#मनुष्य जेव्हा जन्म घेतो, तेव्हापासून तो शिकायला लागतो. चालणं, बोलणं, हसणं, रडणं हे सारे जीवनानेच शिकवलेले धडे असतात. पण दुर्दैवाने, शाळा-महाविद्यालय संपलं की आपण स्वतःला “शिकलेला माणूस” समजायला लागतो आणि इथूनच अधोगतीची सुरुवात होते. कारण शिकणं थांबतं तेव्हा विचार गोठतात, आणि विचार गोठले की माणूस जिवंत असूनही जड होतो.
#जीवन ही अशी अखंड चालणारी शाळा आहे, जिथे घंटा कधी वाजत नाही, परीक्षा कधी संपत नाही आणि प्रमाणपत्र कधीच अंतिम नसतं.
#विद्यार्थी राहणं म्हणजे केवळ वही-पुस्तक हातात घेणं नव्हे; तर प्रत्येक अनुभवाकडे कुतूहलाने पाहणं, प्रत्येक अपयशातून धडा घेणं आणि प्रत्येक यशातून नम्रता शिकणं होय. आयुष्यात येणारी वेदना संयम शिकवते, संघर्ष चिकाटी शिकवतो, तर अपयश आपल्याला वास्तवाची ओळख करून देतं. पण हे सारे धडे तेव्हाच उमजतात, जेव्हा आपण मनाने विद्यार्थी असतो.
#आजचा काळ माहितीचा महापूर घेऊन आला आहे. पण माहिती आणि ज्ञान यामध्ये फरक आहे. माहिती अहंकार वाढवते, तर ज्ञान विवेक जागवते. जो माणूस स्वतःला कायम विद्यार्थी मानतो, तो “मला सगळं येतं” असं कधीच म्हणत नाही; उलट तो “मला अजून शिकायचं आहे” असं नम्रपणे स्वीकारतो...
#हाच स्वीकार माणसाला मोठं बनवतो,मित्रांनो..
#इतिहास पाहिला तर लक्षात येईल...महान व्यक्तिमत्त्वे कधीच शिकणं थांबवत नव्हते.. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम शेवटच्या श्वासापर्यंत विद्यार्थ्यांमध्येच रमले. महात्मा गांधींनी आयुष्यभर प्रयोग केले...सत्याचे, अहिंसेचे आणि आत्मशुद्धीचे. त्यांनी स्वतःला कधीही “परिपूर्ण” मानलं नाही; ते कायम शिकत राहिले.
#विद्यार्थी राहणं म्हणजे बदल स्वीकारण्याची ताकद ठेवणं...जग बदलतं, तंत्रज्ञान बदलतं, समाज बदलतो..पण जो शिकायला तयार नसतो, तो काळाच्या पाठीवर राहतो. आज अनेकजण पदव्या घेतात, पण विचारांनी जुनेच राहतात. त्यामुळे त्यांचं शिक्षण केवळ कागदापुरतंच मर्यादित राहतं.
#खरं प्रबोधन तेव्हाच घडतं, जेव्हा माणूस प्रश्न विचारायला शिकतो,मित्रांनो..
#प्रश्न विचारणं म्हणजे बंड नव्हे; ते विवेकाचं लक्षण आहे. विद्यार्थी मन प्रश्न विचारतं, शंका घेतं, तपासून पाहतं आणि मगच निष्कर्ष काढतं. त्यामुळे असा माणूस #अंधश्रद्धेचा बळी ठरत नाही, अफवांवर विश्वास ठेवत नाही आणि विचारपूर्वक निर्णय घेतो.
#जीवन आपल्याला रोज शिकवत असतं..कधी एखाद्या लहान मुलाच्या निरागस हसण्यातून, कधी एखाद्या वृद्धाच्या अनुभवातून, तर कधी निसर्गाच्या शांततेतून. सूर्योदय आपल्याला नवी सुरुवात शिकवतो, सूर्यास्त आपल्याला स्वीकार शिकवतो, आणि रात्रीची शांतता आत्मपरीक्षणाची संधी देते. पण हे सारे धडे त्यालाच समजतात, जो विद्यार्थी असतो.
#म्हणूनच, विद्यार्थी राहणं ही केवळ एक अवस्था नाही, तर ती एक जीवनदृष्टी आहे. ती माणसाला नम्र ठेवते, सजग बनवते आणि सतत जागृत ठेवते. जो माणूस आयुष्यभर शिकण्याची तयारी ठेवतो, तो कधीच पराभूत होत नाही..कारण प्रत्येक अपयश त्याच्यासाठी शिक्षक ठरतं आणि प्रत्येक अडथळा त्याला अधिक सक्षम बनवतो.
#शिकणं थांबत नाही, ते फक्त रूप बदलतं; आणि जो त्या रूपांतराला स्वीकारतो, तोच खऱ्या अर्थाने प्रगल्भ होतो.
#आज गरज आहे ती पदव्यांनी मोजल्या जाणाऱ्या शिक्षणापेक्षा विवेकाने घडणाऱ्या शिक्षणाची...#समाज, #राष्ट्र आणि #माणुसकी यांचा खरा विकास तेव्हाच शक्य आहे, जेव्हा आपण सगळेच आयुष्याच्या शाळेत विनम्र विद्यार्थी बनून राहू.
#कारण शेवटी एवढंच सत्य आहे, मित्रांनो..✍️
" प्रत्येक दिवस काहीतरी नवीन शिकवतो,फक्त आपण शेवटच्या श्वासापर्यंत विद्यार्थी राहिलो पाहिजे."
विद्यार्थी राहणं म्हणजे स्वतःला अपूर्ण मानणं नव्हे, तर सतत पूर्ण होण्याच्या प्रवासात राहणं आहे. कारण शिकणं थांबलं, की वाढ थांबते; आणि वाढ थांबली, की जीवन केवळ श्वासापुरतं उरतं.
#म्हणूनच, प्रत्येक दिवस आपल्याला काहीतरी नवीन शिकवतो; ते शिकण्याची मानसिकता सजगतेने ठेवली, तरच आयुष्य अधिक समृद्ध आणि अर्थपूर्ण ठरेल, मित्रांनो.
-आपलाच एक वैचारिक स्नेहीं.. ✍️
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख...
The Radical Humanist...
-एक साहित्यप्रेमी, शिक्षणप्रेमी आणि समाजमाध्यमकार..
🔰 The Spirit of Zindagi Foundation
"मानवी सामर्थ्याला जागवणारं प्रेरणेचं क्षितिज..!"
Inspire | Educate | Empower | Excel
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
"Nurturing Potential Through Education"
शिक्षण | सेवा | प्रेरणा | प्रबोधन | सामाजिकता | संशोधन
#विद्यार्थी_राहणं #StudentForLife #LifelongLearning #शिकत_राहा #LearningNeverStops #प्रबोधन #वैचारिकलेखन #InspirationalMarathi #MarathiThoughts #जीवनशिक्षण #EducationForLife #विवेक #ज्ञान #Wisdom #SelfGrowth #PersonalDevelopment #CriticalThinking #प्रश्न_विचारा #RationalThinking #HumanValues #socialawareness #ThoughtLeadership #Mindset #GrowthMindset #HumilityIsStrength #Awareness #PositiveThinking #motivationalwriting #EducationalThoughts #YouthInspiration #StudentsOfIndia #IndianEducation #DrAPJAbdulKalam #RoleModel #ValueBasedEducation #TheRadicalHumanist #SpiritOfZindagi #InspireEducateEmpower #शिक्षण_सेवा_प्रेरणा
Post a Comment