उघडी केली.
शिक्षण ही दया नसून हक्क आहे, हा मूलभूत विचार त्यांनी समाजाच्या मर्मावर कोरला. अन्याय, अपमान आणि सामाजिक बहिष्कार यांचा सामना करत त्यांनी चाललेला प्रवास हा धैर्य, विवेक आणि परिवर्तनाचा तेजस्वी इतिहास आहे.
सावित्रीमाईंचे कार्य म्हणजे शब्दांनी नव्हे, तर कृतीने दिलेले प्रबोधन... शिक्षणातूनच माणूस विचारशील बनतो, प्रश्न विचारतो आणि अन्यायाला नकार देतो हा त्यांचा ठाम विश्वास होता.
म्हणूनच त्यांनी स्त्रीला केवळ चूल आणि मूल यांपुरती मर्यादित न ठेवता, तिला विचारांची उंच भरारी घेण्याची ताकद दिली. त्यांच्या पावलांनी समाजाला दिशा दिली आणि येणाऱ्या पिढ्यांना स्वप्ने पाहण्याचे धैर्य बहाल केले.
आज सावित्रीमाईंच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करताना, त्यांच्या विचारांना केवळ स्मरणात न ठेवता कृतीत उतरवण्याचा संकल्प करणे हीच खरी आदरांजली ठरेल.
शिक्षणाच्या माध्यमातून समानता, विवेक आणि मानवतेची मशाल अखंड तेवत ठेवणे..हेच सावित्रीमाईंच्या क्रांतीचे खरे फलित आहे. त्यांच्या प्रेरणेने समाज अधिक प्रगल्भ, समताधिष्ठित आणि उज्ज्वल होवो, हीच अपेक्षा. 🙏
स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे खुली करून समानतेचा पाया रचणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीमाईस जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.🙏🏻
- विचार संकलन आणि संपादन.. ✍️
🎓 #विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख
The Radical Humanist..
साहित्यप्रेमी | विवेकवादी | समाजमाध्यमकार
🔰 The Spirit of Zindagi Foundation..
"मानवी सामर्थ्याला जागवणारं प्रेरणेचं क्षितिज..!"
Inspire | Educate | Empower | Excel
🔰डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन..
"Nurturing Potential Through Education"
शिक्षण | सेवा | प्रेरणा | प्रबोधन | सामाजिकता | संशोधन
Post a Comment