आज ‘मानवी हक्क दिन’ आपल्याला एक मूलभूत सत्याची आठवण करून देतो,मानवी हक्क हे कुणाच्या दयेवर अवलंबून नसलेले, तर जन्मतःच प्राप्त झालेले नैसर्गिक हक्क आहेत..
ते हिरावून घेण्याचा अधिकार कोणालाही नाही, कारण हे हक्क म्हणजे माणसाच्या अस्तित्वाचा, विकासाचा आणि सन्मानाचा पाया आहे.
भारतीय संविधानातील अनुच्छेद 21 स्पष्ट सांगतो,
“ प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जीवन जगण्याचा मूलभूत अधिकार आहे.”
हा केवळ कायदेशीर तरतूद नाही, तर आपल्या लोकशाहीची नैतिक शक्ती आहे.
मात्र सद्यस्थितीत मानवी हक्क निर्देशांकात भारताची झालेली घसरण ही केवळ आकड्यांची बाब नसून, आपल्या सामाजिक बांधिलकीस दिलेला तीव्र इशारा आहे.
आदिवासी, वंचित, दुर्लक्षित आणि उपेक्षित घटकांच्या हक्कांकडे चाललेलं दुर्लक्ष ही केवळ प्रशासनाची चूक नाही तर ही संविधानिक मूल्यांची अवहेलना आहे आणि मानवी संवेदनांची परीक्षा आहे.
मानवी हक्क हे केवळ आपणाला मिळावेत यापुरते मर्यादित नाहीत;ते इतरांच्या हक्कांचा सन्मान करण्याची जबाबदारी देखील आपल्यावर सोपवतात.
विचारांतील, संस्कृतीतील, जीवनशैलीतील विविधता मान्य केली तरच खरी मानवी प्रतिष्ठा जपली जाऊ शकते.
लोकशाही फुलते ती विचाराच्या स्वातंत्र्याने, आणि समाज उन्नत होतो तो परस्परांच्या हक्कांचा आदर राखल्याने.
आजच्या या दिनी आपण एक निश्चय करूया.. ✍️
मानवी हक्क फक्त बोलायचे नाहीत… ते जपायचे, जिवंत ठेवायचे आणि प्रत्येक घटकासाठी सुनिश्चित करायचे..
कारण हक्कांचे संरक्षण म्हणजेच मानवतेचे संरक्षण.
#HumanRightsDay
-एक मानवतावादी आणि संविधानप्रेमी भारतीय..✍️
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख..
-एक साहित्यप्रेमी, विवेकवादी आणि समाजमाध्यमकार..
🔰 The Spirit of Zindagi Foundation
"मानवी सामर्थ्याला जागवणारं प्रेरणेचं क्षितिज..!"
Inspire | Educate | Empower | Excel
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
"Nurturing Potential Through Education"
शिक्षण | सेवा | प्रेरणा | प्रबोधन | सामाजिकता | संशोधन
#HumanRightsDay #मानवीहक्कदिन #HumanRights #ConstitutionOfIndia #Article21 #FundamentalRights #SocialJustice #EqualityForAll #DignityForAll #Democracy #Vivekवाद #HumanDignity #RightsAndDuties #SocialAwareness #IndianConstitution #JusticeForAll #AdiwasiRights #VanchitVarga #HumanValues #SamajPrabodhan #InspireEducateEmpower #SpiritOfZindagiFoundation #APJAbdulKalamFoundation #VidyarathiMitra #RafiqShaikh #SocialReform #EducationForAll #SocialResponsibility #VicharPrabodhan #NatitionalHumanRightsDay
Post a Comment