मराठी चित्रपटसृष्टी, मराठी रंगभूमी आणि त्याचबरोबर हिंदी सिनेसृष्टीला आपल्या जिवंत, तल्लख आणि सशक्त अभिनयाने समृद्ध करणारे..केवळ अभिनेते नव्हे, तर विचारवंत कलावंत असलेले..डॉ. श्रीराम लागू हे भारतीय सांस्कृतिक आणि वैचारिक विश्वातील एक दीपस्तंभ होते.
आज त्यांचा स्मृती दिन... त्यानिमित्ताने.. या थोर व्यक्तिमत्त्वाला विनम्र अभिवादन... 🙏🌹
डॉ. श्रीराम लागू यांनी अभिनयाला केवळ मनोरंजनाची चौकट न देता, समाज प्रबोधनाचे प्रभावी माध्यम बनवले. त्यांच्या भूमिकांमधून प्रश्न उपस्थित झाले, व्यवस्थेला आरसा दाखवला गेला आणि प्रेक्षकाला विचार करायला भाग पाडले गेले. रंगभूमी असो वा चित्रपट, प्रत्येक पात्रामागे त्यांनी मानवी स्वभावाचा, सामाजिक वास्तवाचा आणि वैचारिक संघर्षाचा खोल अभ्यास उभा केला.
अभिनया बरोबरच विचारस्वातंत्र्याची चळवळ, अंधश्रद्धा निर्मूलन, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि समाजवादी, मानवी-विवेक मूल्ये यांसाठी ते आयुष्यभर ठामपणे उभे राहिले. तर्कसंगत विचार, विवेक आणि विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन हेच समाजप्रगतीचे खरे अधिष्ठान आहे, ही भूमिका त्यांनी शब्दांतच नव्हे तर कृतीतूनही मांडली. लोकप्रियतेचा वापर स्वतःपुरता न करता, त्यांनी तो लोकशिक्षणासाठी केला..हीच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी उंची होती.
आजच्या काळात, जेव्हा प्रश्न विचारणाऱ्यांकडे संशयाने पाहिले जाते, तेव्हा डॉ. श्रीराम लागू यांचा वैचारिक वारसा अधिकच महत्त्वाचा ठरतो.
त्यांनी शिकवले की,
" कला ही निर्भीड असली पाहिजे, विचार मुक्त असले पाहिजेत आणि समाज विवेकाधिष्ठित झाला पाहिजे."
त्यांच्या स्मृती आपल्याला केवळ आठवण करून देत नाहीत, तर सजग नागरिक म्हणून आपली जबाबदारीही अधोरेखित करतात.
अशा या विज्ञानवादी, पुरोगामी आणि निर्भीड विचारवंत कलाकाराला स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन.. 🙏
त्यांचा आवाज आजही प्रश्न विचारायला, अंधाराला आव्हान द्यायला आणि माणूस म्हणून उंच उभं राहायला प्रेरणा देतो...
-त्यांचा एक वैचारिक चाहता.. ✍️
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख
-एक साहित्यप्रेमी, विवेकवादी आणि समाजमाध्यमकार..
🔰 The Spirit of Zindagi Foundation
"मानवी सामर्थ्याला जागवणारं प्रेरणेचं क्षितिज..!"
Inspire | Educate | Empower | Excel
Post a Comment