हवेतला गारवा…! 🥳
मनाला प्रफुल्लित करणारा, विचारांना स्वच्छता देणारा आणि आयुष्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन जागवणारा..
परभणीत गेल्या तीन आठवड्यांपासून 6.5 ते 8.5° C इतक्या तापमानाचा आनंद घेतं..आजच्या कडक थंडीत उजाडलेली ही शुभ सकाळ...गुलाबी थंडीत न्हालेलं वातावरण, ऋतुबदलाची हलकी चाहूल आणि आरोग्याची जाणीव ठेवणारी ही पहाट...आजचा संपूर्ण दिवस प्रसन्न करेल, यात शंका नाही, मित्रांनो..
शैक्षणिक व सामाजिक संघर्षांनी व्यापलेल्या आयुष्यात आपण कधी जगणंच विसरतोय का..?
हा प्रश्न कधी कधी स्वतःलाच विचारून मन गोंधळून जातं...
कौटुंबिक व सामाजिक जबाबदाऱ्या पेलताना स्वतःकडे दुर्लक्ष होतंय, अशी जाणीव टोचते. तरीही, श्वास घेण्याइतकीही मोकळी जागा नसलेल्या या स्पर्धेच्या जगात आपण गुदमरून न जाता उभं राहू...हा आत्मविश्वास ज्यांच्या अंगी ठासून भरलेला असतो, त्यांना स्वतःच्या कर्तृत्वावर अढळ विश्वास असतो, मित्रांनो.
ऋतू बदल हवाच..! त्या शिवाय आयुष्याचे पावसाळे-उन्हाळे-हिवाळे कसे अनुभवणार.... 🫣😂
निसर्गाची ही अनुकूलता प्रतिकूलतेत जगण्याचं शहाणपण शिकवते आणि आयुष्य समृद्ध करते.
डिसेंबर–जानेवारीचा गारवा केवळ थंडी देत नाही, तर आतली ऊब जागवतो...चिंतनाची, नव्याने घडवण्याची ऊर्जा देतो. ती ऊर्जा जर आपण स्वीकारली, तर आयुष्यात अनेक रचनात्मक शक्यता उलगडतात. थोडा थांबा घ्या, श्वास घ्या, आणि जगण्याचा आनंद पुन्हा एकदा मनभरून अनुभवा, मित्रांनो..
कारण जगणं हीच खरी साधना आहे... 🥰
- शब्दांकन.. ✍️
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख...
-एक साहित्यप्रेमी, शिक्षणप्रेमी आणि समाजमाध्यमकार..
🔰 The Spirit of Zindagi Foundation
"मानवी सामर्थ्याला जागवणारं प्रेरणेचं क्षितिज..!"
Inspire | Educate | Empower | Excel
Post a Comment