📚 Ignited Minds डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांचा प्रज्वलित दीपस्तंभ..
पुस्तक समीक्षा क्र. 77..
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे Ignited Minds हे पुस्तक म्हणजे केवळ शब्दांचा संग्रह नाही; तर ते भारताच्या वर्तमानावर चिंतन करणारे आणि भविष्याचे दार ठोठावणारे दूरदर्शी स्वप्न आहे. हे पुस्तक वाचताना आपण फक्त एक वैज्ञानिकाचे विचार ऐकत नाही, तर एका ऋषितुल्य व्यक्तीचा आत्मस्वर अनुभवतो..ज्याने जीवनाला मिशन मानले, राष्ट्राला कुटुंब, आणि युवकांना परिवर्तनाचा सक्षम प्रवाह..
🔰पुस्तकाचा मुख्य आत्मा : " जागृत मनांची क्रांती."
डॉ.कलाम साहेब म्हणतात,
"भारताला बदलायचं असेल, तर युवकांच्या मनात आग हवी."
ही आग म्हणजे द्वेषाची किंवा असंतोषाची नव्हे; तर ती आहे कर्तव्याची, ज्ञानाची, सृजनाची आणि राष्ट्र-निर्मितीची ज्योत..
या पुस्तकात डॉ. कलाम आपल्याला शिकवतात की भारताची समस्या गरीबी किंवा साधनांची कमी नाही तर समस्या आहे “ पराभूत मानसिकता..”
ते युवकांना आवाहन करतात की कल्पना करा, स्वप्न बघा आणि त्या स्वप्नांचा पाठपुरावा धाडसाने करा...प्रत्येक भारतीय युवक हा राष्ट्राचा ‘इग्नाईटर’ आहे..राष्ट्राच्या मनात परिवर्तनाची चेतना प्रज्वलित करणारा दीपक.
🔰प्रेरणादायी दृष्टिकोन : स्वप्न, स्वाभिमान आणि संकल्प..
पुस्तकातील प्रत्येक प्रकरण हे एक वेगळे प्रकाशकिरण आहे..
कुठे ते देशाच्या वैज्ञानिक शक्यता दर्शवतात,कुठे शिक्षणाच्या माध्यमातून राष्ट्रनिर्मितीचा मार्ग दाखवतात,तर कुठे अध्यात्म आणि विज्ञानाला एकत्र आणणारा विचार मांडतात.
डॉ.कलामांचे विशिष्ट वैशिष्ट्य म्हणजे आशावादाचा वैज्ञानिक आधार. त्यांनी स्वप्न दाखवले ते आकाशात तरंगणारे नव्हते; ते जमिनीवर पाय ठेवून, प्रत्यक्ष कृतीने पूर्ण करता येऊ शकणारे होते.
त्यांच्या शैलीत एक दिव्यता आहे, “स्वप्न ते नसतं जे आपण झोपेत पाहतो… स्वप्न ते असतं जे आपल्याला झोपू देत नाही.”
जबाबदारी स्वीकारणारा भारत... ✍️
Ignited Minds आपल्याला एका खोल प्रश्नाकडे नेतं..
“राष्ट्राची उन्नती ही सरकारची जबाबदारी आहे का, की प्रत्येक नागरिकाची?”
डॉ.कलामांचा ठाम विश्वास आहे की समृद्ध भारताची गुरुकिल्ली म्हणजे 'जगारूक नागरिक' होय..
त्यांना शिक्षक, विद्यार्थी, वैज्ञानिक, उद्योगपती, राजकारणी सर्वांमध्ये एक अदृश्य साखळी दिसते.ही साखळी तुटली की समाज ढासळतो; आणि ती जोडली की राष्ट्र सोनेरी भविष्याकडे झेपावते.
ते सांगतात की भारताची ताकद उपग्रहांमध्ये किंवा क्षेपणास्त्रांमध्ये नाही;तर भारताची खरी ताकद आहे, त्याच्या युवकांच्या ज्वलंत आदर्शवादात.
🔰अध्यात्म आणि विज्ञान : एक समन्वय..
पुस्तकातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि कमी चर्चिला जाणारा पैलू म्हणजे अध्यात्म आणि विज्ञान यांचा सांघिक प्रवास.डॉ.कलाम विज्ञानाच्या उजेडात चालतात, पण मनात अध्यात्माची शांतता बाळगतात...
ते म्हणतात, “ राष्ट्रनिर्मितीसाठी तंत्रज्ञान आणि मूल्ये ही दोन्ही समान गरजेचे आहे.”
आजच्या तंत्रज्ञानयुगात या विचाराची किंमत आणखी वाढलेली आहे.
🔰एकंदरीत Ignited Minds ह्या पुस्तकाची समीक्षा..
हे पुस्तक युवकांसाठी दिशा-दीप आहे.
शिक्षक आणि पालकांसाठी संस्कारांचे मार्गदर्शन आहे.
समाजातील प्रत्येक घटकासाठी कर्तव्याची आठवण आहे.
आणि भारतासाठी एक प्रेरित भविष्याची आराखडा-पुस्तिका आहे, असं मला वाटतं मित्रांनो..
शब्द साधे आहेत, पण विचार विलक्षण खोल.भाषा सौम्य आहे, परंतु संदेश अत्यंत शक्तिशाली.धुरकट वास्तवातही डॉ. कलाम साहेब आशेचा प्रकाश देतात.
🔰मन प्रज्वलित करणारे पुस्तक..
Ignited Minds वाचताना आपण केवळ डॉ. कलामांना समजत नाही,तर आपण स्वतःलाही नव्याने ओळखू लागतो.
हे पुस्तक आपल्यावर आदेश घालत नाही,तर ते आपल्याला उजळून टाकतं..आतून, मनातून, विचारातून...
शेवटी एकच वाक्य हे पुस्तकाचा सार सांगते..
“ जागृत मनं बदल घडवतात… आणि बदल घडवणारेच भविष्य घडवतात.”
धन्यवाद, मित्रांनो..🙏
(टीप : वरील लेख हा विविध मुक्त स्रोतांतील माहिती संकलित करून सादर केलेला संशोधित स्वरूप आहे.)
-विचार संकलन आणि संपादन..✍️
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख...
-एक साहित्यप्रेमी आणि समाजमाध्यमकार..
🔰 The Spirit of Zindagi Foundation
"मानवी सामर्थ्याला जागवणारं प्रेरणेचं क्षितिज..!"
Inspire | Educate | Empower | Excel
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
"Nurturing Potential Through Education"
शिक्षण | सेवा | प्रेरणा | प्रबोधन | सामाजिकता | संशोधन
#IgnitedMinds #APJAbdulKalam #DrKalamThoughts #KalamInspiration #KalamVision #YouthPowerIndia #IndianYouth #DreamBigIndia #MissionIndia #EnlightenedMind #IgnitedSoul #NationBuilding #ResponsibleCitizen #TransformingIndia #PositiveThinking #SpiritualScience #ScienceAndSpirituality #EducationForChange #ValueBasedEducation #YouthMotivation #InspirationalBooks #BookReviewMarathi #MarathiArticle #MotivationalMarathi #KalamQuotes #DreamsToReality #MindRevolution #Vision2020Legacy #RafikShaikhWrites #SpiritOfZindagiFoundation #StudentInspiration #EducateEmpowerExcel #thoughtprovokingwrite #MarathiLiterature #SocialAwarenessWrites
Post a Comment