संघर्ष हा माणसाच्या आयुष्याचा आत्मा आहे. तो केवळ बाह्य परिस्थितींशी झुंज देण्यासाठी नसतो, तर स्वतःच्या अस्तित्वाला अर्थ देण्यासाठी असतो. “संघर्ष स्वतःसाठी करायचा असतो, स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी..” हे वाक्य केवळ शब्दांचे संकलन नसून, जीवनाचे कठोर पण सत्य तत्त्वज्ञान मांडते.
या जगात कुणीही आपल्यासाठी कायम उभं राहत नाही. सहानुभूती क्षणिक असते, टाळ्यांचा आवाज काही काळापुरताच असतो; पण स्वतःच्या अस्मितेची लढाई मात्र आयुष्यभर चालते. संघर्ष म्हणजे केवळ उपासमार, अन्याय, अपमान किंवा अडचणींचा सामना नव्हे.. तर संघर्ष म्हणजे स्वतःच्या विचारांना जिवंत ठेवणं, स्वतःच्या स्वप्नांना तडजोडीच्या कबरीत न पुरणं आणि परिस्थिती कितीही कठीण असली तरी “मी आहे” हे ठामपणे जाहीर करणं.
जो स्वतःसाठी लढत नाही, तो हळूहळू अदृश्य होतो. समाज त्याला वापरतो, व्यवस्था त्याला चिरडते आणि इतिहास त्याला विसरतो. परंतु जो माणूस स्वतःच्या अस्तित्वासाठी उभा राहतो, तो केवळ स्वतःचं आयुष्य घडवत नाही, तर इतरांनाही उभं राहण्याची प्रेरणा देतो. असा संघर्ष वैयक्तिक वाटला तरी त्याचे परिणाम सामूहिक असतात.
" संघर्ष ही जिद्दीची मशाल आहे. ती माणसाला पडल्यावर पुन्हा उभं राहायला शिकवते, हरल्यावर नव्याने लढायला बळ देते. "
संघर्षाशिवाय माणूस सुरक्षित असू शकतो, पण तो स्वतंत्र कधीच होऊ शकत नाही. कारण स्वातंत्र्य सहज मिळत नाही; ते स्वतःसाठी लढण्याच्या धगधगत्या वाटेवरूनच मिळतं.
म्हणूनच संघर्षाला घाबरू नका. तो तुमचा शत्रू नाही, तो तुमचा खरा गुरू आहे. स्वतःसाठी केलेला संघर्ष म्हणजे अहंकार नव्हे, तर आत्मसन्मान आहे...आणि आत्मसन्मान जपणारा माणूसच खर्या अर्थाने जिवंत असतो..उरलेले फक्त जगत असतात.
संघर्ष करा, कारण तोच तुमच्या अस्तित्वाचा पुरावा आहे...
संघर्ष केवळ दुःख आणि वेदनाच नाही, तर स्वतःला ओळखण्याची आणि आपल्या क्षमतेची परीक्षा घेण्याची संधी आहे. प्रत्येक छोटा किंवा मोठा संघर्ष आपल्याला अधिक जिवंत बनवतो, आपल्यातील जिद्द, धैर्य आणि आत्मविश्वास वाढवतो. तो आपल्याला शिकवतो की परिस्थिती कितीही कठीण असली तरी, स्वतःसाठी उभं राहण्याची ताकद आपल्यामध्ये नेहमी असते.
म्हणूनच, संघर्षाला भीतीने नव्हे, उत्साहाने सामोरे जा... तो तुमचा दुश्मन नाही, तर तुमचा मार्गदर्शक आहे, जो तुमच्या अस्तित्वाला खरा अर्थ देतो. स्वतःसाठी केलेला संघर्ष म्हणजे केवळ जीवनाचा संघर्ष नव्हे, तर आत्मसन्मानाचा उत्सव आहे. जे माणूस स्वतःच्या अस्तित्वासाठी लढतो, त्याचं जीवन खरी अर्थाने उजळतं, आणि त्याची जिद्द इतरांसाठी प्रेरणेचा दीपस्तंभ ठरते.
धन्यवाद मित्रांनो.. 🙏
विचार संकलन आणि संपादन...
🔰 #विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख
The Radical Humanist..
साहित्यप्रेमी | विवेकवादी | समाजमाध्यमकार
🔰 The Spirit of Zindagi Foundation..
" मानवी सामर्थ्याला जागवणारं प्रेरणेचं क्षितिज..! "
Inspire | Educate | Empower | Excel
🔰डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन..
" Nurturing Potential Through Education "
शिक्षण | सेवा | प्रेरणा | प्रबोधन | सामाजिकता | संशोधन
#संघर्ष #आत्मसन्मान #स्वतंत्रता #जीवनप्रेरणा #धैर्य #जिद्द #प्रेरणादायक #स्वअस्तित्व #मनुष्यत्व #उठ #लढ #MotivationMarathi #LifeLessons #SelfEmpowerment #InnerStrength #ZindagiSpirit #InspirationalThoughts #MindsetShift #SuccessMindset #NeverGiveUp #PersonalGrowth #EmpowerYourself #StayStrong #SelfBelief #CourageToFight #MarathiMotivation #MarathiInspiration #Motivation #Inspiration #SelfGrowth #PersonalDevelopment #LifePurpose #InnerStrength #NeverGiveUp #Courage #Empowerment #SuccessMindset #BeYourself #LifeLessons #SelfBelief #RiseAndShine #MindsetMatters #Leadership #OvercomeObstacles #StrengthWithin #LifeInspiration #motivationalthoughts
Post a Comment