धार्मिक कायदे, महिलांचे हक्क आणि न्यायव्यवस्था यावर विचारप्रवर्तक भाष्य करणारा ‘हक’ हा सामाजिक न्यायाधिष्ठित चित्रपट फक्त एक कथा नसून.. तो समाजाच्या अंतःकरणावर प्रश्न उपस्थित करणारा आरसा आहे.
यामी गौतम आणि इमरान हाश्मी यांच्या प्रभावी भूमिका या कथेला वास्तवाची तीव्रता देतात. दिग्दर्शक सुपर्ण वर्मा यांनी या चित्रपटाद्वारे धर्म, समाज आणि न्याय यांच्या सीमारेषांवर चालणारा संघर्ष समोर आणला आहे..
जिथे एक मुस्लिम महिला आपल्या अस्तित्वाच्या आणि न्यायाच्या लढ्यात उभी राहते.
‘हक’ हा केवळ एका महिलेला न्याय मिळवण्याचा प्रवास नाही, तर तो संविधानातील समानतेच्या तत्त्वाला समाजातील प्रचलित धार्मिक कायद्यांशी भिडवणारा तात्त्विक संवाद आहे, असं मला वाटतं..
शाह बानो प्रकरणाशी साधर्म्य असल्याचे आरोप या चित्रपटावर होत असले तरी.. हा चित्रपट त्या काळाच्या मर्यादांवर भाष्य करत आजच्या काळातील समान प्रश्न पुन्हा उघड करतो..
महिलांचे अधिकार धार्मिक मर्यादांपलीकडे जात न्याय मिळवू शकतात का?
कायदा आणि धर्म यांच्या संघर्षात व्यक्तीच्या ‘हक’चं स्थान कुठे आहे?
आजही हा प्रश्न जिवंत आहे...
आणि म्हणूनच ‘हक’ हा फक्त एक चित्रपट नाही तर तो विचार करायला भाग पाडणारा सामाजिक दस्तऐवज आहे, मित्रांनो..
-एक चित्रपट समीक्षक.. ✍️
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख
-एक साहित्यप्रेमी, विवेकवादी आणि समाजमाध्यमकार..
🔰 The Spirit of Zindagi Foundation
"मानवी सामर्थ्याला जागवणारं प्रेरणेचं क्षितिज..!"
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
शिक्षण | सेवा | प्रेरणा | प्रबोधन | सामाजिकता | संशोधन
#Haq #हक #SocialJustice #सामाजिकन्याय #WomenEmpowerment #महिलांचेहक्क #GenderEquality #EqualityBeforeLaw #ConstitutionalRights #मानवीहक्क #ReligiousLaws #धार्मिककायदे #FaithAndJustice #JusticeForWomen #WomensRights #SocialAwareness #सामाजिकजाणीव #ThoughtProvokingCinema #विचारप्रवर्तकचित्रपट #RealisticCinema #CinemaForChange #CinematicVoice #SupanVerma #YamiGautam #EmraanHashmi #ShahBanoCase #FeministVoice #WomenInJustice #ConstitutionVsReligion #HumanRights #SocioLegalDebate #FilmReview #SocialCommentary #VoiceOfTruth #IndianCinema #CinemaWithPurpose #DrKalamFoundation #SpiritOfZindagiFoundation #VidyarthiMitra #RafiqueShaikh #InspirationalWriting #Prabodhan #SamajikChintan #EducationalAwareness #SocialReform #ArtForChange
Post a Comment