कधी काळी आपण आरशात पाहताना इच्छा, अहंकार आणि तारुण्याचं तेज पाहत उभे असायचो. वेळ धावत होती पण आपण तिच्या पावलांचा आवाज ऐकूच इच्छित नव्हतो. दाढीत पांढरा केस हा कुठेतरी दूर लपलेला असायचा..जणू तो फक्त इतरांसाठीच असतो. पण मग अचानक… काळ हळूच येतो, आणि केसांच्या मुळांवर पहिल्या हिमवर्षावासारखा पांढरेपणाचा स्पर्श करून एक मंद पण गभीर संदेश देतो..
" तू बदलतो आहेस… आणि हे बदलणंच जीवन आहे. "
माणूस कितीही धावला, कितीही शहाणा झाला तरी त्याचं अस्तित्व 8 बिलियन लोकांच्या महासागरात एक छोटासा बुलबुलाच असतों..
आपण ज्या चिंता मनात बाळगतो, ज्या भीतीने स्वतःला झिजवत राहतो, त्या फक्त आपल्याच नाहीत..त्या सर्व मानवतेच्या सामूहिक सावल्या आहेत.
आपण त्याच ब्रह्मांडात राहतो जिथे सूर्य उदयाला जाताना विचारतही नाही, "आज कोण दुखी आहे, कोण थकलेलं, आणि कोण मोडलंय?"
सृष्टीला आपल्या त्रासाचं ओझं नाही..आणि कदाचित त्यातच एक सुंदर मुक्तता दडलेली आहे.
जीवनाचं सत्य इतकचं साधं आहे..
" जितकं शक्य असेल तितक्या निवांतपणे जगणं हेच जगण्याचं खरं कौशल्य आहे."
माणूस हा वर्तमानात स्वतंत्र आहे… पण त्याची ओढ भूतकाळाकडे असते आणि त्याचं मन भविष्याच्या कैदेत अडकलेलं असतं.
भूतकाळाचा पश्चाताप हा जखमेवर पुन्हा पुन्हा हात फिरवत राहण्यासारखा असतो,तो बरा करत नाही… फक्त दुखणं कायम ठेवतो. आणि भविष्याची भीती? ती तर अजून जन्मही न घेतलेल्या अंधाराला शक्ती देण्यासारखी आहे.
वर्तमान हा एकमेव क्षण आहे जिथे जीवन खरंच घडतं.
त्यात प्रेम आहे, अपूर्णता आहे, आंदोलन आहे, आणि सौंदर्यही आहे..ज्याला "आज" स्वीकारता येतं त्याला "उद्या" कधीच घाबरवत नाही.
पांढरे केस…
हे वाढत्या जबाबदाऱ्यांचं चिन्ह नाही तर ते अनुभूतीच्या आकाशात उभे राहिलेल्या वादळांचे साक्षीदार आहेत, असं मला वाटतं, मित्रांनो..
म्हणून जगताना स्वतःला थोडं हलकं ठेवा...😇
लोक काय म्हणतील यापेक्षा तुम्ही स्वतःला काय सांगता हे जास्त महत्त्वाचं आहे...समाजाच्या अपेक्षा पूर्ण करताना स्वतःला हरवू नका,आणि सगळ्यात महत्त्वाचं..
" जीवन हा स्पर्धेचा धावपटू नसून एक शांत, सुंदर अनुभव आहे,ज्यात विचारांची आणि अनुभवाची समृद्धता आहे.."
जमेल तितकं हसा, जितकं शक्य तितकं क्षमा करा,आणि जेव्हा वेळ येईल तेंव्हा पांढऱ्या केसांकडे भितीने नव्हे… तर अभिमानाने बघा...
कारण..
" जगणं हे तरुण दिसण्यात नाही…तर खोल अर्थाने जगण्यात असतं, मित्रांनो.."
-एक जिवनप्रवासी.. ✍️
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख...
-एक साहित्यप्रेमी, विवेकवादी आणि समाजमाध्यमकार..
🔰 The Spirit of Zindagi Foundation
"मानवी सामर्थ्याला जागवणारं प्रेरणेचं क्षितिज..!"
Inspire | Educate | Empower | Excel
#पांढरेकेस #जीवन #विचार #आजचा_विचार #मनन #अनुभव #जीवनतत्त्वज्ञान #मानवता #Motivation #LifeLessons #TimeAndLife #GrowingOlder #SelfGrowth #AgingGracefully #Mindfulness #Inspiration #LifeThoughts #Wisdom #InnerPeace #LifeJourney #RealityCheck #LifeAwakening #WriterLife #ThoughtfulWriting #AuthorQuotes #StudentMentor #SocialThinker #RafiqueShaikhQuotes #TheSpiritOfZindagiFoundation #inspireeducateempowerexcel
Post a Comment