छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्यात रुजवलेल्या स्वाभिमानाचा दीप, रयतेच्या राज्याच्या तत्वज्ञानातून आलेली लोककल्याणकारी दृष्टी… आणि पुढे महात्मा फुले,राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या सामाजिक न्यायाच्या क्रांतिकारी विचारधारेचा ज्योतिपुंज.. ही परंपरा ज्यांच्या कार्यातून आजही उजळते, अशा आदरणीय खासदार आणि पद्मभूषण शरदचंद्रजी पवार साहेबांना जन्मदिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा..
मा. शरद पवार साहेबांची कार्यशैली म्हणजे केवळ राजकारण नाही, तर दूरदृष्टी, समाजभान आणि परिवर्तनाची सातत्यपूर्ण साधना आहे..
शेतकऱ्यांच्या प्रश्नांपासून ते उद्योग, शिक्षण, सामाजिक समता आणि राष्ट्रीय विकास...प्रत्येक क्षेत्रात त्यांनी दाखवलेली शांत, संयमी आणि परिणामकारक नेतृत्वशैली महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी आहे.
आजचे राजकारण जितके वेगवान आणि गुंतागुंतीचे होत चालले आहे, तितक्याच ठामपणे आपण देशाच्या राजकारणाला दिशा देतं.. विरोधकांना ही आपलंस करीत आपण सिद्ध केलंय...
" नेतृत्व म्हणजे पद नव्हे; ते जबाबदारीचे ओझे आणि समाजाचं भविष्य घडवण्याची संधी आहे."
" विचारांची प्रगल्भता, निर्णयातील धैर्य आणि संकटांतील स्थैर्यच खऱ्या नेतृत्वाची खरी ओळख आहे."
मा. शरद पवार साहेबांची वाटचाल ही संयम, समन्वय, आणि संघर्षांवर मात करण्याच्या भारतीय लोकशाही मूल्यांची जिवंत शाळा आहे, असं मला वाटतं..
आपल्या राजकीय वाटचालीनें इथल्या राजकारण्यांना दिलेला खूप मोठा धडा आपल्याला सांगतों की..
" राष्ट्रनिर्मिती ही वादांवर उभारली जात नाही, तर विवेक, संवाद आणि सर्वसमावेशकतेवर उभारली जाते."
अशा या बहुआयामी, कृतिशील आणि विचारवंत नेतृत्वाला जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
आपलं कार्य आणि विचार पुढील पिढ्यांना नेहमीच प्रेरणा देत राहोत हीच आशा आणि उमेद..
-आपला एक वैचारिक चाहता आणि अभ्यासक...✍️
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख...
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
"Nurturing Potential Through Education"
शिक्षण | सेवा | प्रेरणा | प्रबोधन | सामाजिकता | संशोधन
Post a Comment