मी आज मोठं,मजबूत झाड दिसतो… पण सुरुवातीला मीही छोटंसंच बी होतो.
कोरड्या जमिनीत पडलो होतो,मला कुणी काय हवंय ? काय नको ?हे कोणीच पाहिलं नाही,कुणी काळजी घेतली नाही.
पहिली काही वर्षं माझ्यात खास काही दिसत नव्हतं.
ना उंची,ना फांद्या,ना सावली…
पण एक गोष्ट मी सतत करत होतो — माझी मुळे जमिनीत खोल नेत होतो.
आज दोन हजार वर्षं जगलेल्या झाडासारखा मी तुला काही गोष्टी सांगतो:
📌मुळे मजबूत नसतील तर उंच वाढण्याचा फायदा नाही.
अनेक झाडं माझ्यापेक्षा झटकन उंच झाली.
पण पहिल्या वादळात उडून गेली.
टिकवून ठेवतं उंची नाही… मुळे ठेवतात.
📌 तुझ्या शांत काळाची किंमत ओळख.
कधी वाटेल, “अरे काहीच होत नाहीय!”
पण नजरेआड, आतून तू खूप वाढत असतोस.
हेच दिवस पुढचं आयुष्य मजबूत करतात.
📌 3) झटपट चमकणार्या यशाचा मत्सर करू नको.
एकाच हंगामात फुललेली झाडं मी पाहिली आहेत.
पण ती फार टिकली नाहीत.
जे पटकन येतं,ते पटकन जातं,जे हळूहळू तयार होतं ?ते आयुष्यभर टिकतं.
📌4) एकटेपणा वाईट नसतो अरे !
कधी मीही मैदानात एकटाच होतो.
ते दिवस माझ्या मुळांना अजून खोल घेऊन गेले.
एकटेपणा म्हणजे वाढ थांबली असं नाही…
तो आतून मजबूत होण्याचा काळ असतो.
📌 5) फळं हवी असतील तर आधी मुळांवर मेहनत कर :
सगळ्यांना फळं हवीत…
पण मुळे वाढवण्यासाठी लागणारा संयम कुणाला नको.
मुळांशिवाय काहीही टिकत नाही.
आणि शेवटी —
जर तू आत्ता अशा टप्प्यात असशील ? जिथे कोणी तुझे प्रयत्न बघत नाही ? कौतुक करत नाही…
तर माझं सांगणं लक्षात ठेव:
🎯हळू वाढण्याची भीती बाळगू नको,थांबण्याची बाळग.
शांत राहण्याची भीती बाळगू नको,रिकामं राहण्याची बाळग.
एक दिवस,जेव्हा तुझी मुळे पुरेशी खोल जातील, तुझा अनुभव जमेल, तुझ्यातली ताकद वाढेल…
तेव्हा तुला उभं करण्यासाठी कुणाची गरज लागणार नाही.
तू स्वतःच तुझ्या क्षेत्रातल्या सर्वात जुन्या झाडासारखा मजबूत” होशील. 👍
Post a Comment