🎓 अभिनंदन आणि मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा : विद्यार्थी मित्रा..
युवा उद्योजक विशाल चंदू चव्हाण..
डॉ. कलाम विद्यार्थी फाउंडेशन या आमच्या शैक्षणिक परिवाराचा सन 2015–16 या शैक्षणिक वर्षात दहावीत शिक्षण घेतलेला माजी विद्यार्थी. पदवी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या सुरक्षित वाटेऐवजी स्वतःच्या कष्टांवर आणि आत्मविश्वासावर उभं राहून उद्योजक होण्याचा धाडसी निर्णय त्याने घेतला.
काल अत्यंत उत्साही वातावरणात त्याच्या ‘सुकून चहा’ या हॉटेलचा शुभारंभ पार पडला. काही कारणास्तव उद्घाटन सोहळ्याला प्रत्यक्ष उपस्थित राहता आले नाही; मात्र आज युवा स्नेही विद्यार्थी मित्र सैफ शेख यांच्यासोबत त्याच्या या लघुउद्योग दालनाला विशेष भेट देण्याचा योग आला.
शुभेच्छारूपी आशीर्वाद, सदिच्छा आणि आत्मीय संवादातून त्याच्या पुढील प्रवासासाठी मनःपूर्वक शुभकामना देण्यात आल्या.
विशाल अभ्यासात सरासरी असला, तरी मित्रप्रिय, मेहनती आणि सकारात्मक ऊर्जेचा झरा आहे.. वडिलांचा छोटेखानी हॉटेल व्यवसाय असला, तरी केवळ वारसा नव्हे, तर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचं स्वप्न त्याने उराशी बाळगलं.
उद्योगविश्वात स्वतःच्या कर्तृत्वावर उंच भरारी घेण्याची जिद्द त्याच्या प्रत्येक पावलातून दिसून येते.
शालेय शिक्षणानंतरचा संघर्ष, दीर्घकालीन दृष्टी, चिकाटी, प्रामाणिकपणा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर असलेला अढळ विश्वास.. या साऱ्या गुणांच्या बळावर तो आज स्वतःचं भविष्य घडवत आहे.
त्याचा हा प्रवास केवळ यशाची गोष्ट नाही, तर असंख्य तरुणांसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ ठरणारा आहे.
अशा कर्तृत्ववान, ध्येयवेड्या आणि आत्मनिर्भर विद्यार्थी मित्राला अनेक शुभेच्छा, मनःपूर्वक सदिच्छा..!
तुझं यश वाढत राहो, तुझा उद्योग फुलत राहो..हीच मनापासून प्रार्थना.
तुझा आम्हांस सार्थ अभिमान आहे, विशाल..🌹
तुझाच स्नेहांकित शुभेच्छूक आणि मार्गदर्शक..
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख..
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
Post a Comment