🎓 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि सप्रेम भेट… 🌼
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम व्होकेशनल ट्रेनिंग अँड स्किल डेव्हलपमेंट अकॅडमी मध्ये Graphic Designing या क्षेत्रात उत्तम ज्ञान व व्यावहारिक कौशल्ये आत्मसात करणारा, आमच्या शैक्षणिक परिवारातील लाडका व प्रेरणादायी विद्यार्थी मित्र यशवंत कांबळे..
बारावी शिक्षणानंतर BCA पदवीचे शिक्षण घेत, केवळ प्रमाणपत्रांवर विसंबून न राहता कौशल्य, कष्ट आणि आत्मविश्वासाच्या बळावर Freelancer म्हणून स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करणारा यशवंत हा आजच्या तरुणाईसाठी निश्चितच एक आदर्श आहे.
“ नोकरी मागणारा नव्हे, तर संधी निर्माण करणारा युवक..” ही संकल्पना तो आपल्या कृतीतून सातत्याने साकार करत आहे.
आज त्याचा वाढदिवस..!
या आनंदी क्षणी त्याने मला ' छत्रपती शाहू महाराजांचा स्मृतिग्रंथ' सदिच्छा भेट म्हणून दिला.
सामाजिक समतेचे, शिक्षणाचे आणि मानवमूल्यांचे प्रखर पुरस्कर्ते असलेल्या शाहू महाराजांच्या विचारांशी नातं जपणारी ही भेट, यशवंतच्या वैचारिक प्रगल्भतेचं आणि सामाजिक जाणीवेचं सुंदर प्रतीक आहे.
आमच्या शैक्षणिक परिवाराच्या वतीने आज त्याचा वाढदिवस अत्यंत आत्मीयतेने साजरा करण्यात आला. अशा गुणवंत, विचारशील आणि आत्मनिर्भर विद्यार्थ्यांचा प्रवास पाहताना आम्हांला अभिमान वाटतो.
यशवंतचा हा प्रवास केवळ वैयक्तिक यशापुरता मर्यादित न राहता, “ शिका, कौशल्य मिळवा आणि स्वतःचा मार्ग स्वतः घडवा.” हा संदेश समाजातील असंख्य युवकांपर्यंत पोहोचवणारा ठरो, हीच अपेक्षा.
तुझा आम्हांस सार्थ अभिमान आहे, विद्यार्थीमित्रा..🌹
यशवंतला उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा..!
तुझे कौशल्य, तुझे विचार आणि तुझी मेहनत समाजाला नवी दिशा देऊ दे…
अत:दीप भव..
तुझाच स्नेहांकित शुभेच्छूक आणि मार्गदर्शक..
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख..
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
Post a Comment